heath benefits of carrot-गाजर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

heath benefits of carrot: आज आपण गाजर या फळाविषयी  किंवा या फळभाजी विषयी महिती बागणार आहोत.  हिवाळ्याचे दिवस चालू झाले की आपल्याला ही लाल लाल गाजर सर्वत्र दिसून येतात. आणि ही लाल लाल गाजर पाहिल्यानंतर आपल्याला खायचा मोह आवरत नाही. हेच लाल गाजर आपल्या घरातील लहान मुलांना शक्यतो आवडत नाहीत.

पण या गाजराचा हलवा किंवा गाजराचा मुरब्बा अशा प्रकारचे पदार्थ बनवून आपण आपल्या मुलांच्या आहारात याचा समावेश करू शकतो. आणि ह्याच समावेश आपल्या किंवा आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी फारच लाभदायक ठरतो.

गाजरामध्ये एवढे विटामिन्स असतात किंवा एवढे उपयुक्त घटक असतात जे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी तसेच आपल्या आरोग्यासाठी फारच फायद्याचे ठरतात.  चला तर मग हे गाजर आपल्यासाठी कसं फायद्याचा आहे ते आपण पाहूयात.

 

गाजर खाण्याचे फायदे. (heath benefits of carrot)

  1. डोळ्यांसाठी उपयुक्त.
  2. तोंड आलेला असेल तर त्यावर गुणकारी.
  3. पोटातील किटाणू घालवण्यास मदत करते.
  4. तरुण दिसण्यासाठी मदत होते.
  5. रक्त शुद्धीकरण करते.
  6. अर्धशिशी बरी होण्यास मदत होते.
  7. जखम बरी होण्यास मदत होते.

 

1.डोळ्यांसाठी उपयुक्त.

आपल्या डोळ्यांसाठी हे गाजर फारच उपयुक्त आहे. आपल्या डोळ्याची दृष्टी व्यवस्थित रहावी किंवा आपल्या डोळे व्यवस्थित काम करावेत यासाठी आपल्या शरीरामध्ये विटामिन ए असणे हे खूपच गरजेचं आहे. आणि ह्याच विटामिन ए चा उत्तम सोर्स म्हणजे गाजर.

गाजरामध्ये विटामिन a हे खूप भरपूर प्रमाणात आढळून येतं. आणि म्हणूनच आपण जर नियमित आहार मध्ये एक गाजर ठेवलं तर आपल्या डोळ्याला चष्मा कधीच लागणार नाही.

आज आपण पाहतो लहान मुलं ही मोबाईल मध्ये किंवा टीव्हीमध्ये एवढी गुंतलेली असतात की बऱ्याच मुलांना अगदी सात ते आठ वयोग वर्षापासून चष्मे लागतात. आणि हाच मुलांच्या डोळ्याचा चष्मा जर काढायचा असेल तर त्यांच्या आहारामध्ये तुम्ही नियमित गाजराचा समावेश करा. पंधरा दिवस गाजराचा नित्य नियमाने सेवन केलं तरलहान मुलांचा चष्मा किंवा आपला देखील चष्मा जाण्यासाठी किंवा आपला नंबर जाण्यासाठी मदत होईल.

2.तोंड आलेला असेल तर त्यावर गुणकारी.

आपलं तोंड आलेला असेल तोंड आलेला म्हणजे आपली उष्णता बाहेर पडण्याचा हा एक प्रकार आहे. तोंड आलेला म्हणजे आपल्या ओठाच्या ठिकाणी आपल्याला विविध फोड येतात आणि हे फोड आपल्याला पाणी देखील पिऊन देत नाहीत.

अशाप्रकारे जर तोंड आलेला असेल तर त्या तोंडासाठी देखील  गाजराचा फारच फायदा होतो. तुम्ही घरी आजमावून पहा मी सांगितलेला उपाय याने तुमचं तोंड जायला खरंच खूप फायदा होणार आहे. ज्यांचं तोंड आलेला आहे अशा व्यक्तींनी दिवसातून एक वेळ जरी गाजराचा ज्यूस घेतला तर दोन ते तीन दिवसात तोंड येण्यावर  फरक पडलेला आपल्याला बघायला मिळेल. आपले जे फोड असतात ते पूर्णपणे या गाजराच्या ज्यूसने नाहीसे होतात.

3. पोटातील किटाणू घालवण्यास मदत करते.

तसेच तिसरा महत्त्वाचा फायदा जर पाहायचा झाला तर पोटातील किटाणू घालवण्याचे काम हे गाजर करतात. गाजरामध्ये फायबर्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि याच गाजराच्या सेवनाने आपलं पोट साफ होण्यासाठी मदत होते. तसेच रक्त शुद्धीकरणासाठी देखील हे गाजर फारच फायद्याचा आहे.

आपण पाहतो की आपली मुलं ही गोड पदार्थांचे सेवन जास्त करतात आणि त्याचा परिणाम म्हणजे मुलांच्या पोटामध्ये विविध विकार होतात किंवा पोट दुखीचा त्रास होतो. त्यामुळे जंतनाशकाचा औषध डॉक्टर वारंवार सहा महिन्याला घ्यायला सांगतात. पण या उलट जर आपल्याला जर ते घेण्यात नाही आलं किंवा आपण ते घेऊ शकलो नाही तर फक्त गाजराच सेवन हे देखील यासाठी फारच उपयुक्त ठरतं.

आपल्या मुलांच्या आहारात हे गाजर वरचेवर ठेवा याने आपल्या मुलांच्या पोटामध्ये किटाणू होणार नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचे पोटाचे विकार आपल्या मुलांना होणार नाही. फक्त जेवणाच्या अगोदर एक गाजर किसून किंवा एक गाजर त्याला चावून खायचं सांगा यांनी आपल्या मुलांच्या पोटाला फारच आराम भेटतो. आणि त्याची पचनक्रिया ही फारच सुरळीत व्हायला मदत होते

4. तरुण दिसण्यासाठी मदत होते.

गाजराचा एक महत्त्वाचा फायदा तो म्हणजे तरुण दिसण्यासाठी किंवा वाढत्या वयाला थांबवण्याचे काम हे गाजर करतात. हे अगदी आपल्या डोक्याच्या केसापासून तर आपल्या पायाच्या नखा पर्यंत संपूर्ण अवयवासाठी फारच फायद्याचा आहे. आपला चेहरा हा तुकतुकीत दिसावा किंवा आपण तरुण दिसावेत असं जर आपल्याला वाटत असेल तर गाजराचा ज्यूस किंवा गाजराचा रस हा नियमित आपल्या आहारामध्ये किंवा डायट मध्ये असायला पाहिजे.

तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर त्या पूर्णतः नाहीशा व्हायला मदत होते. तसेच आपल्या चेहऱ्याची चमक ही खूपच चांगली राहते. कारण गाजरामध्ये बीटा कॅरोटीन हे खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि तसंच विटामिन सी चे प्रमाण देखील या गाजरामध्ये खूप आहे. आणि हेच दोन घटक हे आपल्या शरीरातील सौंदर्यासाठी फारच फायद्याचे आहेत. त्यामुळेच या दोन घटकांचे प्रमाण हे गाजरात जास्त असल्या कारणाने आपण जर आपल्या आहारात किंवा आपल्या खाण्यामध्ये गाजराचा ज्यूस किंवा गाजर ठेवलं तर आपल्या तारुण्यात भर पडायला याने मदत होते.

5. रक्त शुद्धीकरण करते.

असते तर साज रक्त शुद्धीकरणासाठी हे गाजर फारच फायद्याचा आहे. मासिक पाळीच्या वेळी महिलांनी गाजर खाणं हे फारच त्यांच्या फायद्याचे ठरतं. अशावेळी महिलांच्या मासिक पाळी मध्ये रक्तस्रावण किंवा आपल्या शरीरातील घाण बाहेर जाणं ही फारच गरजेचं असतं. परंतु बरेच स्त्रियांचं या काळात ब्लडिंग खूपच कमी प्रमाणात होतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे बायकांचा लठ्ठपणाकडे कल जातो किंवा बायकांचा लठ्ठपणा यामुळे दिसून येतो.

पीरियडच्या वेळी ब्लडिंग व्यवस्थित होण्यासाठी गाजर फारच फायद्यात आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या आहारामध्ये दोन गाजरांचा समावेश जर नियमित ठेवला तर पिरियडच्या वेळी येणाऱ्या समस्या यांचे निराकरण यामुळे होत.आपल्याला वेदना होत असतील किंवा कुठला जर त्रास जाणवत असेल तर तो देखील या गाजराच्या सेवनाने पूर्णतः कमी होतो.

6.अर्धशिशी बरी होण्यास मदत होते.

अर्धशिशीसाठी देखील गाजर फारच फायद्याचा आहे. अर्धशिशीमध्ये बऱ्याचशा लोकांना एवढा त्रास होतो की अगदी काय करावं हे त्यांना सुचत नाही. तर अशा व्यक्तींनी गाजराचा सेवन जर केलं तर ते त्यांच्या फायद्याचा आहे.

7. जखम बरी होण्यास मदत होते.

कापलेल्या आणि भाजलेल्या ठिकाणी गाजराचा फारच फायदा होतो. जर आपल्याला सुरी लागलेली असेल किंवा काही एखादी वस्तू कापलेली असेल तर त्या कापलेल्या ठिकाणी या गाजराचा फायदा होतो. तसेच भाजलेल्या ठिकाणी देखील आपण गाजर वापरू शकतो तर ते कसं काय ते आपण पाहूयात, आपल्याला जर कापलेलं आणि भाजलेलं असेल तर त्यासाठी एक गाजर उकडून घ्या आणि उकडलेले गाजर मॅश करा. त्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट कापलेल्या आणि भाजलेल्या ठिकाणी लावायची.

तुमच्या भाजलेल्या किंवा कापलेला असेल ते पूर्णतः बरं होऊन जाईल. आपण पाहतो की भाजलेल्या ठिकाणी काही वेळानंतर किंवा काही काळानंतर पांढरा डाग  तसेच राहतात. आणि हा पांढरा डाग जवळपास एक ते दीड वर्ष जात नाही तर अशा टाकायला जाण्यासाठी स्मॅश केलेलं गाजर फारच फायद्याचे ठरतं. जर तुम्ही एक महिनाभर लावला तर अगदी महिन्याच्या आत हा डाग पूर्णतः नाहीसा होतो. आणि आपली त्वचा ही पूर्ववत व्हायला मदत होते.

हे झाले गाजर खाण्याचे साधे आणि सोपे फायदे (heath benefits of carrot). त्यानंतर अजून दुसरीही फायदे आहेत ते म्हणजे. गाजर हे कॅन्सर साठी किंवा कॅन्सरला रोखण्यासाठी देखील खूपच फायद्याचा आहे. कारण गाजरामध्ये असणारे फायटोन्स हे कॅन्सरला वाढवणाऱ्या पेशीशी लढण्याचे काम करत. आणि परिणामी आपल्या शरीरात कॅन्सर ची वाढ होत नाही.

म्हणूनच आपल्याला जर कॅन्सर पासून बचाव करायचा असेल किंवा आपल्याला आयुष्यात कॅन्सर होऊ नये असं जर वाटत असेल तर सर्व व्यक्तींनी गाजराचा रस घेणे हे फारच फायद्याचा आहे. आपण गाजराचा रस नियमितपणे दोन आठवडे जर घेतला तर आपल्याला कॅन्सर होणार नाही. अस  शास्त्रज्ञानुसार किंवा संशोधनानुसार सिद्ध झालेला आहे .

हृदय रोगाला रोखण्याचे काम देखील गाजर करतात. हृदयरोगाचा किंवा हार्ट अटॅकचा खतरा रोखू शकतो. तसेच ब्लड प्रेशर सामान्य ठेवण्यासाठी देखील गाजर फारच फायदेशीर आहे. कारण यातील बीटा कॅरोटीन आणि अल्फा केरोटीन हे कोलेस्ट्रुमला विरोध करतं आणि त्यामुळे आपण हार्ट अटॅक या भयंकर आजारापासून वाचू शकतो.

त्यासाठी गाजराचा सेवन हे आपल्या आहारात नियमित असणे फारच गरजेचे आहे. तर अशाप्रकारे ही आरोग्यदायी गाजर आपल्याला खूप सारे फायदे करून देतात. त्यामुळे आपल्या आहारात दोन गाजरांचा समावेश करणं फारच फायद्याचा आहे.

जास्त गाजरांचा सेव्हन  देखील आपल्या शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतो. कारण गाजराच्या आतील जो पांढरा भाग असतो तो खूप गरम असतो. आणि त्याने छाती जळजळ होणे किंवा ऍसिडिटीचा त्रास बऱ्याच जणांना देऊ शकतो. त्यामुळे अगदी जास्तीत जास्त म्हणायला गेलं तरदोन गाजरांचा समावेश हा आपल्या आहारात तुम्ही नियमित ठेवा.

मित्रांनो, हे होते गाजर खाण्याचे आरोग्यदायी फायदे (heath benefits of carrot) तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.

धन्यवाद.

Leave a Comment