benefits of drinking black tea; नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ब्लॅक टी पिण्याचे कोणकोणते फायदे आपल्या शरीराला होतात. मित्रांनो ब्लॅक टी म्हणजेच कोरा चहा तुम्ही जर पीत नसाल तर ही माहिती वाचल्यानंतर तुम्ही देखील ब्लॅक टी प्यायला सुरुवात करताल. आणि जर तुम्ही ब्लॅक टी पीत असाल तर तुम्ही एकदम बरोबर करत आहात.
गावाकडे ब्लॅक टी पिण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे गावाकडील लोक अजूनही स्ट्राँग बघायला मिळतात. आपण लहानपणीपासूनच ऐकत आलेलो असतो, की ब्लॅक टी आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. पण आपण तो कधी पीत नाही. आणि त्याचे काय फायदे आहेत याचे माहिती करून घेण्यासाठी प्रयत्न करत नाही.
मित्रांनो जसा ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसाच ब्लॅक टी सुद्धा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर. मी तुम्हाला काळा चहा पिण्याचे फायदे आणि तो कधी आणि किती प्यावा याची माहिती सांगणार आहे.
काळा चहा पिण्याचे फायदे. (benefits of drinking black tea)
- हृदयाचे आरोग्य सुधारते
- कोलेस्ट्रॉल कमी होते.
- शुगर फ्री आहे.
- रोग प्रतिकारशक्ती वाढते.
- हाड मजबूत होतात.
- पचनक्रिया सुधारते.
- वजन कमी होण्यास मदत होते.
- जुलाब थांबवण्यास मदत करते.
- माईंड फ्रेश ठेवण्यास मदत होते.
1.हृदयाचे आरोग्य सुधारते.
ब्लॅक टी मध्ये flavonoid आणि अँटिऑक्सिडंट असतात. ते तुमच्या हृदयाला आरोग्यदायी ठेवण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते. याचा अर्थ ब्लॅक टी तुम्हाला हृदयविकार होण्यापासून वाचवते.
2. कोलेस्ट्रॉल कमी होते.
जर तुम्ही ब्लॅक टी नियमितपणे पीत असाल तर आमचे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल. त्याच्यावर संशोधन देखील झाला आहे आणि त्या संशोधनात असं लक्षात आलं की ब्लॅक टी मुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे ब्लॅक टी तुम्हाला आरोग्यदायी आहे.
3. शुगर फ्री आहे.
जर तुम्हाला डायबिटीज म्हणजेच मधुमेह आहे. तर तुमच्या रक्तातील साखर कमी करण्याचं काम ब्लॅक टी करते. ब्लॅक टी हे शुगर फ्री असल्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
4. रोग प्रतिकारशक्ती वाढते.
ब्लॅक टी पिल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. आणि रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने आपल्याला होणारे छोटे छोटे आजार होत नाहीत. आणि तुम्ही निरोगी राहता. त्यामुळे तुम्हाला निरोगी राहण्यासाठी देखील ब्लॅक टी महत्त्वाचा ठरू शकतो.
5. हाड मजबूत होतात.
जर तुम्हाला हाडांचा त्रास असेल आणि तुम्ही ब्लॅक टी पीत असाल तर तुमचा हा त्रास नक्कीच दूर होईल. ब्लॅक टी हाड मजबूत बनवण्यामध्ये आपल्या शरीराला मदत करतो.
6. पचनक्रिया सुधारते.
जर तुम्ही नेहमीत पणे ब्लॅक टी पित असाल तर तुमची पचनक्रिया देखील सुधारते. यामुळे तुम्हाला होणाऱ्या अपचन, गॅस यासारख्या समस्या होत नाही. त्यामुळे ब्लॅक टी पचन क्रियेसाठी देखील फायदेशीर ठरतो.
7. वजन कमी होण्यास मदत होते.
मित्रांनो ग्रीन टी जसं वजन कमी करण्यासाठी पितात तसेच ब्लॅक टी सुद्धा वजन कमी करण्यासाठी पितात. ब्लॅक टी पिल्याने तुमचे वजन कमी करण्यास मदत होते.
8. जुलाब थांबवण्यास मदत करते.
मित्रांनो जर तुम्हाला जुलाब झालेला असेल, त्यावेळेस तुम्ही जर ब्लॅक टी मध्ये लिंबू पिळून पिलात, तर तुमचा जुलाब काही वेळातच थांबवण्यात साठी ब्लॅक टी मदत करते.
9. माईंड फ्रेश ठेवण्यास मदत होते.
मित्रांनो जर तुम्ही ऑफिसवर करत असाल, कोणी घर काम करतो, पुणे अभ्यास करतो. हे करत असताना आपल्याला थकवा जाणवतो. हा थकवा कमी करण्यासाठी आपण ब्लॅक टी चे सेवन करू शकतो. कारण ब्लॅक टी पिल्याने आपला माईंड फ्रेश होतो. आणि आपण जे काम करतो ते एकदम चांगले करतो.
ब्लॅक टी कसा बनवायचा.
ब्लॅक टी बनवण्यासाठी तुम्हाला जेवढा बनवायचा आहे तेवढे पाणी घेऊन एका भांड्यामध्ये गॅसवर ठेवायचे. आणि त्यात चहा पावडर टाकायची. आणि त्याला कलर येईपर्यंत उकळवून घ्यायचा. पण हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची त्यामध्ये साखर टाकायची नाही.
जर तुम्ही त्याच साखर टाकली तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा ब्लॅक टी बनवत असताना त्यामध्ये साखर टाकायची नाही.
ब्लॅक टी कधी पिला पाहिजे.
तुम्ही सकाळी उठल्यानंतर काही न खाता ब्लॅक टी घेऊ नये. ब्लॅक टी पिण्याच्या आधी थोडेसे काहीतरी खाऊन घ्या आणि त्यानंतर 20 ते 25 मिनिटानंतर ब्लॅक टी चे सेवन करू शकता.
तुम्ही दिवसातून एक ते दोन वेळेस ब्लॅक टी घेऊ शकता. तुम्ही जर जास्त वेळेस ब्लॅक टी घेतला तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
ब्लॅक टी कधी पिऊ नये.
सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी ब्लॅक टी पिऊ नये.
आणि त्याचबरोबर रात्री झोपण्याच्या आधी देखील नाही असं केल्याने तुम्हाला लवकर झोप लागणार नाही. कारण ब्लॅक टी पिल्याने तुमचे माईंड फ्रेश होईल. आणि तुम्हाला झोप येण्यास उशीर होईल.
मित्रांनो हे होते ब्लॅक टी पिण्याची काही फायदे (benefits of drinking black tea). ब्लॅक टी कधी प्यावा मी कधी येऊ त्याचबरोबर तो कसा बनवायचा. ब्लॅक टी पिण्याचे एवढेच फायदे नाहीत. त्याचे खूप फायदे आहेत या लेखाच्या माध्यमातून मी तुम्हाला आठ ते नऊ दैनंदिन जीवनासाठी महत्त्वाचे असणारे काय ते सांगितले आहेत.
तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.
धन्यवाद.