benefits of apple:सफरचंद खायला सर्वांनाच आवडते. त्यामुळे सफरचंद हे फळ सर्वांच्या आवडीचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सफरचंद हे सर्वांच्या आवडीचे फळ आहे त्याचबरोबर ते आपल्या आरोग्याला फायदेशीर देखील आहे. हे फळ जगभरामध्ये खाल्ले जाते.
आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं किंवा असा सल्ला दिला जातो की रोज एक सफरचंद खायला पाहिजे. आपण असे हे बघतो की आपल्या आसपास किंवा आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर डॉक्टर त्यांना सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. आणि रुग्णालयात देखील आजारी व्यक्तींना भेटण्यासाठी येणारे लोक सफरचंद घेऊन येतात.
सफरचंद आपल्यासाठी आरोग्यदायी आहे. पण त्याची नेमके काय फायदे आहेत, ते दिवसातून किती खावेत, याची माहिती आपल्याला नसते. आपण आजच्या या लेखामध्ये सफरचंद खाण्याचे फायदे ते कधी खावी आणि किती खावे याची सविस्तर माहिती बघणार आहोत.
सफरचंद खाण्याचे फायदे. (benefits of apple)
- कोलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये राहण्यासाठी मदत होते.
- दात चांगले ठेवतात.
- हाडे मजबूत होतात.
- वजन कमी करण्यासाठी मदत होते.
- डोळ्यांसाठी फायदेशीर.
- खोकला कमी होतो.
- आयर्न ची कमी भरून निघते.
- पचनक्रिया मजबूत होते.
- श्वसन संबंधित समस्या दूर होतात.
1. कोलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये राहण्यासाठी मदत होते.
सध्याच्या काळात कोलेस्ट्रॉल वाढणे ही एक खूप मोठी समस्या आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा धोका देखील वाटतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सफरचंद एक गुणकारी फळ आहे.
2.दात चांगले ठेवतात.
आपले दात स्वस्त ठेवण्यामध्ये सफरचंदाचे खूप योगदान आहे. सफरचंदामध्ये असणारे अँटीबॅक्टरियल आणि अँटीव्हायरस गुण आपल्यात दातांना बॅक्टेरिया पासून दूर ठेवतात. सफरचंदामध्ये फायबर्स देखील असतात. ते दातांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात.
3.हाडे मजबूत होतात.
सफरचंद खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. हाडे मजबूत होण्यासाठी दिवसाला दोन ते तीन सफरचंद खाल्ली पाहिजेत. सफरचंदामध्ये असलेले विटामिन आणि कॅल्शियम हाडं मजबूत करण्यासाठी मदत करतात. त्यासोबतच तुमचा थकवा देखील कमी होतो.
4.वजन कमी करण्यासाठी मदत होते.
तुम्ही जर कुठला डायट प्लॅन फॉलो करत असाल तर त्यामध्ये सफरचंद असते. कारण सकाळी सकाळी सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला भूक लागत नाही. कारण सफरचंदामध्ये फायबर्स खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि आपण कमी खातो. आणि तुम्ही कमी खाल्ल्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास देखील मदत होते.
5.डोळ्यांसाठी फायदेशीर.
सफरचंदामध्ये अँटिऑक्सिडंट विटामिन सी विटामिन बी आणि फायबर्स असतात. सफरचंद खाल्ल्यामुळे रात्रीच्या कमी दिसणे यासारख्या समस्या कमी होतात. त्याच बरोबर सफरचंद खाल्ल्यामुळे मोतीबिंदू यासारख्या समस्या देखील कमी होतात.
6.खोकला कमी होतो.
जर तुम्हाला खोकला झाला असेल तर त्यासाठी सफरचंद हे एक गुणकारी फळ आहे. एक ग्लास सफरचंद चा ज्यूस सकाळी पिलात तर तुझा खोकला बरा होण्यास मदत होईल. त्याचबरोबर चांगली पिकलेली सफरचंद खाल्ले तरी देखील तुमचा खोकला बरा होण्यास मदत होते.
7.आयर्न ची कमी भरून निघते.
आपल्या शरीरामध्ये जर आयर्नचे प्रमाण कमी झाले तर आपल्याला थकवा जाणवतो. त्याचा परिणाम आपल्या शरीरातील रक्तावर होतो. जर तुम्ही नियमितपणे सफरचंद खाल्ले तर तुम्हाला रक्ताची कमी पडणार नाही. कारण सफरचंदामध्ये आयर्नचे प्रमाण खूप जास्त असते.
8.पचनक्रिया मजबूत होते.
सफरचंदामध्ये तंतूंचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते आपल्या पचनक्रियेसाठी महत्त्वाचे ठरते. सफरचंद रोज खाणे हे पोटाच्या विकारांना दूर ठेवण्यासाठी मदत करते. पण तुम्ही पदार्थ असलेल्यांना आपल्याला अधिक पचनीय असते. त्यामुळे सफरचंद आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
9.श्वसन संबंधित समस्या दूर होतात.
आपले श्वसन तंत्र अत्यंत संवेदनशील असते. श्वसन संबंधित अनेक समस्या कोषीकांच्या वेगवेगळ्या मुळे होतात. यामध्ये प्रामुख्याने अस्थमाचा समावेश आहे. अस्थमाचा प्रभाव कमी करण्यासाठी सफरचंद फारच प्रभावशाली ठरते.
या फायद्यांबरोबरच सफरचंद आपल्या त्वचेसाठी, मेंदूसाठी फायदेशीर आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील सफरचंद फायद्याचे ठरते. तुमच्या शरीरावर कुठे सूज येत असेल तर सूज कमी होण्यासाठी केली सफरचंद फायद्याचे आहे. हे होते सफरचंद खाण्याचे फायदे.
मित्रांनो एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त खाल्ली किंवा त्याचे अति सेवन केले तर त्याचे काही दुष्परिणाम देखील आपल्याला होतात. किंवा काहींना ते जमत नाही. सफरचंद खाण्याचे काही तोटे आपण बघूयात.
सफरचंद खाल्ल्याने होणारे नुकसान.
1.सफरचंद हे लाभदायक फळ आहे. त्यामध्ये कॅलरीज आणि शुगरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे याच्या अति सेवनामुळे तुमचे वजन देखील वाढते.
2. काही लोकांना सफरचंद खाल्ल्यावर एलर्जी होते. काहींना सफरचंद खाल्ल्यामुळे ओठाला आणि जिभेला सूज येते. तोंडाच्या आजूबाजूला खाज सुटणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
3.सफरचंदामध्ये उच्च क्वालिटीचे फायबर्स असल्यामुळे तुम्हाला पोट दुखीचा त्रास देखील होऊ शकतो. पण वरील सर्व गोष्टी या अति सेवनामुळे होतात. त्यामुळे सफरचंद खाताना ते प्रमाणात खावे जास्त खाऊ नये.
मित्रांनो हे होते सफरचंद खाण्याचे फायदे (benefits of apple) आणि होणारे नुकसान. तुम्हाला वरील माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.
धन्यवाद.