Benefits of eating ragi – नाचणी खाण्याचे फायदे.

Benefits of eating ragi: आज आपण पाहणार आहोत नाचणी म्हणजेच रागी खाण्याचे फायदे. तसेच नाचणी खाण्याने शरीराला कोणकोणते फायदे होतात. हे देखील जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे नाचणीचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसा करू शकतो हे देखील बघणार आहोत.

ज्याप्रमाणे चांगले आरोग्यासाठी विविध पालेभाज्या, फळे यांची सेवन करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांचा देखील समावेश असायला पाहिजे. विविध प्रकारच्या धान्याचे सेवन आपल्याला पोषण देण्यास सोबतच अनेक आजारांपासून देखील आपले रक्षण करते.

नाचणी खाण्याने शरीराला विविध प्रकारचे फायदे होतात. पण त्याआधी नाचणी म्हणजे काय हे देखील आपण जाणून घेऊया. नाचणी हे भारतासह आफ्रिकेच्या विविध भागात उगवणारे एक प्रकारचे धान्य आहे. भारतामध्ये कर्नाटक राज्यात याचे सर्वाधिक उत्पादन होते.

नाचणी अनेक पोषक तत्वे आहेत जसे की फायबर, प्रोटीन, पोटॅशियम,फॉस्फरस, सोडियम, झिंक, लोह आणि कॅल्शियम असे विविध प्रकारची शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्वे नाचणीमधून आपल्या शरीराला मिळतात. चला तर मग जाणून घेऊया आता आरोग्यासाठी नाचणीचे कोणकोणते फायदे आपल्याला होऊ शकतात.

नाचणी खाण्याचे फायदे. (Benefits of eating ragi)

  1. हाडांसाठी फायदेशीर.
  2. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर.
  3. मधुमेहावर लाभदायी.
  4. ॲनिमिया वर उपयुक्त.
  5. मेंदूसाठी फायदेशीर.
  6. रक्तदाब नियंत्रणात ठेवते.

 

1. हाडांसाठी फायदेशीर.
नाचणी खाल्ल्याने हाडांसाठी खूपच चांगले आहे. वास्तविक पाहता रागींमध्ये असणारी कॅल्शियम हे हाडांना खूप जास्त मजबुती देते. एका संशोधनानुसार असे आढळले आहे की नाचणीमध्ये तांदळाच्या तुलनेपेक्षा ही जास्त कॅल्शियम असते. त्यामुळे हाडांना आवश्यक असणारी कॅल्शियम नाचणीतून अगदी सहजपणे मिळते.

हाडांचा विकास करण्यासाठी कॅल्शियम आवश्यक तत्त्व समजण्यात येते. त्यामुळे हाडांना तुटण्यापासून संरक्षण देण्यासाठी आणि हाडांचा विकास करण्यासाठी नाचणीचा म्हणजेच रागीचा खूपच फायदा होतो.

नाचणीतील कॅल्शियम मुळे लहान मुलांना आणि त्याचबरोबर गरोदर असणाऱ्या महिलांना देखील नाचणीचे सत्व देण्यात येते. कॅल्शियमची कमतरता असल्यास कॅल्शियम युक्त डायट मध्ये नाचणीचा समावेश करून घेणे हा एक उत्तम पर्याय आहे.

2. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर.
आज काल बरेच जण वजन कमी करण्यासाठी देखील नाचणीचा उपयोग करतात. एका संशोधनानुसार वजन नियंत्रणात राखण्यासाठी नाचणीचा खूप फायदा होतो हे आढळून आले आहे. नाचणी भूक कमी करून वजन नियंत्रित करण्यासाठी खूप मदत करते.

याशिवाय नाचणीमध्ये फायबर हे अधिक प्रमाणात असल्यामुळे एकदा खाल्ल्यानंतर त्वरित भूक लागत नाही आणि परिणामी वजन वाढण्याचा धोका देखील कमी होतो.  तुम्हाला वजन पण वजन कमी करायचे असेल तर जेवणामध्ये नाचणीचा समावेश आवश्यक करून घ्यावा.

त्याचबरोबर नियमितपणे व्यायाम करणे देखील तितकेच गरजेचे आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते शरीरातील पचनक्रिया चांगली करण्यासाठी नाचणीचा उपयोग होतो. त्याचबरोबर शरीरातील चरबी पासून सुटका मिळते आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही कमी होण्यासाठी यामुळे मदत होते.

3. मधुमेहावर लाभदायी.
बदलत्या लाईफस्टाईल मुळे अगदी लहान वयात देखील  मधुमेहाचा प्रकार अनेकांना झालेला दिसून येतो. जर तुमच्यापैकी कोणाला मधुमेहाची समस्या असेल तर त्यावर नाचणी हा एक उत्तम उपाय आहे. नाचणी मधील अँटी डायबेटिक गुणांमुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी खूप मदत मिळते. आणि वाढलेली वजन देखील नियंत्रित होते. तसेच नाचणी हा एक लो ग्लायसमिक खाद्यपदार्थ आहे जो रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतो.

4. ॲनिमिया वर उपयुक्त.
नाचणीमध्ये लोहाचा खूप चांगला स्त्रोत आहे. ॲनिमिया, हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या रुग्णांना आहारामध्ये नाचणीचा समावेश करून घेणे खूपच फायद्याचे ठरते. हे एकाद्या घरगुती उपायाप्रमाणेच आहे. नाचणी खाल्ल्याने शरीरात विटामिन सी ची देखील कमतरता पूर्ण होते. आणि शरीरातील रक्तामध्ये लोहाचे प्रमाण देखील वाढते.

हवं असेल तर नाष्ट्यामध्ये नाचणीचा उपमा, नाचणीचा डोसा यांचा देखील समावेश करून घेऊ शकता. तुम्हाला जर सतत भाकरी खाण्याचा कंटाळा आला असेल तर उपाय म्हणून तुम्ही नाचणी पासून इतर पदार्थ देखील बनवून घेऊ शकता.

5. मेंदूसाठी फायदेशीर.
नाचणी मधील अमिनो ऍसिड आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म हे नैसर्गिक पद्धतीने शरीराला आराम देतात. त्याचप्रमाणे मेंदूमध्ये होणाऱ्या चिंता, डोकेदुखी, अनिद्रा यासारख्या समस्यांवर देखील नाचणी उपयुक्त ठरते. नाचणी मध्ये असलेला ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ॲसिड मेंदूसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे आपली स्मरणशक्ती चांगली होण्यासाठी मदत होते.

6. रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये अनेकांना उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबावर घरगुती उपाय म्हणून तुम्ही नाचणीचा तुमच्या आहारामध्ये समावेश करून घेऊ शकता. जर तुम्ही नाचणीचे नियमितपणे सेवन करत असाल तर तुम्ही या त्रासापासून दूर राहता आणि तुम्हाला स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो. त्यामुळे आहारामध्ये किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी नाचणीच्या पदार्थांचा समावेश करून घ्या.

नाचणीचा उपयोग आपण आहारामध्ये कसा करावा.

  • नाचणीचा वापर तुम्ही आहारामध्ये कसा करू शकाल तर नाश्त्यासाठी तुम्ही नाचणीचा डोसा, नाचणी पासून इडली किंवा उपमा बनवू शकतात.
  • नाचणीची भाकरी देखील बनवून खाऊ शकता. त्याचप्रमाणे पराठ्यासाठी देखील तुम्ही नाचणीच्या पिठाचा वापर करून घेऊ शकता.
  • त्याचप्रमाणे आजकाल नाचणी पासून चकली देखील तयार होते. ती देखील तुम्ही ट्राय करू शकता.

मित्रांनो हे होते नाचणी खाण्याचे फायदे (Benefits of eating ragi) आणि नाचणीचा आपल्या आहारामध्ये कसा समावेश करावा याबद्दल माहिती. आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.

Leave a Comment