benefits of eating roasted chanabenefits of eating roasted chana:नमस्कार आपल्याकडे फुटाणे वापरतात म्हणजे कोणतीही अशी गोष्ट ज्याला फारशी किंमतच नाही. पण हेच फुटाणे आपल्या आरोग्यासाठी मात्र फार मूल्यवान आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का आज आपण पाहणार आहोत आपल्या आरोग्यासाठी असणारे खूप महत्त्वाचे फायदे.
हरभरा हे कडधान्य ते वेगवेगळ्या प्रक्रिया करून आपल्या आहारात वापरले जातात. जसं चना आहे,काबुली चना, आहे आणि हरभऱ्याचे डाळ, फुटाणे. हे सगळे हरभऱ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण यांच्यावर होणारे प्रक्रिया वेगवेगळ्या आहे. त्यामुळे या सर्वांचे गुण वेगवेगळे आहेत. आणि त्यामुळेच या सर्वांचे आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे आहेत.
हरभरे भट्टीमध्ये भाजून त्यापासून फुटाणे बनवले जातात. म्हणजेच काय तर हे प्रकारचं भरीत धान्य आहे आणि आयुर्वेदानुसार कुठल्याही धान्य जेव्हा भाजले जात तेव्हा ते पचायला अजून सोपं होतं. कारण भाजल्यामुळे त्यातील पाण्याचा अंश निघून जातो.
फुटाण्यामध्ये भरपूर प्रोटीन्स फायबर्स, मॅगनीज, कॉपर, कॅल्शियम, फॉस्फरस यासारखी अनेक मिनरल्स आहेत. तुम्ही असे पाहिले असेल की जेव्हा आपल्या तोंडाला चव नसते त्यावेळेस फुटाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. चला तर मग बघूया फुटाणे खाण्याचे फायदे.
फुटाणे खाण्याचे फायदे. (Benefits of eating roasted chana)
- वजन कमी करण्यासाठी फायदेशीर.
- सर्दी खोकला आणि कफ कमी होण्यासाठी मदत होते.
- पित्त कमी होते.
- मधुमेह नियंत्रणामध्ये ठेवतात.
- त्वचा चांगली राहते.
- हाड चांगली राहतात.
- कॅन्सरचा धोका कमी होतो.
1. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर.
पहिला फायदा म्हणजे तुम्हाला जर वजन कमी करायचा असेल तर आपल्या आहारात याचा समावेश करायला हवा. ज्यांचे वजन कमी आहे त्यांनी फुटाणे खायचे नाहीत का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु असं नाही. फुटाण्यामुळे आपल्या स्नायू स्ट्राँग होतात. आणि अनावश्यक चरबी कमी होते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्या साठी आणि त्याचबरोबर ज्यांचे वजन कमी आहे त्यांच्यासाठी फुटाणे फायदेशीर ठरतात. कारण ते आपल्या शरीरात असलेली अनावश्यक चरबी कमी करतात.
2. सर्दी खोकला आणि कफ कमी होण्यासाठी मदत होते.
आपल्या घरातील लहान मुलांना नेहमी सर्दी होते, किंवा सीजन बदलला की सर्दी खोकला कफ यासारख्या समस्या होत असतील. तर त्यांना सतत फुटाणे खायला दिली पाहिजेत.
3. पित्त कमी होते.
पित्त वाढल्यामुळे आपल्या तोंडात सतत आंबट पाणी येते, मळमळ होणे, उलटी होणे. असं होत असेल तर तुम्ही फुटाणे खायला पाहिजेत. फुटाणे खाल्ल्याने पित्त कमी होते. त्याचबरोबर यात फायबर असल्याकारणाने पचन संस्थेशी संबंधित समस्या बऱ्या होतात.
4. मधुमेह नियंत्रणामध्ये ठेवतात.
आपल्या शरीरात केव्हा रक्तात वाढलेली अतिरिक्त साखर आटोक्यात आणण्याचे काम फुटाणे करतात. कारण फुटाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे. त्यामुळे रक्तातील साखर कमी करण्यासाठी मदत होते.
5. त्वचा चांगली राहते.
पित्त वाढल्यामुळे आपल्याला काही त्वचा विकार होतात. चेहऱ्यावर किंवा त्वचेवर फोड येतात. यात फुटाणे खाल्ल्याने तुम्हाला फायदा होईल. फुटाण्यामध्ये झिंक, मॅग्नेशियम या घटकांमुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. आणि तुमची त्वचा चांगली राहण्यासाठी तुम्हाला मदत होते.
6. हाड चांगली राहतात.
फुटाणे खाल्ल्याने आपली हाड चांगले राहतात कारण फुटाण्यामध्ये कॅल्शियम, आयर्न आणि इतर देखील खनिजे भरपूर प्रमाणामध्ये आहेत. याने आपल्या हाडांचा ठिसूळपणा कमी होण्यासाठी मदत होते. आणि हाड मजबूत होण्यासाठी मदत होते.
7. कॅन्सरचा धोका कमी होतो.
फुटाणे खाण्याचा आणखी एक महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे पेशींची अनावश्यक वाढ किंवा कॅन्सर सारखे रोग यांना प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त आहे. याच्यामध्ये सेलेनियम नावाचं एक मायक्रो न्यूट्रियंट आहे. त्यामुळे कॅन्सरच्या सेलची वाढ कमी होते. सेलिनियम फारच कमी पदार्थ मध्ये असते. त्यापैकी हा एक पदार्थ. याबरोबर आपल्या शरीरावर येणारी सूज कमी होण्यासाठी देखील फायदा होतो.
मित्रांनो हे होते फुटाणे खायचे फायदे. आता आपण फुटाणे कधी खावीत आणि त्यांनी खाताना कोणती काळजी घ्यावी याविषयी बघूयात.
फुटाणे कधी खावीत.
- आपली पहिली वेळ म्हणजे तुम्हाला सकाळी व्यायाम करण्यापूर्वी भूक लागत असेल आणि त्याला प्री वर्कआउट मिल म्हणतात असं काही खायचं असेल तर त्यामध्ये सगळ्यात चांगला पर्याय आहे फुटाणे.
- तुम्ही भरपूर व्यायाम करत असाल, खेळाडू असाल किंवा वाढत्या वयाची जी मुलं आहेत सगळ्यांना सकाळी भूक लागते. त्यांना व्यायामापूर्वी साधारण एक वाटीभर फुटाणे दिले तर एनर्जी टिकून राहते. कुठलेही रेडिमेड प्रोटीन्स खाण्यापेक्षा फुटाणे हा एक चांगला पर्याय आहे. करण्यामध्ये प्रोटीन सोबतच नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स फायबर आहेत.
- फुटाणे खाण्याची दुसरी वेळ म्हणजे दोन जेवणाच्या मध्ये म्हणजे तुम्हाला दोन ते चार या वेळेत काही खायचे असेल त्यासाठी फुटाणे एकदम चांगला पर्याय आहे.
फुटाणे खाताना कोणती काळजी घ्यावी.
- ज्या लोकांना शुगर नाही अशा लोकांनी फुटाण्यासोबत गुळ खाल्ला तर त्याचा जास्त फायदा होईल.
- मीठ लावलेले फुटाणे खाण्यापेक्षा एकदम साधी म्हणजेच नुसती भाजलेली फुटाणे खाल्ली तर त्याच्या देखील अधिक फायदा होतो.
- फुटाणे खाताना ते साली सोबतच खावेत कारण त्या सालीमध्ये फायबर्स असतात.
मित्रांनो हे होते फुटाणे खाण्याचे फायदे (Benefits of eating roasted chana). त्याचबरोबर फुटाणे कधी खावेत आणि फुटाणे खाताना काय काळजी घ्यावी याविषयी माहिती. माहिती आवडली
असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.
धन्यवाद.