health benefits of papaya: आजकाल आपल्या सगळ्यांची लाईफस्टाईल खूप बदलली आहे त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचे आहे. आपल्याला आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या फळांचा समावेश केला पाहिजे. फळातील पोषक तत्वांमुळे आपलं आरोग्य उत्तम व निरोगी राहण्यास मदत होते.
आपण आजच्या या लेखामध्ये पहिल्या फळाबद्दल माहिती बघणार आहोत. पपई कोणी खाऊ नये, तसेच पपई खाण्याची योग्य पद्धत काय आहे, आणि पपईचे फायदे काय आहेत? हे मी तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सविस्तर सांगणार आहे.
आपला पहिला मुद्दा आहे पपई खाण्याचे फायदे आपल्या शरीराला काय होतात. पपईमुळे आपल्या शरीराला असंख्य फायदे होतात. पपई मध्ये कमी कॅलरीज असतात. आणि फायबर जास्त प्रमाणात असते. पपईमध्ये जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये विटामिन ए सी आणि या व्यतिरिक्त फॉस्फोरस, मॅग्नेशियम आणि यासारखे पदार्थ पण असतात.
पपई खाण्याचे फायदे. (health benefits of papaya)
- कमी करण्यासाठी मदत होते.
- दमण्यांना स्वस्त ठेवते.
- सूज कमी होण्यास मदत होते.
- डोळे निरोगी राहतात.
- त्वचा निरोगी राहते.
- केसांसाठी फायदेशीर.
- लिव्हरच्या आजारांवर गुणकारी.
- कॅन्सर पासून बचाव करण्यास मदत होते.
1.कमी करण्यासाठी मदत होते.
पहिला फायदा आहे वजन कमी करण्यासाठी दररोज एक पपई खावी. कारण पपईमध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. पपई मध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही. आणि त्यामुळे अजून कमी करण्यास मदत होते.
2.धमण्यांना स्वस्त ठेवते.
पपई खाण्याचा दुसरा फायदा म्हणजे धमण्यांना स्वस्त ठेवते. पपईत असणारे विटामिन सी अँटीऑक्सिडंट, पोटॅशियम आणि फायबर धामन्याना निरोगी ठेवण्यास मदत करते. कोलेस्ट्रॉल ही कमी करण्यास मदत करते. आणि रक्त प्रवाह सुरळीत ठेवण्यास पपई कारगर असते. त्यामुळे हृदयरोग आणि हार्ट अटॅक पासून बचाव होतो.
3.सूज कमी होण्यास मदत होते.
शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते Papain नावाचे एंजाइम असते. जे एक नैसर्गिक पेन रिलीफ किंवा पेन किलर म्हणून काम करते. त्यामुळे जर तुमचे अंग दुखत असेल, सांधेदुखी असेल तर पपईचा नक्कीच फायदा होईल. त्याच बरोबर तुमच्या शरीरावरती सूज असेल, कुठे जखम झाली असेल तर पपई खाल्ल्याने तुमचे दुखणे जे आहेत ते कमी होते.
4.डोळे निरोगी राहतात.
पपई खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात. पपई मधील विटामिन ई सोबत अजून काही पोषक तत्वे असतात जे आपल्या डोळ्यांना गरजेचे असतात. म्हणूनच डोळे निरोगी राखण्यासाठी पपईचे सेवन अवश्य आपल्या आहारात असले पाहिजे.
5.त्वचा निरोगी राहते.
पाच नंबरचा फायदा बघायला गेला तर तो म्हणजे त्वचा निरोगी राहण्यासाठी. पपईमध्ये विटामिन सी असण्या बरोबरच त्यामध्ये बीटा कॅरोटीन आणि लायकोपिन सारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे आपली त्वचा निरोगी राहते, चमकते आणि वाढत्या वयामुळे त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.
6.केसांसाठी फायदेशीर.
पपई मध्ये मध्ये बीटा कॅरोटीन नावाचे पोषक तत्व असतात. त्यामुळे केसांच्या समस्या पासून मुक्ती मिळते तसेच तुमचे केस घनदाट होतात आणि निरोगी राहण्यास मदत होते. याचबरोबर जर तुम्हाला दांद्रफ चा त्रास असेल तर तोही कमी होण्यास मदत होते.
7.लिव्हरच्या आजारांवर गुणकारी.
पपई लिव्हर साठी खूप उपयुक्त असते. ज्यांना लिव्हरचे आजार आहेत जसे की लिव्हर सोरायसिस आहे, यामध्ये पपई खाल्ल्याने खूप फायदा होतो. यासाठी लिंबाच्या रसासोबत पपईचे सेवन केल्याने लिव्हर सोरायसिस ठीक होण्यास मदत होते.
8.कॅन्सर पासून बचाव करण्यास मदत होते.
कॅन्सर पासून बचाव करते. कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी पपईचे सेवन खूप फायद्याचे ठरते. पपईमध्ये isethionate नावाचा पोषक तत्व आढळतो. जो कॅन्सरचा इलाज आणि बचावासाठी फायदेमंद असतो. म्हणूनच कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी पपईचे दररोज सेवन जेवण करणे गरजेचे आहे.
मित्रांनो असे होते पपई खाण्याचे फायदे (health benefits of papaya) . आता जाणून घेऊया पपई खाण्याची योग्य वेळ काय आहे आणि पपई किती खावी?
डॉक्टरांचे असे मत आहे की पपई ही सकाळी सकाळी अमुशापोटी म्हणजेच सकाळचा नाश्ता चहा घेण्याच्या आधी पपई जरूर खावी. यामुळे शरीराला जास्तीत जास्त फायदा होतो. सकाळी सकाळी पपई खाल्ल्याने पपई मध्ये असणारे सर्व पोषक तत्व जीवनसत्व आपले शरीर शोषून घेते. म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या अनुशापोटी ब्रश केल्यानंतर तुम्ही पपई जरूर खावी.
आता पपई किती खावी तर रोज एक संपूर्ण पपई खाल्ली तरी चालते. कारण पपई मध्ये खूप कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे तुमचे वजन वाढत नाही त्याचबरोबर त्यात असणारे न्यूट्रिशन्स तुमच्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. म्हणूनच रोज एक पपई खाल्ली तरी चालते.पण ज्यांना उष्णतेचा त्रास आहे अशा लोकांनी एक ते दोन फोडी खाल्ल्या तरी चालतात.
चला तर मग आता जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी म्हणजेच अमुशापोटी पपई खाल्ल्याने आपल्या शरीराला काय काय फायदे होतात.
असतात पहिलं म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करते. पपई मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. अशा वेळेस अमुशापोटी पपई खाल्ल्याने शरीरात वाढलेला बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणे मदत होते. पपई शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच घातक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
तसेच पचन संस्थेचे काम सुरळीत करण्यासाठी सहाय्यक आहे. ज्यामुळे पोट बिघडणे, गॅस होणे, पोट साफ न होणे, जळजळ होणे यासारख्या समस्या होत नाहीत.
पपईमध्ये विटामिन ए, विटामिन सी आणि विटामिन के मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुमची इम्युनिटी वाढण्यास मदत होते. आणि तुम्हाला आजारापासून दूर ठेवते. म्हणून तुमचे शरीर रोगमुक्त होते.
# पपई नक्की कोणी खावी आणि कोणी खाऊ नये.
- ज्या लोकांना कोलेस्ट्रॉलचा त्रास होतो अशा लोकांनी पपई नक्की खावी.
- त्याचबरोबर सर्व निरोगी व्यक्तींनीही पपईचे सेवन जरूर करावे.
- ज्यांना बद्धकोष्ठतेचा, अपचनाचा, गॅसचा त्रास आहे अशा लोकांनी पपईचे सेवन नक्की करावे.
- हार्मोन इम्बॅलन्स झाल्यावर पपईचे सेवन केल्याने हार्मोन्स बॅलन्स होण्यास मदत होते.
- ज्यांना डोळ्याच्या समस्या आहेत डोळ्याचे रोग आहेत, अशा लोकांनी पपई खाने खूप उपयुक्त ठरते.
- बीपी चा त्रास असल्यास पपईचे सेवन करावे. पण खूप कमी प्रमाणात ज्यांना बीपीचा त्रास आहे अशा लोकांनी पपई खावी. त्यांना हृदयरोग आहे अशा लोकांनी पपईचे सेवन करावे पण योग्य प्रमाणात डॉक्टरांचा सल्ला घेऊन .
आता बघूयात पपई कोणी खाऊ नये पपई
- हे एक उष्ण फळ आहे त्यामुळे ज्यांना उष्णतेचा त्रास होतो, शरीरावरती फोड येतात, चेहऱ्यावरती फोड येतात किंवा शरीरातील उष्णता वाढली आहे अशांनी पपईचे सेवन करू नये.
- गर्भवती स्त्रियांनी किंवा जे फॅमिली प्लॅनिंगचा विचार करत आहेत. अशा स्त्रियांनी पपई खाऊ नये. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी पपई खाऊ नये. कारण बाळ एक वर्षाचं होईपर्यंत त्याला पपई खाऊ घालू नये.
- किडनी स्टोनचा त्रास ज्यांना होत आहे अशा लोकांनी पपई खाऊ नये. कारण पपई मध्ये जास्त प्रमाणात विटामिन सी आढळते त्यामुळे तो स्टोन मोठा होऊन त्रास अधिक वाढू शकतो. म्हणूनच किडनी स्टोन झालेल्या व्यक्तींनी पपई खाणे टाळावे.
- हृदयरोग असणाऱ्या आणि रक्त पातळ होण्याची गोळी खाणाऱ्या लोकांनी पपईचे सेवन करू नये अशा लोकांनी पपईचे सेवन टाळावे.
मित्रांनो हे होते पपई खाण्याचे फायदे (health benefits of papaya) पपई कोणी खावी, कोणी खाऊ नये, किती खावी, याची सविस्तर माहिती. तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील नक्की पाठवा.
धन्यवाद.