benefits of lemon water: नमस्कार मित्रांनो, लिंबू म्हणलं की आपल्या घरातील सहज उपलब्ध असणारा घटक. लिंबा शिवाय आपण काही पदार्थ खात सुद्धा नाहीत किंवा त्याची चव लागतं नाही. जसं पोहे, उपीट आणि काही भाज्या. लिंबामुळे चव तर येथेच. त्याचबरोबर त्याचे अनेक फायदे देखील आहेत.
तुम्ही बरेचदा ऐकले असेल की लिंबू पाणी पिल्याने वजन कमी होते. पण लिंबू पाणी पिल्याने वजन नेमकं कसे कमी होते. याची माहिती आपल्याला नाही. आपण शक्यतो वजन कमी करण्यासाठीच लिंबू पाणी पितो. पण याचे दुसरे देखील अनेक फायदे आहेत.
आपण लिंबू आंबट आहे त्यामुळे बऱ्याच वेळेस ते खाणं किंवा लिंबू पाणी पिणे टाळतो. पण असं न करता कमी प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पिलो, तर त्याचा नक्कीच फायदा होईल. लिंबू पाणी पिण्याचे काय काय फायदे आहेत. ते आपण या लेखाच्या माध्यमातून बघूया.
लिंबू पाणी पिण्याचे फायदे. (benefits of lemon water)
- विटामिन सी ची गरज भागते.
- रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- वजन कमी होते.
- पचनक्रिया चांगली राहते.
- रक्ताभिसरण क्रियेमध्ये मदत होते.
- घशातील इन्फेक्शन कमी करण्यास मदत करते.
- किडनी स्टोन साठी मदत होते.
1. विटामिन सी ची गरज भागते.
लिंबामध्ये विटामिन सी चांगल्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे आपण जर रोज लिंबू पाणी पिलो तर आपली विटामिन सी (vitamin c) ची गरज तर भागतेच. त्याबरोबर आपले शरीरही हायड्रेटेड राहते.
2. रोगप्रतिकारशक्ती वाढते.
लिंबू पाणी पिल्याने आपले रोगप्रतिकारशक्ती वाढते. कोविडच्या काळानंतर रोगप्रतिकारशक्ती किती गरजेची आहे हे सगळ्यांना कळलेलं आहे. त्यामुळे लिंबू पाणी पिला तर तुम्हाला रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होईल.
3. वजन कमी होते.
मुख्यतः आपण वजन कमी करण्यासाठीच लिंबू पाणी पितो. गरम पाण्यात लिंबू टाकून पिल्याने आपल्या शरीरात असलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. लिंबा मध्ये पॉलिफिनॉल अँटिऑक्सिडंट (polyphenols antioxidants) असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी त्याची मदत होते.
सकाळी लिंबू पाणी पिल्यामुळे दिवसभर आपल्या शरीरात होणारी मेटाबोलिजम प्रक्रिया फास्ट होण्यास मदत होते. आणि यामुळे आपली अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे त्यांना कोणाला वजन कमी करायचे असेल त्यांनी लिंबू पाणी पिले पाहिजे.
4.पचनक्रिया चांगली राहते.
पचनक्रिया जर चांगली नसेल तर आपले वजन कमी होत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपली पचनक्रिया चांगली असणं खूप गरजेचं आहे. आपण जे अन्न खातो याचा उपयोग आपल्या शरीराला तर होतोच. पण त्याचा परिणाम हा आपल्या मेटाबोलिज वर होत असतो.
ज्या लोकांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यांनी सकाळी उठून गरम पाण्यात लिंबू पिले तर पचन व्यवस्थित होते. आणि पोट साफ होण्यास मदत होते. आणि खाल्लेले अन्न व्यवस्थित पचन झाल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
5. रक्ताभिसरण क्रियेमध्ये मदत होते.
लिंबा मध्ये असणारा पोटॅशियम (potassium) हा घटक ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतो. त्याचबरोबर आपली रक्ताभिसरण क्रिया चांगली किंवा सुधारण्यास मदत करते. लिंबाला ब्लड प्युरिफायर म्हणून देखील ओळखले जाते.
6. घशातील इन्फेक्शन कमी करण्यास मदत करते.
तसं तर आपण घशात काही इन्फेक्शन झाले तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करतो. पण मिठाच्या पाण्याच्या गुळण्याने ते बरे नाही झाले तर लिंबू पाण्याच्या गुळण्या केल्या पाहिजेत. कारण लिंबा मध्ये अँटिबॅक्टरियल गुण असल्यामुळे आपण जेव्हा लिंबू पाण्याच्या गुळण्या केल्या तर तुमचे घशातील झालेली इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.
7. किडनी स्टोन साठी मदत होते.
लिंबू पाणी पिल्याने मुतखड्याचा त्रास असल्यास त्याला देखील म्हणत होते. कारण लिंबा मध्ये शीट्रिक ऍसिड (citric acid) असल्यामुळे आणि ते पाण्यासोबत घेतल्यामुळे फ्लशिंग आउट व्हायला मदत होते. बरोबर किडनी स्टोन विरघळायला देखील मदत होते. आणि त्यांना वारंवार किडनी स्टोन चा प्रॉब्लेम आहे त्यांना किडनी स्टोन तयार होण्याची जी क्रिया आहे ती कमी होण्यास लिंबू पाण्याची मदत होते.
वरील सांगितल्याप्रमाणे लिंबू पाण्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते, खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते, विटामिन सी ची गरज भरून निघते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, वजन कमी होण्यास मदत होते हे फायदे तर आहेतच. लिंबू पाणी पिल्याने आपले दैनंदिन जीवन, आपली फिजिकल आणि मेंटल हेल्थ सुद्धा चांगली राहते.
लिंबू पाण्यातील काही घटकांमुळे आपल्या शरीरात काही चांगले हार्मोन सीक्रेट होतात. त्यामुळे आपला मूड चांगला राहण्यात देखील मदत होते. ज्या लोकांना सकाळी उठल्यानंतर अंगावर सूज येते. त्यांनी लिंबू पाणी आणि त्यात हळद टाकून पिल्यामुळे शरीरावर येणारे सूज देखील कमी होते.
लिंबू पाणी पिल्यामुळे आपली त्वचा देखील चांगली राहते. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, कमी वयात पडणाऱ्या सुरकुत्या या गोष्टी कमी करण्यासाठी लिंबू पाणी मदत करते.
हे होते लिंबू पाणी पिण्याचे फायदे (benefits of lemon water) आता आपण लिंबू आणि कसं किती आणि केव्हा प्यावे याची माहिती बघुयात.
आपण कुठेतरी ऐकलेला असतो किंवा आपल्याला कोणीतरी सांगितलेला असतं. की एका ग्लास पाण्यामध्ये एक लिंबू घ्यायचं किंवा अर्धा ग्लास पाण्यामध्ये एक लिंबू घ्यायचं. पण असं केल्याने तुम्हाला ऍसिडिटी सारख्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे लिंबू पाणी पिण्याचे योग्य प्रमाण तुम्हाला माहित पाहिजे.
लिंबू पाणी पिण्याची योग्य प्रमाण.
एका ग्लास पाण्यामध्ये तुम्ही लिंबाचे चार ते पाच थेंब टाकून घेऊ शकता. हे आपल्या आरोग्यासाठी पुरेसं आहे. त्यापेक्षा जास्त पिलात तर पित्त, जळजळ यासारखा व्यक्तींचा त्रास होऊ शकतो.
लिंबू पाणी कधी प्यावे.
तुम्ही सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी लिंबू पाणी पिऊ शकता. हे शक्य होत नसेल तर तुम्ही जेवणासोबत देखील लिंबू खाऊ शकता. पण योग्य प्रमाणात.
मित्रांनो वरील माहिती तुम्हाला नक्कीच आवडले असेल. माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.
धन्यवाद.