benefits of drinking copper water – तांब्याचा भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे.

benefits of drinking  copper water: पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही बघितल असेल प्रत्येकाच्या घरामध्ये तांब्याची भांडी आणि पितळाची भांडी खूप जास्त प्रमाणात होते. त्या भांड्यामध्ये जेवण केल्याने किंवा त्यातले पाणी पिल्याने आपल्या आरोग्याला खूप फायदा होत असे. तेव्हा जे तांब्याची भांडी होती पितळाचे भांडे होते त्याला कलई  करून त्यात स्वयंपाक केला जात असे. ते जेवण पूर्वीचे लोक खायचे, आणि असं केल्याने त्यांचे  आरोग्य चांगले राहायचे. आणि अस केल्याने त्याचे बऱ्याच आजारांपासून त्यांची संरक्षण देखील व्हायचे.

आजच्या या लेखामध्ये आपण तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे बघणार आहेत. आपल्या शरीरात तांबे असते. आपल्या शरीरात असलेल्या तांब्याला ट्रेस एलिमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या प्रक्रिया मध्ये तांब्याचा उपयोग होत असतो. जवळपास 100 milligram  तांब आपल्या शरीरामध्ये असते. आणि दिवसाला आपल्याला दोन ते तीन मिलीग्राम तांब लागतं.

मित्रांनो तांब्याच्या भांड्यातले पाणी पिण्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. याचे एवढे फायदे आहेत की तुम्ही आयुष्यभर अनेक आजरांपासून लांब राहाल. तुमची रोगप्रतिकर शक्ति वाढेल. त्यातलेच काही फायदे आपण खाली बागणार अहोत.

      तांब्याचा भांड्यात पाणी पिण्याचे फायदे. (benefits of drinking water in copper vessel)

  1. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. यामुळे शरीरातील तांब्याची कमतरता भरून निघते. तसेच रोग पसरणाऱ्या जिवाणू पासून शरीर सुरक्षित राहते.
  2. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी शुद्ध मानलं जातं हे पाणी जुलाब, कावीळ अतिसार यासारखे आजार पसरणाऱ्या जिवाणूंना नष्ट करते. आणि या आजारापासून आपल्याला लांब ठेवण्यास मदत करते.
  3. तांब्यात अँटी इम्प्लॉयमेंटरी गुना असतात ज्यामुळे शरीराला वेदना वात आणि सूज येत नाही. संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातले पाणी पिणे फायदयाचे आहे.
  4. पोटाच्या सर्व प्रकारच्या तक्रारीसाठी तांब्याचं पाणी अतिशय उपयोगी असतो. दररोज हे पाणी पिल्याने पोटदुखी, ऍसिडिटी आणि बुद्धकोष्टता यासारख्या समस्यावर आराम मिळतो.
  5. शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी फायदेशीर राहील. याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी सुरक्षित ठेवते. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शन पासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणे लाभदायक आहे.
  6. अनेमिया अर्थात अशक्तपणा असल्यास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने फायदा होतो. हे पाणी लोह सहज रित्या शोषून घेते ज्यामुळे अनेमिया असणाऱ्यांसाठी हे पाणी पिणे आवश्यक आहे.
  7. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्याने त्वच्याला कोणतेही प्रकारचे समस्या होत नाही. या पाण्यामुळे फोड तसेच त्वचे संदर्भातील उपयोग येत नाहीत असे त्वचा साप आणि चमकदार होते.
  8. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने आपली पचनक्रिया सुधारते व पचनशक्ती वाढते तसेच तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी ठेवून ते सकाळी पिल्याने पचनक्रिया सुधारते.
  9. तांब्याच्या भांड्यातील पाणी हृदय निरोगी ठेवण्यास व ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय पित्त असणाऱ्यांसाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर ठरते.
  10. तांबे पोट, लिव्हर आणि मूत्रपिंड यासारख्या अवयवांचे शुद्धीकर करते. यात काही गुणधर्म असे आहेत जे पोटाला हानी पोहोचवणारे बॅक्टेरिया नष्ट करतात. ज्यामुळे पोटात अल्सर आणि इन्फेक्शनची समस्या कधीच निर्माण होत नाही.
  11. तांब्यामध्ये अँटिबॅक्टरियल, अँटिव्हायरल आणि अँटी इम्प्लिमेंटरी गुण असल्यामुळे ते जखमा लवकर भरण्यास मदत करते. याशिवाय तांबे रोग प्रतिकार शक्ती वाढवून नवीन पेशींच्या निर्मितीमध्ये ही मदत करते.
  12. तांब्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या दूर करतात. तसेच फाईन लाईन वाढवण्याचे सर्वात मोठे कारण असलेले म्हणजेच फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण करून त्वचेवर संरक्षणात्मक ठर तयार करतात. ज्यामुळे तुम्ही बराच काळ तरुण दिसण्यात मदत होते.
  13. तांब्याच्या भांड्यातील पाणी लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त आहे. कमी वेळात वजन कमी करण्याचा विचार करणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी रोज प्यावे. तांब्याचे पाणी पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी काढण्यास मदत होते.
  14. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीरातील थायरॉक्सिन हार्मोनियम संतुलित राहतो. तांब्यातील खनिज थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत करण्यास मदत करतात व थायरॉईडच्या आजारापासून आराम मिळतो.
  15. तांब्यात दाह दूर करण्याची क्षमता असल्याने संधिवाताच्या त्रासामुळे होणारी सांधेदुखी दूर होण्यास मदत होते. याचबरोबर हाड मजबुतीसाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तांब्यात ठेवलेले पाणी पिल्याने फायदा होतो.
  16. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोष हारक (कफ, पित्त, वात) असते. त्यामुळे किमान आठ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्यात नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते. व आरोग्याच्या दृष्टीने ही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात समाविष्ट होतात तसेच कपाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीची पाने टाकावीत आणि ते पाणी प्यावे.
  17. तांब्याच्या भांड्यातील पाणी रक्तदाब, हृदयाचे ठोके आटोक्यात ठेवते तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये वाहणाऱ्या रक्तपुरवठा सुरळीत होतो.
  18. तांब्याच्या भांड्यातील पाणी मेंदूला उत्तेजित आणि सक्रिय ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. याचा उपयोग केल्याने स्मरणशक्ती बळकट होते आणि आपल्या बुद्धीला चालना मिळते.
  19. तांब्याच्या भांड्यातील पाणी हे चार्ज वॉटर म्हणून ओळखले जाते. रात्री तांब्यात पाणी भरून ते सात ते आठ तास ठेवावे यामुळे तांब्यातील सर्व गुणधर्म पाण्यात उतरतात मात्र कोणतीही गोष्ट चार्ज करताना जमिनीवर ठेवत नाहीत तसेच तांब्याची भांडी ठेवले जात नाही. म्हणून आपली जबाबदारी आहे की नेहमी तांब्याची भांडी टेबलवरच ठेवावे.

 

मित्रांनो हे होते  तांब्याचा भांड्यात पाणी पिण्याचे फायदे (benefits of drinking water in copper vessel). तुम्हाला वरील माहिती आवडलीच असेल.  माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की पाठवा.

धन्यवाद.

Leave a Comment