benefits of eating Jaggery:नमस्कार मित्रांनो, तुम्ही आपल्या आजी आजोबा कडून ऐकलेल्या असेल पूर्वीच्या काळी लोक साखरे ऐवजी गुळ खाणे जास्त पसंत करायचे. आजच्या या लेखामध्ये आपण गुळ खाण्याचे आपल्या आरोग्यावर होणारे फायदे, त्याचे तोटे, कोणी खावा, का खावा, किती खावा, याची सविस्तर माहिती बघणार आहोत.
गुळाची सर्वात चांगली गोष्ट बघायला गेलं तर आपल्याला सहजपणे कुठेही मिळू शकतो. गुळ खाताना गुळ हा जेवढा जास्त सेंद्रिय असेल तेवढा फायदेशीर ठरतो. गुळ हा पावर बुस्टर म्हणून काम करतो. त्याचबरोबर बॉडी डिटॉक्सिफिकेशनच काम देखील गुळ करतो.
गुळामध्ये फॉस्फरस (phosphorus) असेल, विटामिन बी (vitamin B) असेल, प्रोटीन (protein), कार्बोहायड्रेट (carbohydrate) अशा प्रकारचे भरपूर घटक गुळामध्ये आपल्याला आढळतात. मित्रांनो दहा ग्राम गुळामध्ये आपल्याला 38 कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. गुळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा गुळाचे सेवन करता येतं. पण त्याला डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा आणि गुळ किती प्रमाणात खायचा येथे डॉक्टरांना विचारून खाल्ला पाहिजे.
गुळ खाण्याचे फायदे.(benefits of eating Jaggery)
- आपली एनर्जी वाढण्यास मदत होते.
- पचनक्रिया सुधारते.
- सर्दी, खोकला, कफ यांवर गुणकारी औषध.
- चेहऱ्यावर चमक येते.
- लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत होते.
- दमा असलेल्या व्यक्तींना फायदेशीर.
1. आपली एनर्जी वाढण्यास मदत होते.
मित्रांनो आपण काम करून आल्यावर आपण थकलेलो असतो किंवा आपल्याला अशक्तपणा जाणवतो. अशावेळी आपण गुळाचा एक तुकडा खाल्ला तर आपल्या शरीरात एनर्जी वाढण्यास नक्कीच मदत होईल. आणि आपल्याला आलेला थकवा कमी होण्यास मदत होते.
2. पचनक्रिया सुधारते.
आपल्याकडे बघायला गेलं तर बऱ्याच जणांना पचन क्रिया विषयी तक्रारी असतात. जसं की काहींना गॅस होणे, अपचन, पोट साफ न होणे अशा अनेक गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी भविष्यात वाढूही शकतात. असे असेल तर आपण गुळाचे सेवन केले तर या समस्या कमी होण्यास मदत होते.
3. सर्दी, खोकला, कफ यांवर गुणकारी औषध.
मित्रांनो हिवाळा सुरू झाला की सर्दी खोकला कप यासारख्या गोष्टी लहान मुलांना लवकर होतात. आपण जर लहान मुलांना गुळ किंवा गुळाचा रस दिला तर त्यांच्या घशात असणारा कफ, सर्दी, खोकला यासारख्या गोष्टी कमी होण्यात मदत होईल. त्याचबरोबर घसा दुखी साठी गूळ आणि आलं फायदेशीर ठरतं.
4. चेहऱ्यावर चमक येते.
वास्तविक पाहता शरीरामधील रक्तात जे विषारी घटक आहेत ते बाहेर टाकण्यासाठी गुळ हा अत्यंत फायदेशीर आहे. गुळामुळे रक्तातील परिसंचार चांगल्या प्रकारे सुधारण्यास आपल्याला मदत होते. आणि याचा आपल्या चेहऱ्यावर चांगला परिणाम होतो. आणि आपल्या चेहऱ्यावर चमक मदत होते.
5. लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत होते.
गुळामध्ये लोहाचे प्रमाण चांगल्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी किंवा ते संतुलित ठेवण्यासाठी गुळाचे सेवन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही गुळ आणि शेंगदाणे देखील खाऊ शकता. आणि यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढायला चांगलीच मदत मिळते.
6.दमा असलेल्या व्यक्तींना फायदेशीर.
गुळामध्ये अँटी ऍलर्जी घटक असतात. त्यामुळे ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे अशा लोकांनी गुळाचे सेवन केलं पाहिजे.
गुळ खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर गुळ खाल्ल्याने तुम्हाला चांगली भुक देखील लागते. त्यामुळे ज्या लोकांना वजन वाढवायचे असते त्यांना याचा फायदा होईल. ज्या लोकांना घसेदुखीचा त्रास आहे त्यांना देखील याचा फायदा होतो. गुळ खाल्ल्याने आपली हाड देखील मजबूत होतात.
वरील सांगितलेल्या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला तेव्हाच होईल जेव्हा तुम्हाला गुळ केव्हा कधी आणि कसा खावा. याची योग्य माहिती असेल.
गुळ खाण्याचे योग्य वेळ आणि त्याचे प्रमाण.
तसा तर आपण गुळाचे सेवन दिवसात कधीही करू शकतो पण सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने त्याचा फायदा तुम्हाला चांगल्या प्रमाणात होईल. गोळा पण पाण्यात मिसळून पिलो तर आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला फायदा होतो. कारण गुळ हा गरम पदार्थ मानला जातो आणि तो पाण्यात टाकून तीचे सेवन केलं तर आपले शरीर थंड राहण्यास मदत होते.
तुम्ही सकाळी उपाशीपोटी एक गुळाचा तुकडा खाल्ला आणि त्यानंतर एक ग्लास पाणी पिले तर सांधेदुखीवर मदत होईल. तुम्ही सकाळी साखरेच्या च्या ऐवजी गुळाचा चहा देखील पिऊ शकता.
तुम्ही दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर गुळ खाऊ शकता. अस केल्यानं तुमचे पचन क्रिया सुधारेल.
दिवसाला किती गुळ खावा.
मिञांनो आपल्याला दिवसाला 15-20 ग्राम गुळ खाल्लेला जमतो. ह्याच्या पेक्ष्या जास्त गुळ दिवसाला खाऊ नये. तस तर आपण बाराही महिने गुळ खाऊ शकतो. पण उन्हाळ्याच्या दिवसात जरा याचे प्रमाण कमी असायला हवे.
गुळ कधी खाऊ नये.
जर तुमच्या अंगावर कुठं सूज असेल तर गुळ खाऊ नये. कारण गुळामध्ये सुक्रोज चे प्रमाण असते. आणि त्याने तुमची सुज वाढू शकते. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी गुळ डॉक्टरच्या सल्ल्यानुसार खावा. नॉनव्हेज आणि मुळा यांसोबत मुळा खाऊ नये.
मित्रांनो ही होती गूळ कधी खावा. कधी काही नये, किती खावा आणि त्यापासून होणारे फायदे (benefits of eating Jaggery) यांची महिती. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.
धन्यवाद.