benefits of walking daily : नियमित चालण्याचे फायदे.

benefits of walking daily: मित्रांनो निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. व्यायाम हा चालणे, पळणे, स्विमिंग, सायकलिंग, वेटलिफ्टिंग, योगा अशा अनेक प्रकाराने करता येतो. यामध्ये सर्वात सोपा व्यायाम प्रकार कोणता म्हणजे तर, तो चालण्याचा व्यायाम आहे.

दिवसभरात जर कामाच्या निमित्ताने सतत चालणे होत असेल. तर त्यालाच व्यायाम समजणार हे चुकीचं आहे. व्यायामासाठी योग्य पद्धतीने चालण्याला ब्रिस्क वॉकिंग असे म्हणतात. ब्रिस्क वॉकिंग म्हणजे काही वेगळं नसून तो वेगवान चालण्याचाच एक भाग आहे. जॉगिंग आणि पळणे याच्यामधील ही गती असते.

नियमित चालण्याचे खूप फायदे आहेत त्यापैकी सात फायदे मी तुम्हाला आज या आर्टिकल च्या माध्यमातून सांगणार आहे. चला तर मित्रांनो चालण्याचे फायदे आपण नंबर वाईस बघूया.

  1. नियमित चालण्याचे फायदे. (benefits of walking daily)
  • रोग प्रतिकार शक्ती वाढते.
  • हृदयासाठी फायदेशीर.
  • मधुमेह साठी उपयुक्त.
  • वजन आटोक्यात राहते.
  • रक्तपुरवठा सुधारतो.
  • झोप व्यवस्थित लागते.
  • मूड चांगला राहतो.

 

1.रोग प्रतिकार शक्ती वाढते.

सध्या रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यावर अधिक भर दिला जात आहे. त्यासाठी चालणं हा उत्तम व्यायाम आहे. चालल्याने रक्तातील पांढरा रक्त पेशी (WBC) वाढतात. त्यामुळे रोग  प्रतिकारशक्ती वाढते  कोणत्याही रोगाचा सामना करण्यासाठी शरीर सज्ज होत. आणि आपल्या शरीराला कोणत्याही रोगापासून लढण्यास मदत मिळते.

2.हृदयासाठी फायदेशीर.

सकाळी चालण्याचा सर्वात मोठा फायदा मिळतो तो आपल्या हृदयाला. सकाळी नियमित चालण्याने तुमचे हृदय अधिक मजबूत होते. आणि हृदय संबंधित आजार होण्याचा धोका देखील कमी होतो. यांना हृदयाचा आजार आहे त्यांना डॉक्टर सुद्धा चालण्याचा सल्ला देतात. चालल्यामुळे रक्तप्रवाह चांगला आणि सुरळीत राहतो त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. आणि ह्रदयाचे आजार कमी होण्यास मदत होते .

3. मधुमेह साठी उपयुक्त.

मधुमेह हा अनियंत्रित जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. परंतु सकाळी चालण्यामुळे तुम्ही हा आजार काही प्रमाणामध्ये नियंत्रणात आणू शकता. केवळ सकाळी अर्धा तास चालण्याने रक्तातील साखर नियंत्रित होऊन मधुमेह आटोक्यात राहण्यास मदत होते. मधुमेध रुग्णांसाठी हा एक चांगला व्यायाम आहे. मधुमेह असणाऱ्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सकाळी व्यायाम करा.

4. वजन आटोक्यात राहते.

वजन कमी करण्यासाठी सगळ्यात सोपा व्यायाम प्रकार म्हणजे चालणे. रोज न चुकता 30 ते 45 मिनिट वेगाने चालण्याने आपण 200 कॅलरीज बर्न होऊ शकतो. म्हणजे चालणे हा वजन कमी करण्याच्या दृष्टीने एक चांगला व्यायाम आहे. म्हणून मित्रांनो नेहमीच चालण्याने आपल्या शरीरात असलेली अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे लठ्ठपणाची समस्या असल्यास चालण्याचा व्यायाम आवर्जून करा त्यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन शरीर मजबूत होईल.

5. रक्तपुरवठा सुधारतो.

चालण्यामुळे आपला हार्ट रेट वाढतो त्यामुळे सर्व अवयवांना व्यवस्थित रक्तपुरवठा होतो. म्हणजेच चालणे हा आपल्या सर्वांना चालणारा व्यायाम आहे. त्यामुळे आपल्या हृदयाची कार्यक्षमता म्हणजेच काम करण्याची शक्ती वाढते. त्यामुळे त्यांना उच्च रक्तदाबाचा आजार आहे त्यांच्यासाठी चालणे हा एक चांगला व्यायाम आहे. दिवसातून केवळ अर्धा तास चालण्याने ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होते.

6. झोप व्यवस्थित लागते.

नियमित चालण्यामुळे रात्री झोप चांगली लागते. तसेच मानसिक ताण-तणावही दूर होण्यास मदत होते. त्यामुळे झोपेची तक्रार असल्यास दररोज सकाळी चालण्याचा व्यायाम चालण्याचा व्यायाम केला तर नक्कीच फायदा होईल. ज्यांना रात्री शांत झोप लागत नाही किंवा ज्यांची सलग झोप होत नाही अशांनी जर नियमितपणे चालण्याचा व्यायाम केला तर झोपेचे प्रमाण वाढते.

7. मूड चांगला राहतो.

चालण्याने आपल्या शरीरातील एंडोरफीनस (Endorphins) नावाचा हार्मोन तयार होतात. त्या हार्मोन्स मुळे आपला मूड चांगला होतो. त्यामुळे दररोज सकाळी चालण्याने आपल्या शरीरात तो हार्मोन तयार होतो आणि आपला मूड चांगला राहतो.

मित्रांनो सकाळी 30 ते 45 मिनिटे चालण्याचे किती फायदे आहेत ते आपण बघितले. चालण्यामुळे आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. म्हणूनच नियमितपणे चालल्याने आपले आयुष्य देखील वाढते. आणि तुम्ही बऱ्याच आजारांपासून लांब राहू शकता. मात्र हे चालणे आपण व्यायामाच्या दृष्टीने करतोय हे आपण लक्षात ठेवून त्या अर्ध्या तासात आपण वेगाने चालले पाहिजे.

दिवसाच्या कोणत्याही वेळी चालण्याचा व्यायाम करता येतो तसेच चालण्याचा व्यायाम करण्यासाठी कोणतेही विशेष साधने खरेदी करावी लागत नाहीत अगदी लहान मुले, गरोदर स्त्रिया ते वृद्ध व्यक्ती चालण्याचा व्यायाम करू शकता त्यामुळे सर्वांसाठी चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे.

मित्रांनो हे होते सकाळी उठून चालण्याचे फायदे (benefits of walking daily). तुम्हाला वरील सर्व माहिती आवडली असेलच.माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.

धन्यवाद.

Leave a Comment