Benefits of drinking turmeric and milk-हळद आणि दूध पिण्याचे फायदे.

Benefits of drinking turmeric and milk: पूर्वीपासून चालत आलेला औषधी पदार्थ म्हणजे हळद. आपल्या स्वयंपाकामध्ये आपण जनरली हळद ही प्रत्येक भाजी असेल,आमटी असेल आपण सगळ्यांमध्ये वापरतो.

पण एक घरगुती औषध म्हणून हळदीने एक फार महत्त्वाचं स्थान मिळवलेला आहे. किंवा पारंपारिक औषध म्हणून पूर्वीच्या काळी काही जखम झाली, कुठे लागलं तरी ब्लड थांबवण्यासाठी  हळद लावतात.

हळद दूध हा एक पूर्वीपासून चालत आलेलं एक फार महत्त्वाचा औषध आहे. आणि त्याचे फायदे काय आहेत आपल्याला सर्वांना माहिती असलेला पदार्थ पण बहुतेक वेळेला दुर्लक्षित झालेला असतो. तर त्याचे फायदे आज आपण बघुयात म्हणजे आपल्याला आपल्या डायट मध्ये हे इन्क्लुड करता येईल .

आपल्याकडे काही झालं तरी सर्दी असेल, खोकला असेल, घसा दुखत असेल तर आपण हळद द्दुध घेऊ शकतो. स्किन प्रॉब्लेम असेल तरी पण आपण तिथे हळद लावतो. असेच याचे खूप फायदा आहे ते आपण सविस्तर बघूयात.

हळद दूध पिण्याचे फायदे. (Benefits of drinking turmeric and milk)

  1. रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  2. संधिवात किंवा सूज कमी होते. 
  3. हार्मोनल इन बॅलन्स. 
  4. मधुमेह आणि हृदयविकारावर गुणकारी. 
  5. झोप चांगली लागते.

 

1. रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आत्ताच्या काळामध्ये ज्या सिच्युएशन मधून आपण जात आहोत त्यामध्ये इम्युनिटी वाढवणे आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवणं खुप गरजेचा आहे. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे यासारखे आजार जे आहेत हे कंट्रोल मध्ये ठेवते.

इम्युनिटी साठी हळदी मधलं कर्क्युमिन नावाचं कंपाउंड चांगलं काम करतात. अँटी बॅक्टरियल, अँटि व्हायरल, अँटी फंगल प्रॉपर्टीज यामध्ये असतात. त्यामुळे रात्री झोपताना गरम दूध आणि त्यामध्ये हळद घेणे खूप गरजेचे आहे.

वातावरणात बदल झाले की आपल्याला सर्दी, खोकला यासारख्या समस्या निर्माण होतात. तर यांच्यापासून बचाव होण्यासाठी तुम्ही रात्री झोपताना हळद दूध घेतले तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.

2. संधिवात किंवा सूज कमी होते. 

संधिवात मध्ये किंवा अर्थाइटिसच्या त्रासामध्ये दुखणं कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. म्हणजे गुडघे असतील किंवा अंगावरची सूज असेल तर ही सूज कमी करण्यासाठी हळद दूध हे खूप चांगलं काम करत. आणि हळदीमध्ये अँटी इन्फ्लामेंटरी प्रॉपर्टीज असल्यामुळे सूज कमी होते.

3. हार्मोनल इन बॅलन्स. 

थायरॉईड, पिंपल्स यासारखे बरेच आजार हार्मोनल इन बॅलन्स मुळे होतात. हळदी मधलं curcumin नावाचं कंपाऊंड हे हार्मोनल इन बॅलन्स सुधारायला मदत करते. त्यामुळे असे समस्या असणाऱ्यांनी हळद दूध घेणे त्यांच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते. यामुळे शरीरातील हार्मोनल इन बॅलन्स होत नाही.

हार्मोनियम इन बॅलन्स म्हणले की वजन वाढणे, चरबी वाढणे यासारख्या समस्या निर्माण होतात. पण तुम्ही जर तुमच्या आहारात हळद दूध घेतले तर वजन वाढणे चरबी वाढणे यासारख्या गोष्टीवर देखील याचा फायदा होईल.

4. मधुमेह आणि हृदयविकारावर गुणकारी. 

हळदी मधील curcumin नावाचं घटक आपल्या रक्तातील शुगर कमी करण्यासाठी मदत करते. आणि आपल्या शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत चालण्यासाठी देखील मदत करते.

त्यामुळे हृदयाची विकार आणि मधुमेह बऱ्या प्रमाणामध्ये आटोक्यात राहतो.

5. झोप चांगली लागते.

ज्यांना झोपेची तक्रार आहे, रात्री लवकर झोप लागत नाही, डिस्टर्ब स्लिप असते, रोज झोपेच्या गोळ्या घेतात अशा लोकांनी हा घरगुती उपाय करून बघायला हरकत नाही.

हळदी मधल्या जे काही कंपाउंड आहेत ते कंपाऊंड झोप चांगली लागायला मदत करतात. किंवा झोपेची तक्रार सुधारायला मदत करतात.त्यामुळे ज्यांना झोपेची तक्रार आहे त्यांनी रात्री एक कप गरम दूध हळद घेतल्यामुळे ही तक्रार खूप कमी होते.आणि शांत झोप लागते.

त्याचबरोबर रात्री बऱ्याच जणांची तक्रार असते की युरीनसाठी किंवा लघवीसाठी दोन-तीन वेळा उठावे लागतात, तर ज्यांना खूप वारंवार हा त्रास होतो त्यांनी सुद्धा हळद दूध घेतल्यामुळे त्याचा खूप चांगला फायदा होईल.

याचबरोबर ज्यांना काही मानसिक तक्रारी आहेत. जसं की डिप्रेशन, झोप न लागलं, चिडचिड होणे, मुड स्विंग, टेन्शन आहे. curcumin हे कंपाउंड अशा गोष्टींना कमी करण्यासाठी मदत करते.

हे सर्व होते हळद दूध पिण्याचे फायदे पण तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे कसं प्यावं? किती प्यावं? एखादी गोष्ट चांगली आहे म्हणून तिचे अति सेवन करणे हे देखील धोक्याचे ठरू शकते. कारण एखादा पदार्थातून आपल्याला जर पोषक घटक किंवा आपल्या शरीराला लागणारे घटक घ्यायचे असतील तर तो पदार्थ घेण्याची एक विशिष्ट वेळ आणि प्रमाण असते.

हळद दूध कधी घ्यावे? 

तुम्ही हळद दुध रात्री जेवण झाल्यानंतर एक ते दीड तासानंतर पिऊ शकता.

हळद दूध किती प्यावे? 

हळद दूध पीत असताना तुम्ही  एक कप दूध आणि त्यामध्ये एक चिमट हळद घेऊ शकता शकता.

एका चिमट पेक्षा जर जास्त हळद घेतली तर तुम्हाला पित्त, ऍसिडिटी यासारखे समस्या होऊ शकतात.

मित्रांनो ही होती हळद पिण्याचे फायदे (Benefits of drinking turmeric and milk), ते कधी प्यावे? किती प्यावे? याची सविस्तर माहिती. तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील नक्की पाठवा.

Leave a Comment