Food for lower cholesterol: कोलेस्ट्रॉलचे पातळी जर वाढलेली असेल तर नुसत्या गोळ्या घेऊन चालत नाही. याचबरोबर तुम्हाला तुमच्या किंवा जीवन शैली आणि आहारामध्ये बदल करावे लागतात.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय करावेत? तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणजेच तुम्ही आहारामध्ये असे पदार्थ घ्यायचे ज्या पदार्थांमुळे रक्तातल कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होईल. आणि असे पदार्थ टाळायचे की ज्यांच्यामुळे तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढू शकत.
शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणती पदार्थ खावेत? (Food for lower cholesterol)
- ओट्स आणि अख्ख धान्य.
- फॅटी फिश.
- नट्स आणि बिया.
- लसुन.
- सोयाबीनचे पदार्थ.
- भाज्या आणि फळ.
- कडधान्य.
1.ओट्स आणि अख्ख धान्य.
ओट्स आणि हक्क धान्य यांच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विरघळणारे फायबर्स पाहायला मिळतात. त्यांना आपण सोल्युबल फायबर असे म्हणतो. हे सोल्युबल फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त ओट्स, गहू, बाजरी आणि अख्खी धान्य असायला पाहिजेत.
2.फॅटी फिश
तुम्हाला जर माहीतच असेल मासे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली मानले जातात. पण तुम्ही कोणते मासे खाता आणि कोणत्या पद्धतीने खात आहे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. रावस किंवा बांगडा हे मासे हे फॅटी फिश आहेत याचा तुमच्या हृदयावर चांगला परिणाम होतो. यांच्या मध्ये चांगल्या प्रकारचे फॅटी ऍसिड असतात. त्याचबरोबर ओमेगा थ्री सुद्धा असते.
यामुळे तुमचे खराब कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत होते. त्याचबरोबर चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच एचडीएल कोलेस्ट्राल वाढण्यासाठी देखील याची मदत होते. मासे खात असताना फ्राय न करता उकडलेली किंवा वाफवलेले मासे खाल्ली तर तुमच्या आरोग्याला त्याचा जास्त फायदा होईल.
3.नट्स आणि बिया.
यामध्ये फ्लेक्स सीड बदाम अक्रोड हेम्स सीड यांच्यामध्ये असलेले घटक आपले बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. पण हे खात असताना तुम्हाला ते प्रमाणातच खायचे आहे कारण यामध्ये चांगले घटक असण्याबरोबरच यामध्ये कॅलरी जास्त असतात. त्यामुळे ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे आहे अशा व्यक्तींनी या गोष्टी प्रमाणातच खायला पाहिजेत. जसं की दिवसाला दोन ते तीन बदाम आणि एक ते दोन अक्रोड पर्यंत तुम्ही खाऊ शकता.
4.लसुन
लसुन मध्ये allicin नावाचा घटक असतो तो आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला असतो. त्यामुळे लसूण आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे.
5.सोयाबीनचे पदार्थ.
सोयाबीनचे जे पदार्थ आहेत. सोयाबीन, सोया मिल्क यासारखे सोयाचे पदार्थ. यांच्यामध्ये isoflavones चांगल्या प्रमाणामध्ये असतात. isoflavones मुळे तुमचे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि शरीराला आवश्यक कोलेस्ट्रॉल वाढते. सोया प्रॉडक्ट तुमच्या आहारात समाविष्ट करताना कमीत कमी प्रक्रिया झालेले सोया प्रॉडक्ट समाविष्ट करायला पाहिजे.
6.भाज्या आणि फळ
भाज्या आणि सोय आपल्याला कुठेही उपलब्ध होतात. आपण फळे आणि भाज्या खायला पाहिजे. आपल्या आहारामध्ये आपण हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण जास्त ठेवायला पाहिजे. सर्व प्रकारच्या भाज्यांना मी फळांमध्ये विटामिन्स,मिनरल्स, आणि अँटि ऑक्सिडेंट असतात. यांच्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर देखील असते. फळ खात असताना फळाचा ज्यूस पिण्यापेक्षा खूप फळ खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी कधीही चांगलंच आहे.
7.कडधान्य
कडधान्य आपल्या आहारामध्ये असायला पाहिजेत. कडधान्य खात असताना ते सालासकट असायला पाहिजेत. कारण सालांमध्ये फायबर चांगल्या प्रमाणामध्ये असतात. आणि तुमच्या आहारामध्ये जर फायबर्स असतील तर तुमच्या कोलेस्ट्रॉल चा आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
मित्रांनो आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळते. एक म्हणजे आपण जे पदार्थ खातो त्यांच्यातून मिळणारे कोलेस्ट्रॉल आणि दुसरं म्हणजे आपलं यकृत आपल्या शरीराच्या गरजेनुसार तयार करते ते कोलेस्ट्रॉल.
आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं याच्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. त्यातल्या काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण बदलू शकत नाही. आणि काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये बदल करून आपला हा त्रास कमी होईला मदत होते.
आता बदलता न येणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत ते बघूया.
- सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं वाढलेलं वय हे तुम्ही बदलू शकत नाही. कारण काही काही लोकांना वाढत्या वयानुसार कोलेस्ट्रॉल वाढायचं प्रमाण जास्त झालेलं असतं.
- दुसरी गोष्ट आहे जेंडर. जेंडर म्हणजे काय स्त्रियांमध्ये जोपर्यंत पाळी चालू असते तोपर्यंत म्हणजे साधारण वयाच्या 44 ते 45 वयापर्यंत स्त्रियांना प्रोटेक्शन मिळत असतं. पण Menopause नंतर स्त्रियांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढायचं प्रमाण आपोआपच वाढतं हे तुम्ही बदलू शकत नाही.
- काही काही वंश असे आहेत ज्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त दिसून येतं तेही तुम्ही बदलू शकत नाही.
- चौथा आहे फॅमिली हिस्टरी तुमच्या फॅमिली मध्ये जर कोलेस्ट्रॉल व्हायची टेंडेन्सी असेल तर तो धोका तुम्हालाही असू शकतो. आपण ह्या गोष्टी बदलू शकत.
कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून बदलू शकता येणारे फॅक्टर्स कुठले आहेत ते आता बघूया.
- तर वाढलेलं वजन म्हणजे वजन जर तुम्ही नियंत्रणात ठेवलं तर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी व्हायला मदत होते. 2.तुम्ही जर व्यायामाला सुरुवात केली किंवा व्यायामाचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समावेश केला तर कोलेस्ट्रॉल कमी व्हायला नक्कीच मदत होते.
- आहारामध्ये कुठल्या गोष्टी टाळायच्या आणि कुठल्या गोष्टी घ्यायच्या याच्यावर तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुमच्या शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्यात मदत होते.
- धूम्रपान जर तुम्ही टाळलं तर रक्तातली वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यासाठी मदत होते.
- असे काही लाइफस्टाइल चेंजेस जर तुम्ही वयोमानानुसार केले तर रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणार नाही. जर कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेली असेल तर ती आटोक्यात राहिला. म्हणजे काय तर तुम्ही आहारामध्ये आणि लाईफ स्टाईल मध्ये जर चेंज केला तर तुमची कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी 20 ते 25% पर्यंत कमी व्हायला मदत होते .
मित्रांनो अशी होती कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावे? काय खावे ? (Food for lower cholesterol) याची सविस्तर माहिती. तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.