Benefits of eating Sesame seeds-तीळ खाण्याचे फायदे

Benefits of eating Sesame seeds: नमस्कार मित्रांनो,Sesame seeds त्यालाच आपण मराठी मध्ये तीळ असे म्हणतो. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, फॉस्फरस, कॅल्शियम, विटामिन 12, झिंक यासारखे अनेक पोषण घटक मुबलक प्रमाणामध्ये असतात.

तीळ हा एक उष्ण पदार्थ आहे त्यामुळे जास्त करून हिवाळ्यात सेवन केले जाते. परंतु आपण उन्हाळ्यात देखील याचे सेवन करू शकतो फक्त त्याचे प्रमाण कमी करावे लागते. त्यामुळे तीळ खाण्याचे फायदे माहित असणे खूप गरजेचे आहे.

बाजारामध्ये आपल्याला काळे तीळ आणि पांढरे तीळ या दोन प्रकारची तीळ मिळतात मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की यापैकी कोणते तीळ आपल्या आरोग्यासाठी जास्त फायद्याचे आहेत. आयुर्वेदानुसार काळ्या तिळामध्ये यामध्ये जास्त औषधी गुणधर्म असतात. परंतु दोन्ही प्रकारचे तीळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

आपण आजच्या या लेखामध्ये तीळ खाण्याचे फायदे, कोणत्या प्रकारचे तीळ खावेत आणि कोणी तीळ खाऊ नये याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.

तीळ खाण्याचे फायदे.(Benefits of eating Sesame seeds)

  1. हाड मजबूत होतात .
  2. संधिवात कमी होतो.
  3. त्वचा चांगली राहते आणि तुम्ही तरुण दिसण्यासाठी मदत होते.
  4. वजन कमी होण्यासाठी मदत होते.
  5. पोट साफ होते.

1. हाड मजबूत होतात .
तिळाचा सर्वात मोठा फायदा बघायचा मानलं तर आपली हाडं मजबूत होतात. सकाळी एक ते दोन चमचे तीळ चावून खाल्ल्याने आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. तिळामध्ये कॅल्शियम असल्याने त्याचा मोठा फायदा आपल्या हाडांना होतो. परिणामी आपली हाड मजबूत होतात.

2. संधिवात कमी होतो.
त्यामध्ये लोह आणि कॉपर मुबलक प्रमाणामध्ये असते. त्यामुळे लोह आणि कॉपरची कमतरता पूर्ण होते. त्याचबरोबर ज्यांना संधिवात आहे किंवा जॉईंट पेन आहे अशा लोकांनी तिळाचे सेवन करा त्याचबरोबर तिळाच्या तेलाची मसाज केली तर खूप मोठा फायदा होतो.

3. त्वचा चांगली राहते आणि तुम्ही तरुण दिसण्यासाठी मदत होते.
मित्रांनो तीळा मध्ये अँटिऑक्सिडंट चांगल्या प्रमाणामध्ये असतात. हे अँटिऑक्सिडंट फ्री रॅडिकल्स ला रोखतात. आणि याने आपले त्वचा चांगली राहते, त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. आणि तुम्ही कमी वयामध्ये म्हातारे दिसत नाहीत. त्यामुळे तिळाचे सेवन तुमच्या त्वचेसाठी चांगले ठरू शकते.

4. वजन कमी होण्यासाठी मदत होते.
मित्रांनो सध्या वजन वाढणे ही एक समस्या बनली आहे. खूप सारे असे लोक आहेत की वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात.पण वजन कमी होत नाही. जर तुम्ही तिळाचे सेवन केले तर तुमची भूक कमी होते. आणि याचा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदा होईल. कारण यामध्ये तंतुमय पदार्थ असतात. तुम्ही जर वजन कमी करत असाल तर तुमच्या आहारामध्ये तिळाचे सेवन नक्की करा.

5. पोट साफ होते.
ज्या लोकांना व्यवस्थित पोट साफ होत नाही अशा लोकांनी देखील तिळाचे सेवन केले तर त्यांना पोट साफ होण्यासाठी मदत होईल.  कारण यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते.

याचबरोबर मधुमेह असलेल्या लोकांसाठी देखील तिळाचा फायदा होतो. तीळ खाल्ल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल देखील कमी होण्यासाठी मदत होते.

तीळ कसे खावेत.

मित्रांनो तुम्ही तीळ भाजून खाऊ शकता. त्याचबरोबर तिळाचे तेल देखील तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरू शकता. तिळाची चटणी करून तुम्ही याचा समाविष्ट तुमच्या आहारामध्ये करू शकता.

तीळ किती खावेत.

हिवाळ्यामध्ये एका दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारे आपण एक मूठभर तीळ खाल्ले तरी चालते. पण इतर वेळेस एक ते दोन चमचा इतके तीळ खाऊ शकता.

तीळ कोणी खाऊ नयेत.

ज्यांना ज्या लोकांना मूळव्याधाचा त्रास आहे किंवा उष्णतेचा त्रास आहे. अशा लोकांनी तिळाचे सेवन कमी प्रमाणामध्ये करावी कारण तीळ हे उष्ण पदार्थ आहे.

मित्रांनो हे होते तीळ खाण्याचे फायदे (Benefits of eating Sesame seeds). कधी कसे आणि किती खावे याविषयी थोडीशी माहिती माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.

धन्यवाद.

Leave a Comment