benefits of tulsi leaves: नमस्कार मित्रांनो. तुळस आपल्या घरी असणार अतिशय प्रसन्नतेचे लक्षण जातं. आणि हिंदू धर्मामध्ये तुळशीला एक धार्मिक महत्त्व आहे. पूर्वी घरोघरी तुळशी वृंदावन असणे अतिशय शुभ मानले जायचे. याचं कारण नाही तसच होतो. तेही फक्त धार्मिकतेचे महत्व नाही तर औषधी गुणधर्म असलेली हे रोप किंवा तुळशीचे पान ही पटकन उपयोगी पडावी यासाठीही असं महत्त्व होतं.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा रुटीन चेंज मुळे आपल्याला माहिती असूनही की तुळस ही खूप औषधी आहे तरीसुद्धा आपण त्याचा वापर करणं हे टाळतो. पाश्चात्त्य देशांमध्ये आपलं अनुकरण करून तुळशीचे पानांचा रस किंवा तुळशीच्या पानांची पावडर ही आजकाल वेट लॉस साठी किंवा मेडिसिनल प्रॉपर्टीज म्हणून खूप औषधांमध्ये वापरण्यात येते.
तर आपण आज आपल्या देशामध्ये आपल्या पूर्वीपासून चालत आलेले काही पारंपारिक औषध आहेत, औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पती आहेत याचा आपल्याला विसर पडतोय. म्हणूनच आपण आजच्या लेखामध्ये आपल्या लाईव्ह स्टाईल मध्ये किंवा डेली रुटीन मध्ये तुळशीच्या पानांचा उपयोग कसा करायचा हे सांगणार आहे. तुळशीच्या पानांचा उपयोग मन प्रसन्न करायला फक्त त्याच बरोबर शरीर शुद्धीसाठीही याचे काय उपयोग आहेत हे बघुयात.
होमिओपॅथी मध्ये आयुर्वेदामध्ये फार पूर्वीपासून तुळशीच्या पानांपासून औषध बनवली जातात आणि अतिशय चांगले गुणधर्म औषधी गुणधर्म असणारी ही वनस्पती आपल्या डे टू डे लाइफ मध्ये कशी इंक्लुड करायची हे बघुयात.
तुळशीच्या पानांचे फायदे. (benefits of tulsi leaves)
- रोग प्रतिकारशक्ती वाढते.
- नॅचरल पेन किलर म्हणून उपयोग होतो.
- ट्रेस कमी करण्यासाठी मदत होते.
- हृदयासाठी फायदेशीर.
- शुगर कमी करते.
- वजन कमी करण्यासाठी मदत होते.
- त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त.
1. रोग प्रतिकारशक्ती वाढते.
सगळ्यात पहिलं तुळशीचे पान हे नॅचरल इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करते. तुळशीच्या पानांचा रस किंवा तुळशीच्या पानांचा काढा यांचा फार पूर्वीपासून आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा वापर केला जायचा.
आता सध्या तर आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची खूप जास्त गरज आहे. सध्याचं वातावरण बघता तुळशी हे आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरू शकते. कारण त्यामध्ये अँटी फंगल प्रॉपर्टीज बरोबरच पानांमध्ये विटामिन सी, झिंक हे सुद्धा भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे तुळशीचा काढा हा नॅचरल इम्युनिटी बूस्टर म्हणून तुम्ही घेऊ शकता.
2. नॅचरल पेन किलर म्हणून उपयोग होतो.
दुसरं आपल्या हवेमध्ये होणारे अचानक बदल आता आजकाल तर वेदर चेंजेस इतके फास्ट होत आहेत. आणि सगळ्या लोकांमध्ये जनरली सर्दी, ताप, खोकला, अंग दुखणे अशा समस्या निर्माण होतात. यासाठी तुळशीचा काढा अत्यंत उपयोगी ठरू शकतो.
तुळशीमध्ये कॅफेन आणि यासारखे अनेक पदार्थ किंवा अनेक कंपाउंड असतात. हे कंपाऊंड अँटि फंगल, अँटी बॅक्टेरियल म्हणून काम करतात. सर्दी खोकला अंगदुखी हे कमी करायला मदत करतात. नॅचरल पेन किलर म्हणून तुळशीच्या पानांचा रस हा घेतला जातो आणि याचा काढा घेतला जातो. पेन किलर घेण्यापेक्षा कधीतरी तुळशीच्या पानांचा रस घेऊन बघा नक्की उपयोग होईल.
3. ट्रेस कमी करण्यासाठी मदत होते.
तुळशीच्या पानांमध्ये स्ट्रेस कमी करण्याची क्षमता असते म्हणजेच सिरोटोनीन आणि dopamine केमिकल यांचं बॅलन्स ठेवायचं काम हे तुळशीची पाने करतात. म्हणूनच जसं पूर्वीपासून आपण म्हणतो की मन प्रसन्न ठेवते तसंच याचा सेवनामुळे स्ट्रेस कमी करायला मदत होते.
4. हृदयासाठी फायदेशीर.
आपल्या हृदयाचा रक्त पुरवठा सुरळीत करण्यासाठी हे खूप मदत करतात. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील आपण तुळशीच्या पानांचा काढा पिऊ शकतो.
5. शुगर कमी करते.
आपल्या रक्तातील शुगर कमी करण्यासाठी देखील तुळशीच्या पानांचा काढा फायद्याचा ठरतो. बरेच जणांना डॉक्टर सुद्धा तुळशीच्या पानांचा काढा पिण्याचा सल्ला देतात.
6. वजन कमी करण्यासाठी मदत होते.
डिटॉक्स एजंट म्हणून तुळशीचे पाने काम करतात. आपली पचनक्रिया सुधारते, रक्ताभिसरण क्रिया सुधारते, मेटाबोलिजम वाढते. आणि या सर्व क्रिया चांगल्या चालल्या तर आपले वजन वाढत नाही आणि वजन कमी होण्यासाठी मदत होते.
7. त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त.
आपली त्वचा आणि केसांसाठी तुळशीची पानं खूप चांगलं काम करतात. यामध्ये अँटी फंगल गुण, अँटी बॅक्टेरियल गुण असतात. यामुळे केस गळती कोंडा यासारख्या समस्या निर्माण होत नाहीत.
आज-काल कमी वयात केस पांढरे होण्याच्या तक्रारी खूप वाढले आहे. अशा लोकांसाठी तुळशीच्या पानांचा रस किंवा तुळशीचा काढा अतिशय गुणकारी ठरू शकते. त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील पिंपल्स कमी करण्यासाठी देखील याचा फायदा होतो.
तुळशीच्या पानांच्या काढा कसा बनवावा.
एक कप पाण्यामध्ये आलं, चिमूटभर काळी मिरी आणि तीन ते चार तुळशीचे पान टाकून उकळवून घ्यावे. तुळशीची पानं नसतील तर तुळशीच्या पानांचे पावडर किंवा ड्रॉप देखील घेऊ शकता.
तुळशीच्या पानांचा काढा कधी प्यावा.
तुळशीच्या पानांचा काढा तुम्ही सकाळी उपाशीपोटी पिऊ शकता याने तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते त्याचबरोबर वजन आणि चरबी कमी होण्यासाठी मदत होते. आणि वरील सर्व फायदे तुम्हाला होतील.
तुळशीच्या पानांचा काढा हा सात दिवस प्यावा आणि त्यानंतर सात दिवसाचा गॅप देऊन पुन्हा सात दिवस येऊ शकतात. सात दिवस झाले तरी सलग पिऊ नका मध्ये सात दिवसाचा गॅप नक्की ठेवा.
मित्रांनो हे होते तुळशीच्या पानांचे फायदे (benefits of tulsi leaves). तुम्हाला वरील माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.
धन्यवाद.