health benefits of fig: मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अंजीर खाण्याचे फायदे तसेच अंजीर कोणी, कधी आणि किती वेळा खावे. तसेच अंजीर कोणी खाऊ नये हे देखील आपण पाहणार आहोत.
चला तर मग सुरुवात करूया अंजीर म्हणजेच फिग या नावाने ओळखले जाणारे फळ आहे. बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध आहे. इतर फळांच्या तुलनेमध्ये हे फळ जरासे महाग आहे परंतु आरोग्यासाठी फारच लाभदायक आहे. हे फळ साधारणपणे चिकूच्या आकाराचे असते.
अंजीरचे झाड हे फार मोठे वाढत देखील नाही. तसेच या फळाला स्वतःचा असा गंध देखील नसतो. आंबा, सफरचंद, स्ट्रॉबेरी, केळी, कलिंगड,चिकू, संत्री अशी फळ कापली तर आपल्याला त्यांचा एक विशिष्ट गंध येतो. परंतु अंजीर या फळाला तसा स्वतःचा फारसा असा गंध नाही. परंतु हे फळ अत्यंत रसाळ आहे म्हणजेच त्याचा जो गर आहे तो रसाळ आहे. हे फळ फोडल्यानंतर ते खाताना त्यामध्ये खूप दाणे असल्याचे आपल्याला जाणवते.
अंजीर फळाचे झाड हे फार प्राचीन झाड आहे. हे फळ सुकवून सुकामेवा म्हणून खाल्ले जाते. अशा या फळाचे फायदे.
आता आपण पाहूया सर्वप्रथम आपण जाणून घेऊया अंजीर या फळांमध्ये पोषक घटक आणि त्यांचे प्रमाण. वैज्ञानिक नाव “फ़िकस कैरिका” असे आहे.अंजीर हे फळ तुर्कस्तान मधून आले असे सांगितले जाते.
साधारणपणे शंभर ग्रॅम मागील पोषक घटकांचे प्रमाण आता आपण पाहूया कॅलरीज 43 ग्रॅम, प्रोटीन 1.3 ग्रॅम, फॅट 0.3 ग्रॅम, कर्बोदके 9.5 ग्रॅम, फाइबर 2 ग्रॅम, पॉली सॅच्युरेटेड फॅट 0.106 ग्राम आणि मोनो सेच्युरेटेड फॅट 0.49 ग्रॅम. याचबरोबरअंजीर या फळांमध्ये विटामिन अ, ब,क हे देखील प्रमाणामध्ये आढळते. आता आपण अंजीर खाण्याचे काय फायदे आहेत. ते जाणून घेऊया.
अंजीर खाण्याचे फायदे. (health benefits of fig)
- रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- रक्त शुद्धीकरणात मदत करते.
- शरीरात फायबर्स वाढवण्यासाठी मदत करते.
- ऊर्जाचा साठा असतो.
- पोट साफ होण्यात मदत करते.
- हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
- त्वचा चांगली राहते.
- रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.
1.रोगप्रतिकारशक्ती वाढते.
सर्वात पहिला फायदा म्हणजे रोग प्रतिकारशक्ती वाढते. शरीराची रोग प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आजार हे आपल्यापासून चार हात दूरच राहतात. अंजीर मध्ये असलेले विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट हे घटक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप मदत करतात. अंजीर अनेक आजारावर गुणकारी अनेक असल्यामुळे त्याचे नित्यनेमाने सेवन केले तर शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते.
अंजिरामध्ये असे कोणते घटक असतात ज्याने प्रतिकारशक्ती वाढते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर अंजीर मध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चालना देणारे विटामिन अ, क पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे काही महत्त्वाचे घटक असतात. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप मदत करतात. त्यामुळे ते शक्य असेल तेव्हा आहारामध्ये अंजीर या फळाचा समावेश करावा.
बाजारामध्ये वर्षभर अंजीर ची फळे मिळतात. त्यामुळे आपल्याला त्याचे सेवन करण्यास काही हरकत नाही.
2. रक्त शुद्धीकरणात मदत करते.
रक्त शुद्धी करण्यासाठी अंजिराचा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. अंजीर हे शरीरातून हानिकारक घटक बाहेर टाकतो त्यामुळे त्याचा फायदा शरीर शुद्धीकरण आणि पर्यायाने रक्त शुद्धीकरणासाठी होतो.
अंजीर रक्तदाब, बद्धकोष्ठता आणि पचनाचे सगळे आजार दूर करण्यासाठी फारच फायदेशीर असे फळ आहे. रक्त पातळ करण्याबरोबरच रक्ताची वाढ करण्याचे काम देखील अंजीर करत असते.
रक्त शुद्धीकरणासाठी सुखी अंजीर आणि अंजीर खाण्याचा सल्ला देखील दिला जातो तसेच योग्य वैद्यकीय सल्ल्यानुसार याचे सेवन केल्यास शरीराला अन्य देखील खूप फायदे मिळतात.
3. शरीरात फायबर्स वाढवण्यासाठी मदत करते.
शरीरासाठी फायबर हे फारच महत्वाचे असते. जर शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये फायबर असेल तर शरीराच्या अनेक प्रणाली या चांगल्या पद्धतीने कार्य करत असतात. अंजिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर आहे. शरीरात जर फायबरचे प्रमाण योग्य असेल तर अर्बट चरबत खाण्याची इच्छा देखील होत नाही.
तसेच त्यांना वजन कमी करायचे आहे अशांना फायबर शरीरात जाणे खूप गरजेचे असते. अंजीर मध्ये डायरेक्टली फायबर 20% असते. याशिवाय अंजिरामध्ये फ्री बायोटिक्स असते म्हणजेच शरीरात चांगल्या बॅक्टेरियाला ठेवण्यासाठी खूप मदत करते. आणि अनावश्यक शरीरातून बाहेर काढून टाकते.
4. ऊर्जाचा साठा असतो.
पुढचा फायदा आहे ऊर्जेचा साठा अंजीर हे नैसर्गिक गोड आणि टेस्टी फळ आहे. या मधे मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक साखर आणि सोल्युबल फायबल असतात. त्यामुळे अंजिराचे सेवन केले तर शरीराला तरतरी येते.
याशिवाय यामध्ये असलेले पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि कॉपर याशिवाय विटामिन अ आणि क असते. त्यामुळे शरीराला इन्स्टंट ऊर्जा मिळते. अंजीर मध्ये साधारण 200 कॅलरीज असतात. ज्याचे सेवन शरीरासाठी खूप महत्त्वाचे ठरते.
प्रवासामध्ये किंवा कामा दरम्यान खूप थकवा येतो आणि भूक देखील लागलेली असते. पण जवळपास जर काही नसेल तर शरीरातून प्राण निघून जातो. काहीही करायची इच्छा देखील होत नाही. जर आपल्या शरीरातील साखर कमी तर आपल्याला काहीही करावेसे वाटत नाही. अशावेळी डब्यामध्ये अंजीराची फळे किंवा सुखी अंजीर ठेवावी.
5. पोट साफ होण्यात मदत करते.
फार पूर्वी अंजिराचा उपयोग हा पोट साफ करण्यासाठी आणि पचनशक्ती चांगली करण्यासाठी केला जात होता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे फायबरचा साठा अंजिरामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे ते पोटातील मल बाहेर टाकण्यात येणारा अडथळा धूर करत असते. त्यामुळे त्यांना बद्धकोष्ठतेचा किंवा पाईलचा त्रास असेल त्यांनी अंजिराचे आवश्यक सेवन करावे.
आतड्यांमध्ये मलचे खडे झाल्यानंतर ते गुदद्वारातून बाहेर पडताना त्रास होतो . अशावेळी जर अंजीर खाल्ले तर मल नरम करण्यास आणि गुदद्वारातून बाहेर पडण्यास खूप मदत होते. पचनशक्ती वाढवण्यासाठी आणि पोटाचे कार्य सुरळीत करण्यासाठी आवर्जून अंजीर फळाचे सेवन करावे.
6. हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
अंजीर हे हृदयासाठी खूप चांगले आहे.विज्ञानाच्या अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की अंजिराच्या सेवनामुळे हृदयाचे आरोग्य खूपच चांगले राहते. अंजिरामध्ये असलेले अर्क रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. अंजिरामध्ये ओमेगा थ्री असते. त्यामुळे हृदय संदर्भातील आजार दूर राहतात.
जर तुम्हाला हृदयरोगाची समस्या असेल तर तुम्ही वैद्यकीय योग्य सल्ला घेऊन आहारात अंजिराचा समावेश नक्कीच करू शकता.
7. त्वचा चांगली राहते.
अंजिरामध्ये असलेले विटामिन आणि न्यूट्रिएंट्स हे त्वचेमधील आवश्यक घटक सीबम आणि मेल्यानिन आणि त्वचेतील पाण्याची कमतरता अशा समस्यांना दूर ठेवतात.आणि घटकांचे आवश्यक प्रमाण शरीरात ठेवण्यास खूप मदत करत असतात.
अंजीर मध्ये असलेले घटक चेहऱ्यावरील सुरकुत्या, थकवा, अकाली वृद्धत्व यापासून दूर ठेवतात. त्वचा तरुण ठेवण्यास मदत करतात. त्वचेखाली असलेले घटक जर योग्य प्रमाणात असेल तर त्वचा अधिक चांगली राहते. अंजिराच्या सेवनाने त्यांचे प्रमाण योग्य राहते त्यामुळे त्वचा दिवसेंदिवस अधिक चांगली दिसू लागते.
कोणत्याही प्रकारची त्वचा असली तरी देखील त्या त्वचेची निगडित असलेल्या समस्यांना दूर ठेवत त्वचेला आवश्यक घटक पुरवण्याचे कार्य हे अंजीर करते.
8. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.
आपल्या शरीरातील म्हणजेच रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. शरीराला साखरेची आवश्यकता असते. अनेकदा रक्तात साखरेची कमतरता झाली तर देखी शरीर हेलकावे खायला लागते. काहीही खाण्याची इच्छा देखील होत नाही.
साखर वाढू न देणे हे जसे शरीरासाठी गरजेचे आहे तसेच शरीरातील साखर कमी होऊ न देणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी अंजिराचे सेवन केले तर त्यांच्या शरीरातील इन्सुलिनचे कार्य सुरळीत करण्यास मदत होते.
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी त्यांची साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर खाणे फारच फायदेशीर आहे. अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अंजिराचे सेवन करावे. अंजीर नैसर्गिक रित्या गोड असल्यामुळे त्याचा गोडवा आपल्या शरीराला बाधत नाही.
मित्रांनो हे होते अंजीर खाण्याचे फायदे (health benefits of fig), आता आपण पाहूया दिवसातून साधारणपणे किती अंजीर खावे, अंजीर खाण्याचे कोणते दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात,अंजीर खाण्याची योग्य कोणती वेळ असते.
आता आपण पाहूया दिवसातून साधारणपणे किती अंजीर खावे.
सुक्या अंजीर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरीज असतात. जर तुम्ही वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही दिवसातून चार ते पाच अंजीर खाल्ले तरी चालते. परंतु तुम्हाला जर वजन नियंत्रणात ठेवायचे असेल आणि पौष्टिक घटक मिळवायचे असतील तर दिवसातून साधारणपणे दोन ते तीन अंजीर पुरेसे आहेत. आणि त्याचा तुम्हाला त्रास देखील होणार नाही.
अंजीर खाण्याचे कोणते दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात.
तसं पाहायला गेले तर अंजीर खाण्याचे कसे काही दुष्परिणाम नाही. पण जर तुम्ही जर अंजिराचे अति सेवन केले तर त्यामुळे जुलाब देखील होण्याची शक्यता असते. अंजीरचे अति प्रमाणात सेवन पोटाचे आरोग्य बिघडवू शकते. त्यामुळे अंजीर हे योग्य प्रमाणात खाणे फारच गरजेचे आहे.
अंजीर खाण्याची योग्य कोणती वेळ असते
उपाशीपोटी इतर कोणत्याही ड्रायफ्रूट सोबत अंजीरचे सेवन केले जाऊ शकते. सकाळी उठल्याउठल्या खाल्ले तर याचा अधिक फायदा शरीराला मिळतो. तसेच पोट देखील भरल्यासारखे वाटते. त्यामुळे आपण चरबत खाण्याची इच्छा देखील होत नाही. तसेच रात्री जेवणानंतर जर गोड खायची असेल तर एक ते दोन अंजीर खाल्ले तरी चालतात.
मित्रांनो वरील माहितीमध्ये मी तुम्हाला अंजीर खाण्याचे फायदे (health benefits of fig) आणि अंजीर कधी खावे, अंजली किती खावे आणि अंजीर खाण्याचे दुष्परिणाम याची सविस्तर माहिती सांगितलेली आहे.जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.
धन्यवाद.