Benefits of drinking buttermilk: नमस्कार मित्रांनो, ताक म्हणजे उन्हाळ्याचं अमृत मानलं जातं कारण हे आपल्या आरोग्यास आणि शरीराला उन्हाळ्याच्या अनेक आजारांपासून वाचवत. ताकामुळे मुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिक म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर टाकली जातात. शरीरातील उष्णता आणि दाह बाहेर काढण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे काम करते.
ताक जरी दह्या पासून तयार होत असेल तरी पण त्यांचे आपल्या शरीराला होणारे फायदे वेगवेगळे आहेत. ताक पिल्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते त्यामुळे शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही.
मित्रांनो याबरोबरच ताक पिण्याचे आपल्याला अनेक फायदे होतात तेच फायदे याची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत.
ताक पिण्याचे फायदे. (Benefits of drinking buttermilk)
- शरीर थंड राहते.
- पचनशक्ती सुधारते.
- पित्त कमी होते.
- कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत होते.
- रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
- त्वचेसाठी फायदेशीर.
1. शरीर थंड राहते.
ताकामुळे आपल्या शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो. आणि आपल्या शरीराचा डिहायड्रेशन पासून बचाव होतो. ताक हे थंड पेय असल्यामुळे आपण जर ताक पिलो तर आपले शरीर थंड होते.
उन्हाळ्यात आपल्या शरीराचे तापमान कंट्रोल मध्ये ठेवण्याचे हे चांगले साधन आहे. एक ग्लास ताका मध्ये पुदिना, जिरे पावडर ,कोथिंबीर आणि मीठ हे या गोष्टी मिक्स करून पिलात तर तुमची तहान लगेच भागते. त्याचबरोबर बाहेरील उष्ण वातावरणामुळे शरीरात निर्माण झालेले उष्णता बाहेर पडण्यास मदत होते.
ताक पित असताना तुम्ही त्यामध्ये बर्फ सुद्धा टाकू शकता पण बर्फ न टाकता सुद्धा पिलात तरी तुमच्या शरीर थंड होते. बाजारातील कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा हे नैसर्गिक पेय तुमच्या शरीराला नक्कीच फायद्याचे ठरेल. यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कंट्रोल मध्ये राहते. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा डीहायड्रेशनचा धोका वाढतो मात्र तुम्ही नियमित असाल तर तुमचे शरीर सतत हायड्रेटेड राहील. आणि डिहायड्रेशन चा धोका निर्माण होणार नाही.
2.पचनशक्ती सुधारते.
ताक पचनशक्ती सुधारण्यासाठी अगदी एखाद्या औषधासारखे काम करते. कारण यामध्ये दह्यातील उत्तम असे घटक असतात. ज्यामुळे तुमच्या आतड्यांना आराम मिळतो आणि पचनशक्ती वाढते. ज्यांना बुद्धकोष्ठता चा त्रास होतो त्यांनी नियमित ताक पिने फायद्याचा मानले जाते. अपचन आणि पोटाचा त्रास असलेल्या लोकांनी ताक त्यांच्या आहारामध्ये ठेवायला पाहिजे. ताकामुळे food poisoning सारख्या समस्या देखील निर्माण होत नाहीत.
3. पित्त कमी होते.
अतिप्रमाणात तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला पित्ताचा त्रास होतो. ज्यामुळे पोट दुखी,छातीत जळजळ, पोटात गॅस यासारख्या समस्या निर्माण होतात. असे झाले असता तुम्ही एक क्लास ताक ताक पिऊ शकता. ताका सोबत तुम्ही काळे मिरे पावडर किंवा धने पावडर घेतली तरी चालते.
4. कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत होते.
शरीरात मध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. आणि यामुळे हृदयावर ताण येऊन हृदय विकार होतात. जर तुम्ही नियमित ताक पित असाल तर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे हृदयविकाराचा धोका टाळता येतो.
5. रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
आज-काल कामाची दग दग, चिंता, काळजी यासारख्या गोष्टीमुळे तुमच्या रक्तदाब वाढतो. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. बऱ्याचदा कामाच्या काळजी मुळे रक्तदाब वाढतो आणि त्याच्यामुळे हृदयविकार यासारख्या समस्या निर्माण होतात. पण तुम्ही तुमच्या आहारामध्ये रोज ताक घेतले तर तुम्हाला यांसारख्या गोष्टींची समस्या होणार नाही. कारण ताकामध्ये रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवणारे पोटॅशियम असतात.
6 . त्वचेसाठी फायदेशीर.
मित्रांनो ताक पिण्याचे फायदे तुमच्या आरोग्यालाच नाही तर तुमच्या सौंदर्याला देखील आहेत. कारण ताक पिल्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. त्याचा परिणाम असा होतो की तुमच्या शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर टाकले जातात. आणि हे त्वचेसाठी फायदेशीर ठरतं.
ताक पिल्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येतो, त्वचा नितळ होते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. ताक असल्यामुळे त्वचेवरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. ताक तुमच्या त्वचेला मॉइश्चराईज करते. त्वचेच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे.
मित्रांनो हे होते ताट पिण्याचे आपल्याला होणारे फायदे (Benefits of drinking buttermilk) तुम्हाला वरील सर्व माहिती नक्कीच आवडले असेल माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील ही