Home remedies for acidity-आम्लपित्त होऊ नये म्हणून घरगुती उपचार.

Home remedies for acidityHome remedies for acidity:ऍसिडिटी ज्याला आपण मराठीमध्ये आम्लपित्त असे म्हणतो. सध्या बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा त्रास आहे. लोकांना या ऍसिडिटीचे खूप वेगळे वेगळे लक्षण जाणवतात कुणाला छातीत जळजळ होतं, कुणाकुणाला मळमळ होते, कुणाच डोकं अतिशय दुखायला लागतं मग उलटी होते.आणि उलटी झाली की बरं वाटतं, काही लोकांना अंगावरती फोड येतात ,तोंडाला आंबट पाणी येतो.हे लक्षणे छोटे छोटे वाटत असली तर ती खूप त्रासदायक असतात.

ऍसिडिटी होऊ नये म्हणून कोणते पदार्थ खावेत म्हणजेच ऍसिडिटी वर घरगुती उपचार याविषयी आपण आज या लेखातून बघणार आहोत.

आम्लपित्त होऊ नये म्हणून घरगुती उपचार. (Home remedies for acidity)

  1. तुळशी.
  2. बडिशेप.
  3. दालचिनी.
  4. जिरे.
  5. आद्रक.
  6. पुदिना.
  7. आवळा.
  8. दूध.

1. तुळशी
ऍसिडिटी साठी सगळ्यात पहिला उपचार म्हणजे तुळस. तुळशी नॅचरल Antacid आहे. तुळशीमध्ये शरीरामध्ये जर कुठे सूज असेल, शरीरामध्ये जर कुठे जखम असेल जसं की पोटातला अल्सर जर ऍसिडिटीमुळे अल्सर झाला असेल तर आणि सूज आली असेल तर हे सगळं बरे करण्याचे गुणधर्म तुळशीमध्ये आहेत.

दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीचे पानं खाल्यावर आपल्या जठरामध्ये म्युकस तयार होतो. या म्युकस मुळे पोटातलं ऍसिड न्यूट्रीलाईज व्हायला मदत होते. त्यामुळे सुद्धा आपली ऍसिडिटी कमी होते.

तुळस कशी खायची तर तुम्ही हे तुळस पाण्यात घालून उकळू शकता आणि ते उकळलेलं पाणी तुम्ही दिवसभर पिऊ शकता. किंवा जेवणानंतर तुम्ही चार-पाच तुळशीची पानं चावून खाऊ शकता. त्याचा रस तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते.

2.बडिशेप
बडीशेप हे नॅचरल Antacid आहे. बडीशेप मध्ये पाचक द्रव्य असतात. बडीशेप मुळे तुमच्या पित्त कमी व्हायला मदत होते आणि तुमच्या खाल्लेला अन्न देखील व्यवस्थित पचते.

तुम्ही जेवणानंतर एक चमचा बडीशेप खाऊ शकता किंवा बडीशेप पाण्यामध्ये भिजवून ते पाणी पिऊ शकता.

3. दालचिनी.
दालचिनी सुद्धा नॅचरल Antacid आहे. दालचिनी मध्ये जखम बरी करणे,सूज कमी करणे, तसेच इन्फेक्शन दूर करणे हे गुणधर्म आहेत. त्यामुळे पोटामध्ये ऍसिडिटीमुळे जर काही जखमा झाल्या असतील, सूज आली असेल,लालसरपणा आला असेल तर तो दालचिनीमुळे कमी व्हायला मदत होते.

दालचिनी मध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स आहेत, विटामिन आहेत म्हणून ओव्हरऑल आपल्या सगळ्या तब्येतीसाठी दालचिनी चांगलीच असते. तर तुम्ही जेवण झाल्यावर दालचिनीचा एक छोटा तुकडा चगळू शकता. किंवा चिमूटभर दालचिनी पावडर कोमट पाण्यातून उपाशीपोटी जर तुम्ही घेतलं तर तुमची ऍसिडिटी कमी व्हायला जरूर मदत होईल.

4. जिरे
जिरे सुद्धा नॅचरल Antacid आहे. त्याच्यामुळे पदार्थाची चव सुद्धा वाढते,त्यामुळे आपली भूकही वाढते. जिऱ्यामध्ये पाचक गुणधर्म आहेत त्यामुळे तुम्ही जिऱ्याचे पाणी पण पिऊ शकता.

एक चमचा जिरे दोन कप पाण्यामध्ये उकळून ते पाणी एक कपाचे होईपर्यंत उकळवून नंतर ते प्यावे त्याने ऍसिडिटी कमी व्हायला मदत होईल. ज्या ज्या वेळी तुम्ही राजमा किंवा असं हे पचायला हेवी असलेला अन्न घेता त्यावेळी तुम्ही जिऱ्याचं किंवा बडीशेप चे पाणी पिऊ शकता. त्याने ते पचायला देखील मदत होते.

5. आद्रक.
अद्रकामध्ये सुद्धा पचन गुणधर्म आहेत हे सुद्धा नॅचरल Antacid आहे. त्यामुळे तुमचं तोंड जर कडू पडला असेल तर तुम्ही हा चक्र घेऊ शकता. त्यामुळे तुमची भूकही वाढेल आणि अन्नाचा चांगलं पचनही होईल. आणि तुमची ऍसिडिटी कमी व्हायला मदत होईल.

अद्रक पासून पाचक रस करता येतो या आद्रकाचं छान साखर घातलेलं पाचक करता येतं. हे जर तुम्ही घरात करून ठेवलं तर जेवणानंतर तुम्ही हे घेऊ शकता. किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला ऍसिडिटी होईल तेव्हा तेव्हा तुम्ही हे घेऊ शकता. हा पाचक रस किंवा हे आल्याचं पाचक कसं बनवायचं हे तुम्ही सोशल मीडियावर सर्च करून बघू शकता.

6. पुदिना
पुदिना सुद्धा नॅचरल Antacid आहे. पुदिना हा पोटाला थंडावा देतो. तुम्हाला जर ऍसिडिटी मुळे पोटात,छातीत, घशामध्ये जळजळ होत असेल तर ती पुदिना खाल्ल्याने कमी होते. त्यामुळे पचन सुद्धा व्यवस्थित व्हायला मदत होते.

जेवणानंतर दोन-तीन पुदिन्याची पानं खाऊ शकता. किंवा तुम्ही लिंबू शरबत सोबत पुदिन्याची पानं घेऊ शकता. जिऱ्याच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही पुदिन्याची पानं घालून ते पाणी पिऊ शकता.

7. आवळा.
आवळा खाल्ल्याने पचनही सुधारतं. गॅसेस कमी व्हायला मदत होते. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असल्यामुळे तुमचे ओव्हरऑल इम्युनिटी सुद्धा सुधारायला मदत होते.

तुम्ही हे आवळा कशा प्रकारे घेऊ शकता तर तुम्ही आवळ्याची सुपारी म्हणजे ओवा घालून जिरेपूड ओवा घालून तुम्ही आवळ्याचे सुपारी करून ठेवू शकता.
आवळ्याची सुपारी तुम्ही जेवणानंतर खाऊ शकता.किंवा तुम्ही आवळा कॅन्डी खाऊ शकता, किंवा तुम्ही आवळ्याचा तयार जो रस मिळतो तो रस घेऊ शकता. त्याच्यामुळे तुमचा पचनही सुधारेल,विटामिन सी मुळे इम्युनिटी पण सुधारेल ,आणि तुमची ओव्हरऑल हेल्थ सुधारेल आणि ऍसिडिटी तर कमी होईलच.

8. दूध
तुम्हाला जर खूप ऍसिडिटी झाली असेल तर रोज झोपायच्या आधी अर्धा कप थंड दूध पिऊन तुम्ही जर झोपला तर तुमच्या ऍसिडिटी कमी व्हायला मदत होईल.

त्याचबरोबर तुम्ही कोकम शरबत, नारळ पाणी किंवा गुलकंद हे सगळे घरगुती औषध आहेत. तुम्ही हे जर तुम्ही घेतले तर तुमचे पोटाला थंड वाटेल आणि ऍसिडिटी कमी व्हायला मदत होईल.

ऍसिडिटी का होते?

आपल्या काही चुकीच्या सवयीमुळे आपल्याला ऍसिडिटी होते. जसं की रात्री जेवल्यानंतर लगेच झोपणे. किंवा रात्री उशिरा जेवणे. यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होते.

भूक लागलेली असली तरी जेवण न करणे किंवा बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे, मसाल्याचे पदार्थांचे सेवन जास्त करणे, आणि याचबरोबर व्यायामाचा अभाव असणे. या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते.

मित्रांनो हे होते ऍसिडिटी कमी करण्यासाठी घरगुती उपचार (Home remedies for acidity)किंवा ऍसिडिटी कमी करण्यासाठी काय खावे. तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्र मध्ये केली पाठवा.

Leave a Comment