Balanced diet for good helath:आजच्या या लेखात आपण आपल्या आहारामध्ये कोणते कोणते पदार्थ असले पाहिजेत. किंवा रोजचा आहार कसा असावा. तुम्हाला असं वाटेल की आम्ही रोज खातो ते हेल्दी फुड खातो, घरच अन्न खातो पण बऱ्याच वेळा आपण बघतो की बराच जणांचा घरचा आहार सुद्धा बॅलन्स नसतो. खूप सारे पोषक तत्वे असतात की ज्यांची कमी तुमच्या आहारामध्ये असते. त्यामुळेच आपण आजच्या या लेखांमध्ये बघणार आहोत की तुमचा रोजचा आहार कसा असावा म्हणजे संतुलित आहार कसा असावा.
आपण जे काही अन्न खातो ते अन्न आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी आणि आपले शरीर निरोगी राहण्यासाठी खातो. आपल्या शरीराचे कार्य सुरळीत करण्यासाठी आपल्याला मिनरल्स, प्रोटीन, विटामिन्स यासारखे पोषक तत्व महत्त्वाचे असतात. हे सारे पोषक तत्त्व आपल्याला आपल्या आहारामधून मिळतात.
जर आपला आहार व्यवस्थित नसेल आणि यातील एखादा घटक आपल्या शरीरामध्ये कमी-जास्त झाला तर आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालत नाही आणि आपले आरोग्य ही बिघडते. म्हणून आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आपल्याला संतुलित आहार घेणं खूप गरजेचं असतं. आता आपण बघूया संतुलित.
संतुलित आहार म्हणजे काय?
मित्रांनो तुम्ही जो रोजचा आहार घेता त्या आहारामध्ये आपल्याला लागणारे पोषक घटक यांचे सेवन योग्य त्या प्रमाणामध्ये असणे याला संतुलित आहार म्हणता येईल.
आपण कुठेतरी ऐकतो की आपल्या शरीराला प्रोटीन गरजेच आहे कार्बोहायड्रेट गरजेचे आहे मग आपण त्याच गोष्टीचे जास्त सेवन करतो आणि असं करत असताना बाकीचे घटक आपल्याला मिळत नाहीत.
रोजचा आहारामध्ये आपल्या आरोग्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक घटकाचे समावेश असायला पाहिजे. एखादा पदार्थाचे अतिसेवन ही करू नये आणि एखादा पदार्थ करी दुर्लक्ष हि करू नये.
चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार कसा असावा? (Balanced diet for good helath)
तुम्ही जो रोजचा आहार घेता त्यामध्ये तुम्हाला फळे प्रोटीन्स कार्बोहायड्रेट आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करायचा आहे. याचबरोबर त्यासोबत दुधाचा एखादा पदार्थ म्हणजेच एक ग्लास ताक किंवा एक वाटी दही असं तुम्ही घेऊ शकता.
1. कार्बोहायड्रेट.
आपल्या आहारामध्ये आपण जे काही धान्य खातो त्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट् मिळते. जसं की ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू इत्यादी. आपण कोठे बाहेर गेलो की आपण बाहेरचे पदार्थ खातो पण त्या पदार्थांमध्ये जास्तीत जास्त पदार्थ हे मैद्यापासून बनलेले असतात. आणि मैदा हे रिफायन कार्बोहायड्रेट आहे ते आपल्या इन्सुलिन सिक्रेशन वर परिणाम करत.
आपल्या ऊर्जेचा मुख्य सोर्स हे कार्बोहाइड्रेट आहेत. आपल्या आहारामध्ये 30 टक्के एवढे प्रमाण कार्बोहायड्रेट चे असायला पाहिजे. यातून आपल्याला विटामिन्स आणि सॉलिबल फायबर्स मिळतात जे आपल्या पचनसंस्थेसाठी खूप महत्त्वाचे असते.
2. भाज्या.
आपल्या आहारामध्ये भाज्यांचे प्रमाण सुद्धा 30% असायला पाहिजे. यातून आपल्याला विटामिन्स,मिनरल्स, अँटिऑक्सिडंट त्याचबरोबर फायबर्स देखील यातून मिळते.
तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुमच्या आहारामध्ये ठेवा. ज्यामुळे तुम्हाला शरीराला आवश्यक असलेले घटक त्यातून मिळतील.
काही वेळेस आपण ठराविक भाज्या परत परत खातो. आणि काही भाज्या खातच नाही याने काय होते की आपल्याला आवश्यक असलेल्या पोषण घटक मिळत नाहीत. कारण एकाच भाजीमध्ये सगळे पोषक तत्व असतीलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला सगळे पोषक तत्व जर मिळवायचे असतील तर वेगवेगळ्या भाज्या खाणं गरजेचं आहे.
3. प्रोटीन.
आपल्या आहाराच्या 20% प्रोटीन घ्यायला पाहिजे. आपल्या आहारामध्ये प्रोटीनचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. कारण आपल्या शरीरात बऱ्याचशा गोष्टी ह्या प्रोटीनमुळे चालतात किंवा त्यांना प्रोटीन ची गरज असते.
त्यामुळे तुम्हाला आहार घेत असताना माहित पाहिजे की प्रोटीन आपल्याला कोणत्या पदार्थातून मिळते. मांसाहारी लोकांसाठी प्रोटीनचा सोर्स म्हणजे मासे, अंडी, चिकन हे आहेत. पण शाकाहारी लोकांसाठी प्रोटिन सोर्स जरा कमी असतात पण त्यांनी प्रोटीन सोर्स म्हणून आपली कडधान्य जसे की मटकी, मूग,हरभरा, सोयाबीन, पनीर यासारख्या पदार्थांचा आहारामध्ये समाविष्ट करू शकता.
त्याचबरोबर प्रोटीनचा सोर्स म्हणून तुम्ही सुकामेवा यामध्ये जास्त करून बदाम आणि अक्रोड यांचा समाविष्ट करू शकता. यामध्ये विटामिन इ आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड चांगल्या प्रमाणामध्ये असते.
4. फळे.
तुमच्या आहारामध्ये फळांचे प्रमाण देखील 20% इतकी असायला पाहिजे. आता फळ खात असताना तुम्ही जेवणाबरोबर नाही खाल्ली तरी जमते. संध्याकाळी किंवा सकाळी नाष्टा मध्ये तुम्ही फळांचा समावेश करू शकता.
बाजारामध्ये जी सिजनल फळे येतात ते किंवा जे ताजी फळे असतात त्या फळांचे सेवन करणे खूप चांगले असते. ज्या लोकांना मधुमेह किंवा इतर कोणत्या गोष्टीचा त्रास आहे अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फळ त्यांच्या आहारामध्ये घ्यावीत.
5. दूध आणि दुधाचे पदार्थ.
दूध आणि दुधाचे पदार्थ मध्ये तुम्ही दही, ताक,पनीर यासारख्या गोष्टींचा समावेश करू शकता. तुम्ही रोज एक ग्लास दूध जरी घेतले तर त्यातून तुम्हाला कॅल्शियम, विटामिन डी, विटामिन बी 12 यासारखे आवश्यक पोषक तत्त्व मिळतात.
6. पाणी
आपल्याला पाणी देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. एका प्रौढ व्यक्तीला दिवसातून साधारण तीन ते चार लिटर पाणी पिणे गरजेचे असतं. याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते. याचबरोबर शरीरातील असणारे विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होते. मी तुमची पचनक्रिया व्यवस्थित होते.
याबरोबरच तुम्हाला व्यायाम करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. दिवसातून 30 ते 45 मिनिट कोणत्याही प्रकारचा व्यायाम करायला पाहिजे. ज्या लोकांना काही त्रास असेल तर वरील पदार्थ आहारामध्ये घेत असताना डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करावा.
मित्रांनो हि होती चांगल्या आरोग्यासाठी आहार कसा असावा (Balanced diet for good helath) याविषयी थोडीशी माहिती. तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.