high calorie fruits: मित्रांनो,आजच्या या लेखामध्ये आपण हाय कॅलरी फ्रुट्स कोणती आहेत याची माहिती बघणार आहोत. ज्या लोकांना आपलं वजन कमी करायचे आहे किंवा ज्या लोकांना आपले वजन वाढवायचे आहे. अशा लोकांना याचा नक्कीच फायदा होईल.
आपण फिट राहण्यासाठी किंवा आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश करायला पाहिजे. हे आपल्याला माहित आहे. परंतु काही फळे अशी आहेत जी खाल्ल्याने किंवा प्रमाणापेक्षा जास्त जर आपल्या आहारामध्ये ते असतील तर वेट लॉस च आपलं गोल आपण achieve करू शकत नाही. याचं कारण म्हणजे ही सगळी फळ हाय कॅलरी फ्रुट्स आहेत. म्हणून आज आजच्या या लेखामध्ये कोणती फळे खावीत आणि कोणती खाऊ नयेत त्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.
हाय कॅलरीज असणारे फळे.(high calorie fruits)
- सिताफळ
- केळी
- चिकू
- आंबा
- शहाळ्याची मलई.
- द्राक्षे
1. सिताफळ.
सिताफळ एक चविष्ट फळ आहे आणि त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कॅलरीज असतात. त्याचबरोबर त्यामध्ये साखरेचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे सिताफळ खाल्ल्याने वजन लवकर वाढते.
2. केळी.
केळी या फळाला सुपर हेल्दी फळ देखील मनलं जातं. आणि हे सर्वत्र उपलब्ध असणारे फळ आहे. त्यामध्ये पोटॅशियम खूप चांगल्या प्रमाणात आढळते. ज्या लोकांना आपले मसल्स स्ट्रॉंग करायचे आहेत त्यांच्या आहारामध्ये केळांचा समावेश असायला पाहिजे. पण यामध्ये कॅलरीज आणि नॅचरल शुगर जास्त असते. त्यामुळे तुम्ही जर वेट लॉस साठी प्रयत्न करत असाल तर याची सेवन मर्यादित व्हायला पाहिजे.
3. चिकू
भरपूर गोड असणार असं हे फळ. भरपूर साखर त्याच्यामध्ये असते आणि यामध्ये खूप जास्त कॅलरी असतात. त्यामुळे हे फळ खाल्ल्याने तुमचे वजन वाढायला मदत होते. ज्या लोकांना मधुमेह आहे अशा लोकांनी देखील चिकू खाऊ नये किंवा खायचा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
4. आंबा.
सगळ्यांना आवडणारे फळ म्हणजे आंबा यामध्ये देखील खूप जास्त प्रमाणामध्ये कॅलरीज असतात. आणि साखरेचे प्रमाणही जास्त असते. 100 ग्रॅम आंब्यामधून आपल्याला साधारणता शंभर कॅलरीज मिळतात. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करत असाल तर तुमच्या आहारामध्ये आंब्याचे सेवन कमी असायला पाहिजे.
5. शहाळ्याची मलई.
शहाळ्याची मलई सर्वांना आवडते. अतिशय मऊ असते. पण त्याचे प्रमाण जर तुमच्या आहारामध्ये जास्त असेल तर याने तुमचे वजन वाढू शकते.
6. द्राक्षे
द्राक्षामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये कॅलरीज आणि शुगर असते. त्याचबरोबर फॅट चे प्रमाण सुद्धा जास्त असते. शंभर ग्रामर द्राक्षा मधून आपल्याला 60 ते 70 कॅलरीज मिळतात. आणि 16 ग्राम शुगर मिळते.
वरील सर्व फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली आहेत. त्यामुळेच ती सर्व फळे आपल्या आहारातून काढून टाकता येत नाही. ही फळे आपल्या आहारातून काढून ताकने पूर्णपणे चुकीचे ठरते.
त्यामुळे ही फळे आपल्या आहारामध्ये घेत असताना त्यांच्यात असणारे कॅलरीज आणि शुगर यांच्यावर लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे. त्याचे सेवन करताना आपण त्याच्या काही लिमिट्स ठरवायला पाहिजे.
सगळ्या गोष्टी आपल्या आहारामध्ये असणे आणि त्याच्या सेवनाची काहीतरी मर्यादा ठरवणे टाईम ठरवणे यालाच आपण बॅलन्स डाइट असे देखील म्हणू शकतो.
मित्रांनो हे होते हाय कॅलरी असणारे फळे (high calorie fruits) किंवा वजन वाढवणारे फळे यांच्या विषयी काही माहिती. तुम्ही जर वजन कमी करत असाल म्हणजेच डायट वर असाल तर तुम्हाला वरील माहितीचा फायदा होईल. माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.
धन्यवाद.