food for healthy bone: आपण आज अशी अन्नपदार्थ बगणार अहोत ज्याने हाडांची बळकटी वाढते आणि हाडे मजबूत होतात. आधी आपण समजून घेऊयात की हाड म्हणजे नक्की काय. हाड म्हणजे अशा पेशी आहेत ज्या आपल्याला स्केलेटन बनवायला म्हणजे आपला सापळा बनवण्यासाठी मदत करतात. आपल्याला सपोर्ट करतात, आपल्याला एक स्पेसिफिक शेप देतात, एक आकार देतात आणि आपल्याला मुव्हमेंट साठी एका जागेवर दुसऱ्या जागे जाण्यासाठी मदत सुद्धा करतात.
आपले स्वास्थ चांगले राहण्यासाठी हाडांची बळकटी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जर हाड बळकट नसतील तर मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्वांची कमतरता असते. फ्रॅक्चर मुळे हाडे मोडण्याचे जास्त शक्यता होऊ शकते.
त्यासाठी आपल्या आहारामध्ये असे अन्नपदार्थ आपल्याला जास्त घेणं आवश्यक आहेत जे आपल्या हाडांना बळकट ठेवतील. तर पाहूया कोणत्या अन्नपदार्थ आपल्या शरीराला फार आवश्यक आहेत जेणेकरून आपली हरडे बळकट होण्यास मदत होते.
हाडं बळकट ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची पोषक तत्वे आहेत प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन D आणि दुसरे मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे इतर पोषक तत्वे.
हाडांच्या मजबुतीसाठी लागणारे पदार्थ किंवा घटक. (food for healthy bone)
- प्रोटीन
- कॅल्शियम
- विटामिन D
1. प्रोटीन
आपल्या हाडाच्या मजबूती साठी दिवसभरामध्ये एका इंडियन प्रौढ व्यक्तीने 50 ते 60 g प्रोटीन्स घेणे आवश्यक आहे. प्रथिनांमध्ये सर्वात महत्त्वाचे अन्नपदार्थ आहेत दुध आणि दुधाचे पदार्थ. नॉनव्हेज मध्ये चिकन, अंडी किंवा मासे. आणि त्यानंतर आहेत उसळी, कडधान्य, नाचणी आणि ड्राय फ्रुईट्स म्हणजे की सुकामेवा आणि काही सीडस ज्या आहारामध्ये आपण जर जास्त प्रमाणात घेतल्या तर आपण 50 ते 60 ग्रॅम प्रोटीन रोजच्या रोज घेऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट करणे खुप गरजेचे आहे.
2. कॅल्शियम
हाडांच्या बळकटीसाठी दुसरे महत्त्वाचे पोषक तत्व म्हणजे कॅल्शियम आहे. आपल्या शरीराला दिवसाला 800 मिलिग्रॅम कॅल्शियम लागते. जेणेकरून तुमच्या हाडांची बळकटिंग खूप चांगली राहू शकते. हाडे मजबूत राहू शकतात.
कॅल्शियम कुठल्या कुठल्या अन्नपदार्थांमध्ये जास्त आहे. सर्वात महत्त्वाचा आहे नाचणी म्हणजे ज्याला आपण रागी म्हणतो. पांढरे तीळ किंवा काळे तीळ यामध्ये कॅल्शियम जास्त आहे. सर्व दुधाचे पदार्थ. दूध दुधाचे पदार्थ ताक, दही, पनीर यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप चांगला आहे. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही अंडी किंवा चिकन किंवा मासे याचाही समावेश करू शकता. या गोष्टी जर तुम्ही आहारामध्ये घेतल्या तर तुमची कॅल्शियमची कमतरता भरून निघते.
3. विटामिन D
सर्वात महत्त्वाचा स्त्रोत आहे विटामिन D साठी योग्य प्रमाणामध्ये मुबलक प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश मिळणे. तुमच्या शरीराच्या स्किन वरती जेव्हा योग्य प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश पडतो तेव्हा ऍक्टिव्ह फॉर्म विटामिन D तयार होतो. आणि तो कॅल्शियम अब्सर्न्शन ला मदत करतो. ज्याने हाड बळकट होतात. म्हणून विटामिन D मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश.
अन्नामध्ये जर आपण पाहिलं तर कुठल्या पदार्थांमध्ये विटामिन D मिळू शकतो. तर फिश ऑइल किंवा मासे खावे. याचा दुसरी गोष्ट आहे सीड्स किंवा आपण जे तेल वापरतो तो त्याच्यातून. आपल्याला विटामिन D योग्य प्रमाणात मिळण्यासाठी योग्य प्रमाणात फॅट्स किंवा गुड क्वालिटी फॅट्स मिळणं पण आवश्यक आहे. ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मुळे आपल्या शरीरात विटामिन डी चे योग्य प्रमाणामध्ये शोषण केले जाते.
मित्रांनो हे होते आपल्या हाडाच्या मजबुतीसाठी लागणारे अन्नपदार्थ. नुसता पोषक आहार किंवा आपल्या हाडांसाठी लागणारा आहार घेतल्याने हाड मजबूत होत नाहीत. त्यासाठी तुम्हाला जे आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी अनावश्यक गोष्टी करणे किंवा खाणे हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे.
आपली हाडांचे मजबूती टिकवण्यासाठी कोणते पदार्थ खाऊ नाहीत.
- फास्ट फूड, स्नॅक्स, तेलकट पदार्थ, खारट पदार्थ, चरबी वाढवणारे पदार्थ या गोष्टी सतत खाणे टाळावे.
- चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंक्स वारंवार पिऊ नयेत.
- तंबाखू, सिगारेट आणि मध्यापान या गोष्टींपासून दूर राहावे.
यावरील गोष्टी बरोबरच तुम्ही आपल्या शरीराच्या मजबुतीसाठी किंवा हाडांच्या मजबुतीसाठी (food for healthy bone) रोज सकाळी व्यायाम किंवा प्राणायाम किंवा योगासने करणे गरजेचे आहे.
वरील सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी केल्या तर तुम्हाला तुमचे हाडं मजबूत करण्यासाठी नक्कीच मदत होईल.
मित्रांनो तुम्हाला वरील सर्व माहिती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.
धन्यवाद.