Benefits of Surya Namaskar – सूर्यनमस्कार करण्याचे फायदे.

Benefits of Surya Namaskar: आज आपण पाहणार आहोत सूर्यनमस्कार केल्यावर आपल्या आरोग्यावर होणारे अद्भुत फायदे. तसेच आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत सूर्यनमस्कार का घालावेत. आपण जाणून घेणार आहोत सूर्यनमस्कार म्हणजे नक्की काय?

सूर्यनमस्कार म्हणजे नेमकं काय?

सूर्य आणि नमस्कार हे दोन शब्द म्हणजे सूर्यासाठी करण्यात आलेली प्रार्थना असा अगदी सहज अर्थ आहे.
पूर्वीपासून लोक सकाळी उठून सूर्याची प्रार्थना करतात. आणि सूर्यनमस्कार योगाने दिवसाची सुरुवात केली तर शरीरासाठी आणि मनासाठी देखील हे अत्यंत चांगले मानले जाते.

सूर्यनमस्कार जी प्रक्रिया आहे ती साधारणपणे 12 आसनांमध्ये पूर्ण होते. आणि प्रत्येक पायरीवर एक वेगळं आसन यामध्ये आपल्याला करावा लागतो. या बारा योगासनांच्या क्रियेला सूर्यनमस्कार असे म्हटले जाते. सूर्यनमस्कार करण्याचे अनेक फायदे आहेत. जर तुम्हाला तुमची शरीरयष्टी चांगली राखायची असेल तर तुम्हाला नित्यनियमाने सूर्यनमस्कार करायलाच हवेत.

तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की सूर्यनमस्काराने दिवसाची सुरुवात का करावी तर आधी सांगितल्याप्रमाणे सूर्यनमस्कार हा 12 आसनांचा संच आहे जे शक्यतो सूर्योदयाच्या वेळीच करावे.  सूर्यनमस्काराच्या नियमित सरावामुळे संपूर्ण शरीर भर रक्ताभिसरण हे चांगल्या प्रकारे होते. आणि आपण निरोगी राहतो.

त्याचप्रमाणे अनेक आजारांपासून देखील आपल्याला दूर राहण्यास खूप मदत होते. हृदय, यकृत, आतडी, पोट, छाती, घसा आणि पाय यांना नियमित सूर्यनमस्कार केल्याने अनेक फायदे होतात.

डोक्यापासून ते पायाच्या बोटापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाचा सूर्यनमस्कारामुळे फारच मोठा फायदा होतो. आणि म्हणूनच सर्व योगतज्ञ देखील दररोज सूर्यनमस्कार करावे असे सुचवतात.

सूर्यनमस्कार करण्याचे फायदे.(Benefits of Surya Namaskar)

  1. शरीरातील क्रिया सुधारतात.
  2. वजन कमी करण्यासाठी मदत होते.
  3. श्वसन क्रिया सुधारते.
  4. महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या कमी होतात.
  5. मास पेशींमध्ये मध्ये सुधारणा होते.
  6. तणाव कमी होतो.
  7. त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले राहते.

1. शरीरातील क्रिया सुधारतात.
सूर्यनमस्कार करण्याचा पहिला फायदा म्हणजे शरीराची प्रक्रिया सुधारते. सूर्यनमस्कार हे एक योगासनच आहे ज्यामध्ये क्रमबद्ध पद्धतीने बारा योगासने करण्यात येतात. आणि या क्रियेमुळे शरीरातील प्रत्येक भागावर याचा प्रभाव पडतो.

तसेच या योगासना दरम्यान प्रत्येक पायरीवर श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे देखील आतड्यांची क्रियाशीलता वाढते. आणि शरीर प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. आतड्यांच्या कार्यक्षमतेसाठी याचा चांगला परिणाम दिसून येतो. आणि त्यामुळे शरीरातील रक्तपुरवठा देखील चांगल्या प्रकारे होतो. आणि आपण अनेक आजारांपासून देखील दूर राहतो.

2. वजन कमी करण्यासाठी मदत होते.
याचा दुसरा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी मदत होते.  सूर्यनमस्कारामुळे हृदय आणि स्वास्थ्य त्याचप्रमाणे श्वसनासंबंधीचे विकार देखील दूर होतात. योगासनामुळे म्हणजेच सूर्यनमस्कारातील योगासनामुळे आपल्याला वजन कमी करण्यासाठी देखील मदत होते. वजन कमी करण्यासाठी यामध्ये नियमितपणा ठेवणे खूप गरजेचे असते.

3. श्वसन क्रिया सुधारते.
नमस्कार केल्यामुळे श्वासनाच्या दबावांमध्ये सुधारणा होते. म्हणजे काय तर श्वसन दबाव हा सरळ संबंध आपल्या आतड्यांच्या कार्यक्षमतेशी जोडला गेलेला आहे. श्वासाची प्रक्रिया ही मुख्य असते. पण सूर्यनमस्काराच्या वेगवेगळ्या आसनांमुळे श्वसन तंत्र मजबूत होते. आणि आतड्यांच्या कार्यक्षमतेमध्ये देखील सुधारणा होते. तसेच आतड्यांची कार्यक्षमता सुधारल्यामुळे श्वासा संबंधित विकारही होत नाही.

4. महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या कमी होतात.
नियमित सूर्यनमस्कार केल्याने मासिक पाळी नियमितपणे येण्यास सुरुवात होते. कित्येक महिलांना मासिक पाळी नियमित येत नाही पण जर तुम्ही नियमितपणे सूर्यनमस्कार केले तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा मिळू शकतो.

अनियमित मासिक पाळी येत असेल तर त्यामुळे काय होतं. थकवा, अंगदुखी आणि डोकेदुखी आणि परिणामी चिडचिडेपणा देखील येतो. आणि हे सगळं एकत्र येतं आणि यावरील एकच उपाय म्हणजे तो म्हणजे सूर्यनमस्कार.

5. मास पेशींमध्ये मध्ये सुधारणा होते.
सूर्यनमस्कार नियमितपणे केल्याने मास पेशींमध्ये सुधारणा होते. सूर्यनमस्कारामुळे अनेक लोकांच्या शरीराला मजबुती मिळते. त्याचप्रमाणे शरीराशी संबंधित मास पेशींमध्ये देखील सुधारणा होते.

सूर्यनमस्कार केल्यामुळे सकारात्मक प्रभाव आपल्या शरीरावर पडतो. तसेच मास पेशींची गती विधी वाढते. आणि त्याच्या कार्यक्षमतेमध्ये देखील सुधारणा होण्यासाठी खूप फायदा होतो.

6. तणाव कमी होतो.
नियमितपणे सूर्यनमस्कार केल्यामुळे तणावापासून मुक्ती मिळते.  सध्या आपल्याकडे अनेक जणांना तणावापासून मुक्ततेची जास्त गरज भासत आहे. सततचे काम आणि घरचा ताण यामुळे अनेक आजार आपण ओढवून घेत असतो.  सूर्यनमस्काराच्या योग धारणेमुळे मन देखील एकाग्र करण्यास आपल्याला शक्ती मिळते.

तणावापासून मुक्ती देण्यासाठी सूर्यनमस्काराचा खूप मोठा फायदा आपल्या शरीराला मिळतो. सूर्यनमस्कारामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यामध्ये खूप मदत मिळते. तुमची दृष्टी देखील सकारात्मक होण्यास खूप फायदा होतो.

7. त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले राहते.
सूर्यनमस्कार करण्याचा पुढचा फायदा आहे तो म्हणजे त्वचा आणि केसांसाठी.  त्वचा खराब होण्या मागचे सर्वात महत्त्वाचे कारण ठरते ते म्हणजे चिंता आणि तणाव. मन शांत राखण्यासाठी सूर्यनमस्काराचा सराव किंवा व्यायाम हा नियमितपणे करावा.

सूर्यनमस्कार केल्यामुळे आपले शरीर आणि मन ही शांत राहते. आणि त्यामुळे आपल्या त्वचा आणि केसांच्या वाढीत देखील सुधारणा होते. मुळात जर आपण चिंताग्रस्त आणि तणाव मुक्त असो तर कोणतेही आजार आपल्या आजूबाजूला देखील फिरणार देखील नाहीत. त्यामुळे नियमितपणे सूर्यनमस्कार केल्याने त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर ठरते.

सूर्यनमस्कार कधी करावा.

सूर्यनमस्कार हे कधीही रिकाम्या पोटी करता येतो. परंतु सूर्यनमस्कार करण्यासाठी सकाळची वेळ ही उत्तम मानली जाते. कारण त्यामुळे दिवसभराची कामे करण्यासाठी आपल्याला एकदम उत्साही वाटते.

जर दुपारी सूर्यनमस्कार केला तर त्यांनी शरीराला ताबडतोब ऊर्जा मिळते आणि जर संध्याकाळी केलं तर मन हलके होण्यास मदत होत. जर आपण सूर्यनमस्कार अतिशय वेगाने केले तर सूर्यनमस्कार हा हृदयाकरिता एक उत्तम व्यायाम आहे. आणि वजन कमी करण्याचा एक चांगला उपाय देखील आहे.  सूर्यनमस्कार नियमित केल्यामुळे शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने फायदे होतात.

मित्रांनो हे होते सूर्यनमस्कार करण्याचे फायदे (Benefits of Surya Namaskar). आणि सूर्यनमस्कार कधी करावा याविषयी माहिती. माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.

Leave a Comment