health benefits of dragon fruit: नमस्कार मित्रांनो, फळांचे फायदे बरेच आहेत. आणि आपल्या सगळ्यांना ते माहीतच आहेत परंतु आज मी ज्या फळाविषयी बोलत आहे त्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल त्या बाळाचे नाव ड्रॅगन फ्रुट असे नाव आहे.
ड्रॅगन फ्रुट चा उपयोग शरीराशी संबंधित बऱ्याच विकारापासून सुटका मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो. ड्रॅगन फ्रुट्स अनेक फायदे आहेत. ते जर तुम्ही जाणून घेतल्यावर आपण याला खाद्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही. ड्रॅगन म्हणजे बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय आहे.
ड्रॅगन फळाचे फायदे आणि उपयोग याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे आपल्याला निरोगी ठेवण्यावर साठी तसेच काही शारीरिक समस्यांना मात देण्यासाठी नक्कीच मदत करेल. या फळात विटामिन सी असते, त्याचबरोबर कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न आणि विटामिन बी असते. त्याचबरोबर 90% पाणी सुद्धा असते.
ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे. (health benefits of dragon fruit)
- मधुमेह कमी करण्यास मदत होते.
- रोग प्रतिकारशक्ती वाढते.
- कॅन्सर पासून बचाव होत.
- हाड मजबुत ठेवते.
- गरोदरपणात लाभदायक.
- कोलेस्ट्रॉल आटोक्यात ठेवते.
- त्वचा आणि केस चांगले राहतात.
- वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
- भूक लागते
1. मधुमेह कमी करण्यास मदत होते.
पहिला फायदा म्हणजे मधुमेह रुग्णांसाठी. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ड्रॅगन फ्रुट हे वरदान आहे. मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी ड्रॅगन फ्रुट चे नियमित सेवन केले पाहिजे. त्याचे सेवन केले नाही तुमची साखर कमी होण्यास मदत होते.
2. रोग प्रतिकारशक्ती वाढते.
ड्रॅगन फ्रुट चा दुसरा फायदा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. फळातील विटामिन सी आणि कॅरोटीन ऑइल रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते. व त्याचबरोबर पांढऱ्या रक्त पेशींचे संरक्षण करते. ड्रॅगन फ्रुट चे नियमित सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
3. कॅन्सर पासून बचाव होत.
ड्रॅगन फ्रुट मध्ये अँटी ट्यूमर आणि अँटि ऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. या गुणधर्मामुळे ब्रेस्ट कॅन्सर पासून महिलांचे रक्षण होऊ शकते. त्या फळांमध्ये लयाकोपीन नावाचा घटक असतो जो विटामिन सी बरोबर कॅन्सरचा प्रतिबंध करते. तुम्हाला कॅन्सल पासून दूर ठेवणार मदत करतो.
4. हाड मजबुत ठेवते.
हाड मजबूत ठेवण्यासाठी त्याचबरोबर सांधेदुखीवर देखील ड्रॅगन फ्रुट उपयुक्त आहे. हाडे कमकुवत होण्याची बरीच कारणे असू शकतात. कमकुवत हाडे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. 200 ग्रॅम पर्यंत ड्रॅगन फ्रुट मध्ये 17.6 ग्रॅम इतके कॅल्शियम असते. याने हाडं मजबूत होण्यास मदत होते. सांधेदुखीवर ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरते तसेच. यामुळे दात आणि हिरड्या देखील मजबूत होण्यास मदत होते.
5. गरोदरपणात लाभदायक.
पाचवा फायदा म्हणजे गरोदरपणात लाभदायक. ड्रॅगन फ्रुट मध्ये आयर्न भरपूर प्रमाणात आढळून येते. हे शरीरातील रक्त कमी हो देत नाही. यामुळे शरीरातील रक्तपेशी वाढतात.
याव्यतिरिक्त ड्रॅगन फ्रुट हे फायबर आणि कार्बोहायड्रेट चाही चांगला स्त्रोत आहे. जे गरोदरपणात ऊर्जा देते. तसेच पचन करण्यासाठी ही मदत करते. या फळाच्या सेवनाने गर्भवतीचे हिमोग्लोबिन देखील वाढते.
6. कोलेस्ट्रॉल आटोक्यात ठेवते.
आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते. आज काल कोलेस्ट्रॉलची समस्या खूपच वाढत आहे. ड्रॅगन फ्रुट हे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप मदत करते.
शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅक किंवा स्टॉक होण्याचा धोका असतो. पण ड्रॅगन फ्रुट मधील पोषक घटकामुळे या शक्यता कमी होतात. तसेच यातील बियांमध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स आढळून येते ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यातील लोह रक्ताचे हिमोग्लोबिन वाढवते आणि एनीमियासारखा त्रास होऊ देत नाही. याचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
7. त्वचा आणि केस चांगले राहतात.
त्वचा संबंधित समस्या किंवा केसा संबंधित समस्या असतील तर त्यासाठी ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरते. जर तुम्ही घरी ऑरगॅनिक फेस पॅक बनवत असाल तर आपण ड्रॅगन फ्रुट त्यात घालू शकता. त्यात आढळणारे विटामिन बी 3 कोरड्या त्वचेला ओलावा देण्यासाठी आणि केसांना चमकदार बनवण्यासाठी उपयुक्त ठरते.
ड्रॅगन फ्रुट रोज खाल्ल्याने त्वचा टवटवीत आणि मऊ होते. या फळाच्या मदतीने फेस मास्क किंवा केसांचा मास्क बनवू शकता. चेहऱ्यावरील फोड, सुरकुत्या यांच्यावर ड्रॅगन फ्रुट खूप गुणकारी ठरते. तसंच केसात कोंडा होणे, केस गळती, केसांची चमक कमी होण ह्या समस्यांवरही देखील ड्रॅगन फ्रुट हे रामबाण उपाय ठरते.
8. वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढल्याने अनेक आमंत्रण आमंत्रण मिळते. ड्रॅगन फ्रुट च्या सेवनाने वजन करण्यासाठी किंवा चरबी कमी करण्यात मदत मिळते.
9. भूक लागते.
भूक वाढवण्यासाठी मदत होते. भूक वाढवण्यासाठी ड्रॅगन फळ हे खूप फायदेशीर ठरते ड्रॅगन फळांमध्ये आढळणारी फायबर आणि विटामिन्स पचन कार्यासाठी व पोटाच्या विकारापासून मुक्त होण्यासाठी प्रभावी ठरते. ज्यामुळे भूक वाढते. त्याचबरोबर पोट साफ राहते. ड्रॅगन फ्रुट मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्याने पोट साफ राहण्यास मदत होते.
मित्रांनो हे होते ड्रॅगन फ्रुट्स खाण्याचे फायदे (health benefits of dragon fruit) तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.
धन्यवाद.