Benefits of eating flaxseed: पूर्वी आपल्या जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांना एक विशेष स्थान असायचं. आणि या चटण्या आपल्याला रोज जेवणाबरोबर लागायच्या आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा म्हणजे जवसाची चटणी.
आपण सोशल मीडियावर बघत असतो, ऐकत असतो की जवस खाल्ल्याने हे फायदे होतात? रोज जवस खाल्ल्याने ते फायदे होतात? वजन कमी होतं? फक्त वजन कमी होते एवढाच एक फायदा नाही तर त्याचे अनेक फायदे आहेत.
जवस इतकं महत्त्वाचं का आहे. कारण हे एक न्यूट्रियंट पॅक फूड आहे. यामध्ये विटामिन बी, कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस भरपुर प्रमाणत असते. त्याचबरोबर प्रोटीन फायबर्स आणि गुड फॅट चांगल्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे जवसाला इतक महत्त्वाच मानलं जातं.
जवस खाण्याचे फायदे. (Benefits of eating flaxseed)
- वजन कमी होण्यासाठी मदत करते.
- हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर.
- शुगर नियंत्रणात राहते.
- पोट व्यवस्थित साफ होते.
1. वजन कमी होण्यासाठी मदत करते.
ज्यांना वजन कमी करायचा आहे त्यांच्यासाठी जवस खूप उपयुक्त ठरत. वजन कमी करण्यासाठी आहारात एक भाग म्हणून जवसाच्या बिया उपयुक्त ठरू शकतात. त्यात विरघळणारे फायबर असतात जे पाण्यात मिसळल्यावर जास्त चिकट होते. हे फायबर भूक कमी करण्यासाठी मदत करतात. आणि भूक न लागल्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते.
जवसामध्ये प्रोटीन हे चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे ते आपल्याला वजन कमी करण्यासाठी फायद्याचं ठरतं. एक चमचा जवसामध्ये साधारणता एक ते दोन ग्राम प्रोटीन असते. त्याचबरोबर फायबर्स असतात आणि ह्या गोष्टी वजन कमी करण्यासाठी खूप गरजेचे असतात. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारामध्ये जवस असायला पाहिजे.
2. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर.
वर सांगितल्याप्रमाणे जवसामध्ये ओमेगा थ्री फायबर किंवा lignan याचा प्रमाण जास्त असल्यामुळे ते हार्ट साठी अतिशय बेनिफिशियल आहे. जवस खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल्स देखील कमी होण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल मध्ये प्रकार असतात त्यातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी याची मदत होते.
काही स्टडीज मधून असेही दिसून आलेले आहे की एलडीएल कोलेस्ट्रॉल हे 6 ते 11 टक्क्याने कमी होताना दिसलेले आहे. आपल्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल असतात ते कमी करण्यास मदत होते आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.
3. शुगर नियंत्रणात राहते.
सध्याच्या घडीला शुगर वाढणे हे कॉमन झालेले आहे. जर तुम्ही जवस तुमच्या आहारामध्ये ठेवले तर तुमची शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. यातील lignan नावाचा घटक तुमची शुगर कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी मदत करतो.
4. पोट व्यवस्थित साफ होते.
यामध्ये फायबर्स भरपूर असल्यामुळे ज्या लोकांना अपचन किंवा पोट साफ होत नाही अशा गोष्टींचा त्रास असेल तर त्यांनी त्यांच्या आहारामध्ये जवसाचा समावेश करायला पाहिजे. पोट चांगले साफ झाले तर तुमची मेटाबोलिझम प्रक्रिया सुद्धा चांगली होते.
याबरोबर जवसामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टी सुद्धा असतात. त्यामुळे तुम्हाला कॅन्सरचा धोका देखील काही प्रमाणामध्ये कमी होण्यासाठी याची मदत होते, त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील याचा खूप फायदा होतो.
मित्रांनो हे झाले जवस खाण्याचे फायदे. पण एखाद्या पदार्थांमधून आपल्याला जर त्यातील चांगले घटक घ्यायचे असतील तर तो पदार्थ प्रमाणात सेवन करायला पाहिजे. जर आपण त्याचे अति सेवन केले तर त्याचे काही दुष्परिणाम देखील आपल्याला जाणवतात.
जवस किती खावे?
तुम्ही जवस खात असताना एका प्रमाणामध्ये खायला पाहिजे. दिवसाला एक चमचा जवस तुमच्या शरीरासाठी पुरेसं आहे.
जवस कधी व कसे खावे?
तुम्ही जवस खाताना त्याची पावडर खाल्ली तर ती अधिक फायदेशीर ठरते. काही लोकांना रात्री जेवण केल्यानंतर सुपारी किंवा बडीशेप खाण्याची सवय असते तुम्ही त्यात जवस देखील खाऊ शकता.
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे अशा लोकांनी जवसाची चटणी बनवून देखील खाल्ली तरी चालतो. जवसाची चटणी तुम्ही दह्यासोबत खाल्ली तर एकदम उत्तम.
जवस खाताना तुम्ही ते कच्चे न खाता भाजून खायला पाहिजे. कारण त्यामध्ये phytic ऍसिड नावाचा घटक असतो तो इतर घटकांचे शोषण होऊ देत नाही. तुम्ही जर जवस भाजले तर तो phytic ऍसिड नावाचा घटक कमी होतो.
जवसाचे अतिशय अति सेवन केल्याने म्हणजेच तुम्ही दिवसाला दोन तीन चमचे जवस जर खाल्ले तर तुम्हाला पोट दुखी गॅस पित्त यासारख्या समस्या होऊ शकतात.
ज्या व्यक्तींना रक्त पातळ होण्यासाठी गोळ्या चालू आहेत अशांनी देखील याचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्याचबरोबर ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे अशांनी देखील डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मित्रांनो हे होते जवस खाण्याचे फायदे (Benefits of eating flaxseed). ते कधी आणि किती खावे, कोणी खाऊ नये याची सविस्तर माहिती. तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.