food for healthy eyes: नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आपले डोळे चांगले राहण्यासाठी कोणता असा आहार आहे जो खूप चांगला असतो. असे कोण कोणते पदार्थ आहेत जे आपल्या डोळ्यांचा आरोग्यासाठी खूप चांगले असतात.
तुम्हाला तर माहितीये की आज काल टेक्नॉलॉजीचा वापर खूप वाढलेला आहे. आणि त्यातच वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट आल्यापासून आपल्याला सर्वांना जे काम आहे ते कुठे कुठेतरी वाढलं पण आहे. आणि आपला खूप सारा वेळ जो आहे तो आपण एक तर लॅपटॉप समोर किंवा मग लॅपटॉप झाला की टीव्ही समोर घालतो. आणि हे झालं की मोबाईल तर असतोच.
पण हे सर्व करत असताना तुम्हाला कधी याचा विचार आलाय का याचा तुमच्या डोळ्यावर काय परिणाम होत असेल त्याचा तुमच्या डोळ्यावर किती ताण येत असेल. तुम्ही एखादी स्क्रीन बघत असाल तर मध्ये मध्ये छोटे छोटे ब्रेक घेणे तर महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी तुम्हाला चांगला आहार घेणे देखील खूप महत्त्वाचा आहे.
आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असणारे त्यामध्ये सर्व जीवनसत्व तर येतात. जसे की विटामिन A B C D त्याचबरोबर बाकीचे जीवनसत्व आहारात असणे खूप गरजेचे आहे.
तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की विटामिन A ची कमतरता झाली तर रात आंधळेपणा किंवा दृष्टी कमी होणे अशा प्रकारच्या डोळ्याच्या समस्या निर्माण होतात.
आपण आजच्या या आर्टिकल मध्ये आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणत्या कोणत्या पोषक तत्त्वांची गरज असते. आणि ते पोषक तत्व कोणत्या पदार्थांमध्ये बघायला मिळतात याची माहिती आपण बघणार आहोत.
आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्व आणि पदार्थ. (food for healthy eyes)
- विटामिन A
- विटामिन E /बदाम
- अंडी आणि मासे
- दूध आणि दुधाचे पदार्थ.
- ड्राय फ्रुट्स
- आवळा
1.विटामिन A
मित्रांनो विटामिन A किंवा त्याला रेटेनॉल सुद्धा म्हटलं जातं. आपल्या डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतं. खास करून लाल, नारंगी आणि पिवळ्या रंगाच्या भाज्या असतात. त्यामध्ये विटामिन A चे प्रमाण चांगले असते. जसं की गाजर, पपई, शिमला मिरची, आंबा अशा जे भाज्या किंवा फळ आहेत ते आपल्या डोळ्यात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात.
2.विटामिन E /बदाम
बादमामध्ये विटामीन E चे प्रमाण खूप चांगल्या प्रमाणामध्ये असते त्यामुळे बदामी आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. विटामिन ई म्हणजे एक प्रकारचं हेल्दी फॅट असं देखील त्याला म्हणलं जातं. बदाम खाल्ल्यामुळे मोतीबिंदूची समस्या निर्माण होत नाही. आणि तुमची दृष्टी सुधारते. तुम्ही रोज दोन ते तीन भिजवलेले बदाम खाल्ले तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.
3.अंडी आणि मासे
अंडे आणि मासे तुमच्या आहारामध्ये असायला पाहिजेत. आपल्या डोळ्यांमध्ये ज्या लेन्स असतात त्यांच्या प्रोटेक्शन साठी ते खूप चांगले असतात. त्यामध्ये प्रोटीन हे मात्र खूप चांगल्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे आपल्या डोळ्यात असलेल्या लेन्सची सुरक्षा होते आणि त्याचबरोबर आपले दृष्टी चांगली राहते.
यामध्ये ओमेगा थ्री ऍसिड ची मात्रा खूप चांगल्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे ते आपल्या डोळ्याची रेटिना याची सुरक्षा आणि त्याचे काम सुरळीत चालण्यासाठी मदत करतात. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये अंडी आणि मासे असायला पाहिजे.
4.दूध आणि दुधाचे पदार्थ.
दुधामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटामिन D याबरोबरच विटॅमिन A ची मात्र देखील मुबलक प्रमाणामध्ये असते. त्यामुळे दूध आणि दुधाचे पदार्थ आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे. जसं की दूध, दही, पनीर, ताक आणि याबरोबरच योग्य प्रमाणामध्ये तूप देखील तुमच्या आहारामध्ये असायला पाहिजे.
5.ड्राय फ्रुट्स
बदामा बरोबरच तुमच्या आहारामध्ये इतर ड्रायफ्रूट्सचा देखील समावेश असायला पाहिजे. ते तुमच्या डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. मध्ये तुम्ही अक्रोड, अंजीर, पिस्ता यासारखे पदार्थ खाऊ शकतात. तुमच्या डोळ्यांबरोबरच तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील महत्त्वाचा ठरतो कारण ते कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतात.
6.आवळा
आवळा देखील आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा ठरते. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ताजा म्हणजेच डायरेक्टली झाडाचा तोडलेला आवळा खाऊ शकता. किंवा तुम्हाला जर शक्य होत नसेल तर तुम्ही त्याचा ज्यूस देखील देऊ शकता. त्यामध्ये विटामिन C बरोबरच विटामिन A ची थोडी मात्र असते. आवळा खाल्ल्याने आपल्या डोळ्यात असणारा रेटीना चे काम सुरळीत चालण्यासाठी मदत होते.
मित्रांनो हे होते आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असणारे पदार्थ (food for healthy eyes). तुम्हाला वरील सर्व माहिती नक्कीच आवडली असेल माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील नक्की पाठवा.
धन्यवाद.