food for healthy teeth-दातांच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ खावेत

food for healthy teeth: नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला दातांच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ खावेत त्याची माहिती बागणार अहोत. कदाचित मी सांगणार आहे ते सगळे पदार्थ तुम्ही ऑलरेडी आधीपासूनच खात असाल. पण ते जर योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला खात नसाल तर त्याचा हवा तसा परिणाम होत नाही.

दातांच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ खावेत. (food for healthy teeth)

  1. दूध
  2. दही
  3. चीज
  4. क्रंची फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स.
  5. चहा
  6. डार्क चॉकलेट.
  7. हिरव्या पालेभाज्या.
  8. बदाम

 

1.दूध

दुधातील कॅल्शियम हे हाडांच्या बळकटीसाठी खुप महत्त्वाचं असतं. आणि आपले दाते हाडांमध्येच रोवलेले असतात. कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये शोषून घेतलं जाण्यासाठी विटामिन डी ची गरज असते. आणि विटामिन डी हे कोवळ्या उन्हातून मिळतं हे आपल्याला माहीतच आहे.

दूध घेताना खबरदारी काय घ्याल दूध घेताना शक्यतो त्याच्यामध्ये साखर घालू नका. ड्रिंकिंग चॉकलेट्स घालू नका. या दोन्हीमुळे दात किडण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही दूध घेतल्यानंतर चूळ भरत नसाल तर टस करू नका. दूध घेतल्या घेतल्या चूळ भरा किंवा ब्रश करू शकत असाल तर उत्तमच. आणि रात्री झोपताना जर तुम्हाला दूध घ्यायची सवय असेल तर दूध घेतल्यानंतर कंपल्सरी ब्रश करायलाच पाहिजे.

2.दही

यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे दही. जो आपल्या रोजच्या जेवणामध्ये असायलाच हवा. कारण दही पाचक असते. याच्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स हे आपल्या हिरडीचे आरोग्यासाठी सुद्धा गरजेचे असतात. त्याचं बरोबर दुग्धजन्य पदार्थ जो आपल्या दात आणि हिरड्यांसाठी चांगला असतो.

3.चीज

यानंतर सगळ्यांचाच फेवरेट आहे तो म्हणजे चीज. तुम्ही म्हणाल चीज तर घातक असतं. अस मुळीच नाही हे खूप चांगलं असतं कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम तर आहेच त्याशिवाय त्याच्यामध्ये फ्लोराइड्स असतात जे कीड प्रतिबंधक असतात. पण चीज योग्य प्रमाणात घेणं तुमच्या  आरोग्यासाठी योग्य असत. चीज जास्त घ्याल तर वजन वाढेल आणि चीज हे चिकट असतं त्याच्यामुळे चीज असलेला पदार्थ खाल्ल्यानंतर दात स्वच्छ करणं खूप गरजेचे आहे.

4.क्रंची फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स.

क्रंची फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजेच कुरकुरीत आणि कडक असलेले पदार्थ. जसं की काकडी, गाजर, सफरचंद यामध्ये फायबर असतात. त्याच्यामुळे दातावर चिकटलेलं अन्न स्वच्छ होतं आणि थुंकी येण्याचं प्रमाण हे पदार्थ खाल्ल्यामुळे वाढतं.

5.चहा

आपल्या दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी चहा सुद्धा महत्त्वाचा असतो. तुम्ही रोज घेता तो चहा नाही. चहा म्हणजे ब्लॅक टी आणि ग्रीन टी. ब्लॅक टी म्हणजे नेहमीचा चहा ज्याच्यामध्ये साखर आणि दूध न घालता पिला पाहिजे. ब्लॅक टी आणि ग्रीन टी किंवा हर्बल टी या दोन्हीमध्ये असलेले पॉलिफिनल्स हे आपल्या दातांचा आणि हिरडीच तोंडातील जंतूंपासून संरक्षण करतात. आणि शिवाय आपल्याला वजन घटवायला सुद्धा मदत करतात.

6. डार्क चॉकलेट.

एका विशिष्ट प्रकारचा चॉकलेट म्हणजेच डार्क चॉकलेट आपल्या दातांच्या आणि हिरडीचे आरोग्यासाठी चांगलं असतं. डार्क चॉकलेट हे विशिष्ट प्रकारच्या कोकोबिन्स पासून बनवले जातात. हे तोंडातील जंतू विरुद्ध काम करतात आणि आपल्या दातांचा आणि हिरडीच संरक्षण करतात.

डार्क चॉकलेट आपल्या दातांच्या आरोग्यासाठी चांगल असल तरी ते योग्य प्रमाणात खायला पाहिजे आणि ते खाल्ल्यानंतर दात व्यवस्थित साफ करायला पाहिजेत.

7.हिरव्या पालेभाज्या.

हिरव्या पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर ते आपल्या दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा महत्त्वाचे असतात. कारण यांच्यामध्ये फायबर, मिनरल्स बरोबरच विटामिन बी 12 आणि फॉलिक ऍसिड असतं जे आपल्या हिरड्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं. प्रेग्नेंसी मध्ये हिरडी रोग होण्याची शक्यता असते. अशा वेळेला जर हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या तर हिरडी रोग होणार नाही.

8. बदाम

बदामा मध्ये खूप जास्त प्रमाणात प्रथिन म्हणजेच प्रोटीन्स असतात. आणि हे प्रोटीन्स आपल्या दातांच्या आणि हिरडीच्या  हेल्दी बिल्डप साठी महत्त्वाचे असतात. याच्यासाठी बदाम जर भिजवून खाल्ले तर त्याचं प्रोटीन कंटेंट खूप जास्त प्रमाणात वाढत.

बदामा बरोबरच मनुके सुद्धा आपल्या दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. खास करून काळे मनुके तुम्ही म्हणाल मनुके तर गोड असतात चिकट असतात बरोबर आहे पण मनुक्यातील काही विशेष घटक आपल्या तोंडातील जंतू विरुद्ध दातांचं आणि हिरडीच संरक्षण करत असतात. त्याच्यामुळे मनुके तर खायलाच हवेत पण ते दातांवर चिकटून राहणार नाही याच्याकडे लक्ष द्यायला हवं.

मित्रांनो हे होते दातांच्या आरोग्यासाठी कोणते अन्न खावे (food for healthy teeth) आता आपण दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी की करावे लागणार आहे हे बघू.

 

तुमचे दात सुंदर असेल तर तुमचे हास्य अगदी फुलून दिसते पण तुमचे दात पिवळे असतील तर चार चौघात हसायला लाज वाटते. चुकीच्या पद्धतीने दात घासणे,दारू आणि धूम्रपाण्याची सवय, कोल्ड्रिंक च्या सेवनाने दात पिवळे पडतात. दातांचा पिवळेपणा घालवायचा असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

1. केळीची साल

केळाच्या सालींमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅग्निस असतं ते ब्लिचिंग एजंट असल्यामुळे तुमच्या दातांचा पिळेपणा घालवण्यासाठी  उपयोगी पडतात. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा तरी नक्कीच कराव असं केलं तर तुम्हाला नक्कीच मदत होइल.

2.लिंबाची फोड आणि खाण्याचा सोडा

लिंबाची फोड आणि खाण्याचा सोडा लिंबू ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे एक लिंबाची फोड घेऊन त्यावर खाण्याचा सोडा लावून ही फोड दातावर चोळा. अगदी काही वेळ ठेवून तुम्ही नंतर गुळण्या करा. तुम्हाला फरक जाणवेल. बेकिंग सोडा आणि ब्रश बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या थेट दातांवर करा. तुमच्या दातांवरचे डाग निघून जाण्यास मदत होईल.

3. काळे मनुके

जर तुम्ही काळे मनुके खात असाल. तर या मनुक्यांमधून बाहेर पडणारे ऍसिडिक गुणधर्म तुमच्या दातांना स्वच्छ करण्यास मदत करतात.

 

प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा दात दुखीचा त्रास नक्कीच होतो. म्हणून आज आपण दात दुखीवर काही नैसर्गिक उपचार केले पाहिजेत याबद्दल माहिती घेणार आहोत.

  1. दात दुखीवर लवंग अत्यंत परिणामकारक ठरते. अँटी इन्फ्लामेट्री त्याचबरोबर anesthetic प्रॉपर्टी देखील आहेत. त्यामुळे दात दुखणं दाढीला सूज येणे. त्यात लवंग अत्यंत परिणामकारक ठरते. दात दुखीवर आपण लवंगाचे तेल वापरू शकतो. एक कापसाचा बोळा लवंगाच्या तेलात बुडवून किंवा भिजवून तो दुखणाऱ्या दाताखाली धरावा. त्यामुळे दातातील इन्फेक्शन सुद्धा नियंत्रणात येण्यास मदत होते.

 

  1. दात दुखीवर आलं अत्यंत परिणामकारक ठरते. आल्याचा तुकडा ठेचून त्यात सैंधव मीठ घालून एक गोळी बनवावी आणि दुखणाऱ्या दाताखाली ही गोळी धरून ठेवावी. जर दातात ठणका मारत असेल तर तो सुद्धा बरा होतो. आल्याचा तुकडा रोज सकाळी चावून चावून खाल्ल्याने दात बळकट होतात. आणि निरोगी राहतात. दात दुखी पूर्णपणे बरी होऊ शकते.

 

  1. कांदा सुद्धा दात दुखीवर अत्यंत परिणामकारक ठरतो. कांद्यात अँटिसेप्टिक आणि अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी आहेत. त्यामुळे तोंडातील आणि दातांमधील बॅक्टेरिया चा नाश होतो. त्यामुळे दात दुखी थांबते कांद्याचा एकदा तुकडा दाता खाली ठेवल्याने किंवा चघळल्याने दात दुखीवर आराम मिळतो.

 

  1. पेरूची पानं देखील दात दुखीवर अत्यंत परिणामकारक ठरतात. यात जंतुनाशक प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे दात दुखी थांबते. दाडीला सूज आली असेल आणि जर हिरड्यांमधून पू येत असेल, रक्त येत असेल तर तेही थांबतं. पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्या पाहिजे. काही पेरूची पान दाताखाली ठेवून चघळल्याने सुद्धा दात दुखी थांबण्यास मदत होते.

 

  1. आपण थोडीशी मिरपूड आणि चिमूटभर मीठ एकत्र करून जर तंतमंजनासारखं दातावर वापरलं किंवा याने दात ब्रश केले तर दात दुखणं दात किडन हिरड्यातून दातातून किंवा तोंडातून दुर्गंधी येणे असे त्रास होणारच नाहीत. दात दुखी पासून जर दूर राहायचं असेल तर रोज दिवसातून दोन वेळा ब्रश करणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर जर आपण काहीही खाल्लं तरी लगेच चूळ भरण देखील खूपच गरजेचं ठरतं. तसंच अति गार,थंड ,तिखट, तेलकट किंवा गोड पदार्थ खाणे देखील आपण टाळले पाहिजेत. फक्त काळजी करत राहण्यापेक्षा त्या सोप्या उपायांचा अवलंब करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा.

 

मित्रांनो हे होते दात आरोग्यदायी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत  (food for healthy teeth) याची माहिती. त्याचबरोबर दाताचा पिवळा पणा दूर करण्यासाठी काय करावे याची माहिती होती. मला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.

Leave a Comment