importance of vitamin B12: नमस्कार मित्रांनो, विटामिन B12 हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. आज काल तुम्ही जर कोणालाही विचारलं तर बऱ्याच लोकांना या विटामिन B12 ची कमतरता आहे, असं दिसून येतं किंवा डॉक्टर असं सांगतात. तुम्हाला विटामिन B12 कमतरता आहे.
पण असं ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये एक प्रश्न येतो की, पहिले असं नव्हतं जो आहार पहिले घेत होतो, तोच आहार आज देखील घेतो मग विटामिन B12 ची कमतरता का?. बरेच जण असेही म्हणतात की आम्ही नॉनव्हेज खातो आणि नॉनव्हेज मध्ये तर विटामिन बी 12 भरपूर प्रमाणामध्ये असते मग आम्हाला विटामिन B12 ची कमतरता कसं काय?
तुमच्या मनात देखील असा विचार आला असेल, पण यातून काय होतं विटामिन बी 12 संबंधित पुरेशी माहिती नसल्यामुळे काही गैरसमज निर्माण होतात. आणि आपल्याला असं वाटायला लागतं की हा डॉक्टरांचा स्कॅम आहे डॉक्टर तुम्हाला वाटच काहीतरी सांगत आहेत. असं वाटायला लागतं. त्यामुळे तुम्हाला विटामिन बी 12 ची संपूर्ण माहिती असणं खूप गरजेचे आहे. तिच पण आजच्या या लेखातून बघणार आहोत.
या लेखामध्ये आपण विटामिन B12 ची आपल्या शरीरात असणाऱ्या आवश्यकता, त्यांच्या कमतरतेमुळे दिसणारी लक्षणे, आणि त्याची कमतरता भरून निघण्यासाठी कोणते पदार्थ खावे याची सविस्तर माहिती बघणार आहोत.
विटामिन B12 आपल्या शरीरात काय कार्य करते? (importance of vitamin B12)
- लाल रक्त पेशींची (RBC) निर्मिती करते.
- DNA ची निर्मिती करते.
- मज्जासंस्थेचे (nerves system) काम सुरळीत चालण्यासाठी मदत करते.
- पचन क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी मदत करते.
1.लाल रक्त पेशींची निर्मिती करते. (RBC)
विटामिन बी 12 सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशींची निर्मिती करणे. आता या लाल रक्तपेशी आपल्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. आपल्या शरीरामध्ये सगळ्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करणे हे महत्त्वाचं काम लाल रक्तपेशी करतात. आपण ऑक्सिजनला मराठी मध्ये प्राणवायू असं म्हणतो. मग हा प्राणवायू जर आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींना पोहोचला नाही तर आपल्याला ॲनिमिया सारखा आजार होतो. जो अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे तुमच्या शरीराचं बरंच नुकसान होतं. म्हणूनच या लाल रक्तपेशी निर्माण करण्यासाठी आपल्याला विटामिन B12 ची गरज असते.
2.DNA ची निर्मिती करते.
आपल्या शरीरामध्ये DNA ची निर्मिती करणे. आता DNA म्हणजे आपल्या शरीराचा पाया असतो. तो व्यवस्थित तयार होण्यासाठी आपल्याला विटामिन B12 ची गरज असते. आणि हा पाया जर व्यवस्थित बनला नाही तर बरेच अनुवंशिक आजार होतात. त्यामुळे आपल्या DNA निर्मितीसाठी विटामिन B12 खूप आवश्यक आहे.
3.मज्जासंस्थेचे (nerves system) काम सुरळीत चालण्यासाठी मदत करते.
आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराचा सगळं कार्य सुरळीत करण्यासाठी मज्जा संस्था बनलेली आहे. आणि या मज्जा संस्थेचं कार्य म्हणजे ज्या मज्जा तंतू आहेत त्यांचा कार्य सुरळीत करण्यासाठी सुद्धा आपल्याला विटामिन B12 गरज असते.
आपले हे जे शरीरामध्ये मज्जा तंतू आहेत ज्याला आपण nerves म्हणतो हे अतिशय नाजूक असतात. आणि ह्या नाजूक मज्जातंतूंना प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्यावर प्रोटीनची एक लेयर दिलेली असते. ही लेयर तयार होण्यासाठी सुद्धा या विटामिन b12 ची गरज असते. ही जी प्रोटेक्टिव्ह लेयर आहे किंवा हे जे कव्हरिंग आहे हे बनवण्यासाठी मायलिन नावाचा एक पदार्थ तयार होणं गरजेचं असतं. आणि हा पदार्थ तयार होण्यासाठी आपल्याला विटामिन B12 गरज असते.
विटामिन B12 आपल्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असेल, तर वरील सर्व क्रिया व्यवस्थित होतात. आणि आपल्या शरीरचे कार्य सुरळीत चालण्यात मदत होते.
4.पचन क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी मदत करते.
विटामिन B12 च अजून एक महत्वाचं कार्य म्हणजे, काय आपण जे काही अन्न खातो त्या त्यामध्ये कार्बोधक आहेत, प्रथिन आहेत, मेद आहे हे सगळं जे काही आपण अन्न खातो त्याने आपल्याला ऊर्जा मिळत असते. पण या खाल्लेल्या अन्नाचा जर पचन व्यवस्थित झालं नाही तर आपल्याला ऊर्जा मिळणार नाही. आपल्या शरीरासाठी गरजेचे असणार पोषणही आपल्याला मिळणार नाही. आपण आहारामध्ये जे काही पदार्थ खातो त्या पदार्थांचे व्यवस्थित पचन आणि त्यातून ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा आपल्याला विटामिन B12 मदत करत असते.
आपले केस आपले त्वचा आपले केस छान, चमकदार स्ट्रॉंग आणि मजबूत होण्यासाठी.तसेच आपली त्वचा तुकतुकीत आणि निरोगी दिसण्यासाठी, चमकदार दिसण्यासाठी सुद्धा आपल्याला विटामिन B12 ची गरज असते.
विटामिन B12 आपल्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असेल, तर वरील सर्व क्रिया व्यवस्थित होतात. आणि आपल्या शरीरचे कार्य सुरळीत चालण्यात मदत होते.
विटामिन B12 च्या कमतरतेची लक्षणे.
विटामिन B12 च्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे, रक्ताची कमतरता किंवा अनेमिया, त्वचा निस्तेज दिसते. तुमच्या डोळ्यांच्या कडा निस्तेज दिसतात किंवा पिवळसर दिसतात. त्वचा पिवळसर दिसायला लागतो. थोडसं काम केलं तरी लगेच थकवा जाणवतो. तुम्हाला धापही लागते. आणि मज्जा संस्था किंवा मज्जा तंतू जे आहेत ते तुमचे वीक होतात. त्यामुळे तुमच्या हाता पायाला मुंग्या येणं, हाता पायामध्ये बधिरता येणे, हात आणि पाय सुन्न पडणं, शरीराचं संतुलन किंवा आपण बॅलन्स म्हणतो ते बिघडल्यासारखं वाटतं. आणि हे बॅलन्स बिघडून तुम्हाला चक्कर येते.
विटामिन B12 ची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावे.
विटामिन बद्दलची कमतरता आहे असं म्हणल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की ती कमतरता जे आहे ते इमिजिएटली कमी कशी करायची. तर ती जर कमतरता असेल तर तुम्हाला इंजेक्शनचा एक कोर्स दिला जातो आणि तुम्हाला काही गोळ्या दिल्या जातात. आता हे सगळं केल्यानंतर तुमची जी कमतरता असते ती दूर होते पण नंतर प्रश्न असा येतो की मग आम्हाला जर विटामिन B12 कमतरता आहे. तर आम्ही आहारात काय घ्यायला पाहिजे.
आहारात काय घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया तर जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यासाठी साठी ऑप्शन आहेत चिकन किंवा मटण, फिश आणि अंडी. अंड्यातला जो पिवळा बलक आहे तो महत्त्वाचा आहे .
व्हेजिटेरियन लोकांसाठी दूध दही, ताक चीज लोणी आणि आंबवलेले जे काही पदार्थ असतात. जसं की इडली, डोसा. या पदार्थांचे सेवन केल्याने तुमची विटामिन B12 असलेली कमतरता भरून निघण्यासाठी मदत होते.
हे होते विटामीन B12चे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम, त्याचे आपल्यासाठी किती महत्व आहे (importance of vitamin B12). तुम्हाला वरील माहीत आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.
धन्यवाद.