weight loss tips: मित्रांनो सध्याच्या घडीला बघायला गेलं तर वजन वाढणे ही एक समस्या बनत चाललेली आहे. आणि एकदा वजन वाढलं की कितीही प्रयत्न केले तरी काही केल्याने कमी होत नाही. व्यायाम केला, आहारावर म्हणजेच खाण्यावर नियंत्रण ठेवलं. तरी पण वजनाच्या काटा मात्र जशाच्या तसाच. मंग वजन नेमकं कमी का होत नाही, आणि वजन कमी करण्यासाठी काय करावे लागेल. याची काही टिप्स आज या लेखाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे.
वजन कमी करण्यासाठी काही टिप्स(weight loss tips)
- पाणी जपून प्यावे.
- खाण्याची सवय.
- सतत कार्यक्षम राहणे.
- पुरेशी झोप.
- लवकर वजन कमी करणे.
1. पाणी जपून प्यावे.
कोणताही डायट करत असताना आपण ते स्त्रीकटली फॉलो करत असतो. अस करत असताना आपण कुठल्या गोष्टी खायच्या किंवा कुठल्या खायच्या नाहीयेत याच्याकड खूप लक्ष देतो. परंतु पाण्याकडे मात्र तितकस लक्ष दिले जात नाही. परंतु पाणी देखील लक्षपूर्वकच प्यायला हवं. आता बरेच जण सांगत असतात भरपूर पाणी प्या. आम्ही नेमका कोणाचा ऐकायचं काय फॉलो करायचं. तर याचे उत्तर म्हणजेच प्रत्येक माणसाचे शरीर वेगळं आहे, प्रत्येकाला पाण्याची गरज ही वेगळी आहे त्यामुळे जेव्हा तुम्हाला ताण लागेल त्यावेळेस जेवढी ताण आहे तेवढेच पाणी प्यावे. हा पाणी पिणे विषयीचा खूप महत्त्वाचा नियम आहे.
दुसरा नियम म्हणजेच पाणी कधीही घाईघाईने पिऊ नये. पाणी पीत असताना पाणी एकदम सावकाशपणे प्यायला पाहिजे. आणि पाणी पीत असताना पाणी नेहमी खाली बसूनच प्यावे. उभा राहून पाणी पिल्याने तुम्हाला गॅस, चपाचे क्रिया पचनक्रिया यासारख्या गोष्टींमध्ये त्रास होऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. कारण उन्हाळयात आपल्या शरीरातली पाणी कमी होऊन शरीर डीहायड्रेट होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी प्यावे.
उन्हाळ्यात साध्या पाण्याने तहान भागत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण थंड पाणी पिण्यासाठी फ्रीजमधले पाणी पितो असं न करता साधं पाणी प्यावं. त्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते आणि अतिरिक्त चरबी वाढते. त्यामुळे माठातले पाणी पिणे योग्य ठरते. पाण्यात जर तुळशीची पाने, पुदिन्याची पाने, कधी संत्र्याची साल अशा गोष्टी टाकल्या तर ती आपल्या शरीराला फायद्याचे ठरू शकते.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. याउलट जेवणाआधी अर्धा ते एक तास आधी पाणी प्यावे. आणि नंतर जेवण करावे. आणि जेवणानंतर साधारणतः एक ते दीड तासानंतर पाणी प्यावे. आणि सूर्योदयानंतर म्हणजेच सायंकाळी सात नंतर पाणी पिण्याचे प्रमाण कमी असावी. पाणी पिण्याविषयीच्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर वजन कमी करणे तुम्हाला नक्कीच मदत होईल.
2. खाण्याची सवय.
तुमच्या जेवणामध्ये तुम्ही काय खावे काय नाही हे सगळं तर आहेच पण तुम्ही ते कोणत्या पद्धतीने खात आहात. ते खाना देखील म्हणजेच अन्न देखील चावून चावूनच खाल्लं गेलं पाहिजे. म्हणजे जेवताना घाई गडबड करू नये. जर तुम्ही टीव्ही किंवा मोबाईल पाहत जेवण करत असाल तर ते टाळा. असं न करता तुम्ही जेवण करत असताना अतिशय सावकाशपणे जेवण केले पाहिजे. असं केल्याने तुम्हाला ते व्यवस्थित रित्या पचन होते. आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही.
या सगळ्याबरोबर तुम्ही बाहेरचे पदार्थ म्हणजेच बेकरी पदार्थ, हाय कॅलरी फुड, गोड पदार्थ खाऊ नये. डायट करणे म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की उपवास करणे पण याचा अर्थ असा नाही. डायट म्हणजे संतुलित आहार घेणे.
3. सतत कार्यक्षम राहणे.
बरेच जण सकाळी व्यायाम करतात, काही योगा करतात, तर काहीजण सकाळी चालायला जातात. सकाळी एक तास भरपूर व्यायाम करतात परंतु दिवसभराचा त्यांचं काम बसून आहे. किंवा सकाळी व्यायाम केला म्हणून दिवसभर काहीच करण्याची गरज नाही. असं बऱ्याच जणांना वाटतं पण असं नाही. आपल्या शरीराला दिवसभर हालचाल करण्याची गरज असते. कारण आपण बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहिलो तर आपण कार्यक्षम आहोत असं म्हणता येत नाही.
दिवसभरात तुम्ही कुठे बाहेर गेलात तर लिफ्ट चा वापर कमीत कमी करा त्या जागी पायऱ्यांचा वापर करा. प्रत्येक ठिकाणी गाडीने जाणे टाळा. तुम्हाला जिथे जिथे शक्य असेल अशा ठिकाणी चालत जाण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला दिवसभर कार्यक्षम राहण्यासाठी मदत होईल. आणि तुमचे वजन देखील कमी होण्यास मदत होईल.
4.पुरेशी झोप.
पुरेशी झोपलेला हे देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. आपल्या शरीराला कमीत कमी सहा ते सात तास झोपेची गरज असते. जर आपण झोप कमी घेतले तर आपल्या शरीरातील त्रेस हार्मोन्स रिलीज होतात. आणि त्यामुळे देखील आपले वजन वाढते. आणि ट्रेस वाढल्यामुळे आपल्याला भूक देखील लागते. आणि जास्त खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे हे ट्रेस हार्मोन्स वाढू नयेत म्हणून सात ते आठ तासाची शांत झोप घेणे गरजेचे आहे आणि याचा फायदा देखील तुमच्या आरोग्याला होतो.
परंतु सात ते आठ तासाचे झोपेत असताना या झोपेत दुपारच्या झोपेचा समावेश करू नये. कारण जर आपण दुपारी झोप घेतली तर सकाळी केलेला व्यायाम, संतुलित आहार याचा काहीच उपयोग होत नाही.
5. लवकर वजन कमी करणे.
लवकर वजन कमी करण्याच्या मागे तुम्ही लागू नका. कारण एवढ्या झपाट्याने वजन कमी केल्याने वजन पुन्हा वाढण्याची शक्यता असते. वजन कमी करणे ही प्रक्रिया एक हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. जर तुमचे वजन हळूहळू कमी झाले तर कायमस्वरूपी तसेच राहू शकते. आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
तर मित्रांनो हे होते वजन कमी करण्यासाठी काही टिप्स (weight loss tips) वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की पाठवा.
धन्यवाद.