benefits of eating almonds: नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण बदाम खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते कोणते फायदे होतात हे समजून घेणार आहोत. प्रत्येकाच्या घरामध्ये बदाम असतातच. सगळ्यात आवडतं ड्रायफ्रूट म्हणजे बदाम. बदाम खायला लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतं. बदाम खायला जेवढे चविष्ट आहेत तेवढेच ते पौष्टिक सुद्धा आहेत. बदाम खाल्ले पाहिजे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ते कधी खायचे, किती खायचे, कसे खायचे हे माहित नसते. आजच्या या लेखांमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत.
बदाम खाल्ल्याने होणारे फायदे. (benefits of eating almonds)
- रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.
- हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर.
- आजारांशी लढण्याची ताकद वाढवतात.
- विटामिन्स आणि मिनरल्सची गरज पूर्ण करतात.
- भूक नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.
- बदामा मध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन आहेत.
- मेंदूचे कार्य सुरळीत चालते.
- वजन कमी करण्यास मदत होते.
1.रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.
बदाम खाल्ल्याने आपल्या शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. कारण बदामा मध्ये फायबर्स आणि प्रोटीन जास्त प्रमाणात आहेत. आणि कार्बोहायड्रेट्स चे प्रमाण कमी असते. त्यामुळे ज्या लोकांना शुगर म्हणजेच मधुमेहाचा त्रास आहे. अशा लोकांना आपल्या आहारामध्ये बदाम खाणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे.
2.हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर.
आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी बदाम खूप फायदेशीर आहे. आपल्या शरीरामध्ये जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे. बॅड कोलेस्ट्रॉल मुळे हृदयविकार निर्माण होऊ शकतो. बदाम खाल्ल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या हृदयाला बदामाचा फायदा होतो.
3.आजारांशी लढण्याची ताकद वाढवतात.
त्यामध्ये गुड फॅट्स आहेत. बदामांपासून तेल काढलं जातं म्हणजेच त्यामध्ये फॅट्स आहेत. गुड फॅट्स म्हणजे याची आपल्या शरीराला गरज असते. फॅट म्हणजे वाईटच असा आपल्या मनामध्ये एक भ्रम झालेला आहे. प्रत्येक प्रकारचं फॅट हे बॅड फॅट नसतं. काही प्रकारचे फॅट हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. त्यालाच आपण गुड फॅट्स म्हणतो. अशा प्रकारचे गुड फॅट जे आपल्याला शरीराला आवश्यक असतात. ते बदामा मध्ये असतात. ओमेगा थ्री फॅटीऍसिड बदामा मध्ये असतात. आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली असतात. हे आपल्या शरीरातील inflammation कमी करण्यासाठी मदत करतात. म्हणजेच आपल्या शरीराची आजारांशी लढण्याची ताकद वाढवतात.
4.विटामिन्स आणि मिनरल्सची गरज पूर्ण करतात.
चौथा फायदा म्हणजे बदाम हे पोषक तत्त्वांनी भरलेले आहे. इसेन्शियल न्यूट्रियन्स त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स आढळतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक यासारखे इसेन्शिअल मिनरल्स त्यामध्ये चांगल्या प्रमाणात आढळतात. कॅल्शियम आपल्या हाडांच्या व दातांच्या आरोग्यासाठी चांगला आहे. झिंक आपल्या growth आम्ही development मध्ये खूप महत्त्वाची असते. लहान मुलांना आपण आवर्जून बदाम खायला दिले पाहिजेत.
5.भूक नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.
बदामा मध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात फायबर्स आढळतात. आणि हे फायबर्स आपल्याला खूप वेळ फुलवर ठेवायला मदत करतात. यामुळे आपली भूक कंट्रोल व्हायला मदत होते. बदामा मध्ये खूप चांगल्या प्रमाणात फायबर असल्यामुळे बदाम खाल्ल्यानंतर आपल्याला भूक लागत नाही. आपली भूक कंट्रोल व्हायला मदत होते.
6.बदामा मध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन आहेत.
बदामामध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन आहेत. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रोटीन. या प्रतींचा प्रमाण बदामा मध्ये खूप चांगली असते. 30 ग्रॅम बदामा पासून अंदाजे आपल्याला साडेपाच ग्रॅम प्रोटीन मिळतात.
7.मेंदूचे कार्य सुरळीत चालते.
सातवा फायदा म्हणजे ते आपल्या मेंदूचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यात मदत करते. पण सहसा म्हणतो की एखादी गोष्ट विसरले की बदाम का असे म्हटले जाते. नेहमी बदाम खाल्ल्यामुळे आपले मेंदूचे कार्य चांगले चालते. आपली स्मरणशक्ती वाढते. बुद्धी तल्लख राहते. त्यामुळे नेहमी बदाम खाल्ल्याने आपली मेमरी इम्प्रोव्ह व्हायला सुरुवात होते. म्हणून आपण बदाम खायला पाहिजेत.
8.वजन कमी करण्यास मदत होते.
वेटलॉस मध्ये देखील बदाम खाल्ल्याने मदत होते. आपली भूक कंट्रोल करायला मदत होते. भूक कंट्रोल केल्यामुळे झाली म्हणजेच आपल्या आहारावर कंट्रोल. आणि आहारावर कंट्रोल केल्यामुळे झाली म्हणजेच आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते.
बदाम किती खावेत.
बदाम हे एक हाय कॅलरी फूड आहे. त्यामुळे ते घेताना आपल्याला ते प्रमाण ठरवूनच खावे लागेल. बदाम हे हाय कॅलरी आहेतच त्याचबरोबर ते पचायला देखील जड आहेत. बदाम जर जास्त प्रमाणात खाल्ले तर पोट गच्च होणे, अपचन यासारखा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर दिवसाला चार ते पाच बदाम पुरेशी आहेत. आणि जर तुम्हाला वजनाचा काही प्रॉब्लेम नसेल. तुम्ही नॉर्मल वजनात असाल तर तुम्ही दिवसाला आठ ते दहा बदाम खाऊ शकता.
बदाम कधी खावेत.
बदाम खाण्याचा चांगला टाईम म्हणजे सकाळचा टाईम आहे. तुम्ही नाष्ट्यानंतर बदाम खाऊ शकता. किंवा नाश्त्याच्या आधी पण खाऊ शकता. किंवा संध्याकाळी देखील खाऊ शकता.
परंतु जर तुम्ही बदाम सकाळी खाल्ले तर ते तुम्हाला दिवसभर भूक लागू देत नाहीत. आणि त्यातील असणारे पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषून घेतले जातात.
बदाम कसे खाल्ले पाहिजेत.
- बदाम जसे आहेत तसेच आपण खाऊ शकतो म्हणजेच कच्चे खाऊ शकतो. परंतु बच्चे बदाम हे पचण्यासाठी थोडेसे जड असतात.
- आपण बदाम भिजून देखील खाऊ शकतो. हा बदाम खाण्याचा एक उत्तम मार्ग आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये असणारे न्यूट्रेटिव घटक जे आहेत ते सुद्धा इंटॅक्ट राहायला मदत होते. भिजवल्यामुळे ते चावायला सोपे होतात, आणि पचायला सोपे होतात. त्यामध्ये असणारे पोषक तत्व आपल्या शरीराला शोषून घेण्यास देखील मदत होते.
मित्रांनो हे होते बदाम खाल्ल्याने होणारे फायदे (benefits of eating almonds). वरील लेखांमध्ये तुम्हाला बदाम कधी खावे, कसे खावे आणि त्याचे होणारे फायदे सांगितले आहेत. तुम्हाला वरील माहिती आवडली असेल. ती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण पाठवा.
धन्यवाद.