benefits of eating mango-आंबा खाण्याचे फायदे

benefits of eating mango: मित्रांनो आता आंब्याचा सीजन म्हणलं की आपल्या मनात एक वेगळीच उत्सुकता असते. बरेच जण आंब्याच्या सीजन ची वाट बघत असतात. आंब्याचा सीजन येईल आणि आपण खूप सारे आंबे खाऊ. पण तुमच्या मनात असा कधी विचार आलाय का ?. आपण आंबे खातो पण त्या आंब्याचा आपल्या शरीराला काय काय फायदा होतो.

आजच्या या लेखामध्ये आपण याचे उत्तर बघणार आहोत. आंबा खाल्ल्याने आपल्या शरीराला काय काय फायदा होतो. काहींना असा देखील प्रश्न पडतो की आंबा खाल्ल्याने आपले वजन वाढते. याचे उत्तर देखील आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

आंब्यामध्ये कोणते कोणते पोषक तत्वे असतात?

मित्रांनो आंब्यामध्ये कोणते कोणते पोषक तत्त्व असतात. ते आपण पाहूयात. आंब्यामध्ये कार्बोहायड्रेट( carbohydrates), तंतुमय पदार्थ, विटामिन ए (vitamin A), विटामिन ब (vitamin B), विटामिन बी फाईव्ह (vitamin B5), विटामिन बी सिक्स (vitamin B6), असे खूप सारे पोषक तत्व आंब्यामध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर copper सारखे खनिजे देखील आंब्यामध्ये असतात. आंब्यामध्ये खूप सारे एंटीऑक्सीडेंट देखील असतात.

 

चला तर मित्रांनो बघूया आंबा खाल्ल्याने होणारे फायदे. (benefits of eating mango)

  1. रोगप्रतिकार शक्ती वाढणे.
  2. पचनक्रिया सुधारते.
  3. डोळ्याचे स्वास्थ्य सुधारते.
  4. हृदयाचे स्वास्थ चांगले राहते.
  5. त्वचा आणि केस चांगले राहते.

 

1.रोगप्रतिकार शक्ती वाढणे.

आंब्यामध्ये विटामिन ए (vitamin A) आणि विटामिन सी (vitamin C)  ची चांगली मात्र असते. त्याचबरोबर बाकीचे विटामिन देखील असतात. आंब्यामध्ये विटामिन्स असल्यामुळे आपले रोगप्रतिकारशक्ती वाढते. आपल्या शरीरात असणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशी म्हणजे डब्ल्यूबीसी (WBC) त्यांना आपण फायटर सेल्स असे म्हणतो, ज्या आपली रोगप्रतिकारशक्तीसाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यांची निर्मिती आणि त्यांचं कार्य चांगलं ठेवण्यासाठी खूप जास्त मदत करतात.

एक प्रकारे बघायला गेलं तर उन्हाळ्यात आंबे येतात. आणि आंब्याचा सिजन संपलं की पावसाळा सुरू होतो. पावसाळ्यात बरेच आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपले रोगप्रतिकार शक्ती चांगली असणार खूप गरजेचे असते. आणि आपण उन्हाळ्यात आंबे खाल्ले असतील तर आपली रोग प्रतिकारशक्ती चांगली होते. आणि आपले पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होते.

 

2. पचनक्रिया सुधारते.

पचनक्रियेमध्ये देखील आंब्याचे खूप महत्त्व आहे. कारण आंब्यामध्ये अमाईलेज नावाचे एंजाइम असते. जे की आपल्या शरीरात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट ला सिम्पल कार्बोहायड्रेट मध्ये बदलण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर आंब्यामध्ये फायबर चे प्रमाण चांगले असते. आणि फायबर देखील आपल्या पचनक्रियेमध्ये कामाला येते

 

3. डोळ्याचे स्वास्थ्य सुधारते

डोळ्याचे स्वास्थ सुधारण्यासाठी आंब्यातील असणारे पोषक तत्व खूप महत्त्वाचे ठरतात. खास करून बघायला गेलं तर व्हिटॅमिन ए (vitamin A)  तुम्हाला माहित असेल. त्याचबरोबर ल्युतीन आणि झिझानथिन नावाचे जे घटक असतात ते सूर्याचा प्रखर प्रकाश आणि मोबाईल किंवा टीव्ही यासारख्या उपकरणाची ब्ल्यू लाईट यापासून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करतात. त्यामुळे तुम्हाला जर डोळ्यांचा त्रास होत असेल तर तुम्ही आंबा खाऊ शकता. जेणेकरून तुमचे डोळ्यांचे आरोग्य सुधारेल.

 

4. हृदयाचे स्वास्थ चांगले राहते.

मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे घटक आंब्यामध्ये असतात. पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आपल्या शरीरात असणाऱ्या रक्तवाहिन्यांवर येणारा दबाव कमी करतात. त्यामुळे आपला जो रक्तदाब आहे तू सुद्धा कमी होतं किंवा नियंत्रण मध्ये राहतो. त्याचबरोबर वरी सांगितल्याप्रमाणे जे अँटिऑक्सिडंट असतात ते सुद्धा हृदयाचे खूप सारे जे आजार आहेत त्यापासून आपली संरक्षण करते.  जे पेक्टिन नावाचं फायबर असतं ते आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊ देत नाही. हे छोटे छोटे घटक आपल्या हृदयाचे स्वस्त चांगलं ठेवण्याच्या कामात मदत करतात.

 

5. त्वचा आणि केस चांगले राहते.

आपली त्वचा आणि आपले केस यासाठी देखील आंब्यातील जे पोषक तत्व आहेत ते महत्त्वाचे असतात. खास करून विटामिन ए (vitamin A) किंवा विटामिन सी (vitamin C). प्रदूषण ऊन धूळ यामुळे आपल्या त्वचेची चमक कुठे ना कुठे कमी झालेली दिसते. ती चमक वापस येण्यासाठी आंबा खूप फायद्याचा ठरतो. तुमच्या केसाचे स्वास्थ चांगले ठेवायला लागणारे विटामिन सी (vitamin C) सारखे घटक असतात. जे तुमचे केस गळणे,कोंडा होणे यासारख्या गोष्टीवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे आंब्याचे सेवन केल्याने तुमची केस देखील चांगले राहतात.

तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकले असेल की आंबा खाल्ल्याने वजन देखील वाढते. तर आंब्यामध्ये कॅलरीज थोड्या जास्त प्रमाणात असतात पण त्याचबरोबर सगळे असतात. अँटिऑक्सिडंट ,फायबर्स आहेत हे पोषक तत्व तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करतात. पण आपण काय करतो आंब्याच्या सिजनमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आंबे खातो किंवा आमरस यासारख्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण वाढवतो. त्यामुळे त्यामध्ये कॅलरीज ऍड होतात. त्यामुळे असं केल्याने वजन वाढते. त्यामुळे आपला आहारामध्ये आंबा खात असताना आंबा योग्य प्रमाणात खाल्ला तर त्याचा फायदा तुमच्या आरोग्याला  नक्कीच होईल.

मित्रांनो हे होते आंबा खाण्याचे फायदे (benefits of eating mango). वरील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.

धन्यवाद.

Leave a Comment