calcium rich food-कॅल्शियम युक्त पदार्थ.

calcium rich food: मित्रांनो आपल्या शरीरातील हाडे आणि दातांमध्ये 99% कॅल्शियम असते. म्हणूनच हाडांचा विकास आणि मजबुतीसाठी शरीराला मुबलक कॅल्शियमची गरज असते. साधारणता 20 ते 25 वयापर्यंत बोन डेन्सिटी चांगली असल्यामुळे माणसांची हाडे नैसर्गिकरीत्या मजबूत असतात. मात्र जसे जसे आपले वय वाढू लागते तसे शरीरातील बोन डेन्सिटी कमी होऊ लागते. त्यामुळे पंचविशीनंतर तुमच्या शरीराला कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळणे गरजेचे असते.

त्याचबरोबर पचनसंस्थेसाठी , हृदयासाठी, पेशींच्या कार्यासाठी, त्याचबरोबर कॅल्शियम मुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालतो. त्यामुळे त्यासाठी खूप गरजेचे आहे.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हाडांचे विकार होण्याची ही दाट शक्यता असते. शिवाय उतार वयात हाडांमधील कॅल्शियम कमी झाल्यामुळे फ्रॅक्चर आणि अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.

शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी विविध औषधोपचार देखील घेतले जातात मात्र आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करून आपण शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढवू शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारात कॅल्शियम वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा लागेल.

तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये कॅल्शियम युक्त आहार घेतला. तर तुमच्या शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळेल आणि कॅल्शियमची जि असलेली कमतरता भरून निघण्यात मदत होईल.आपण आजच्या या लेखांमध्ये कॅल्शियम युक्त पदार्थ आणि कॅल्शियमची कमतरता कशी ओळखायची याची माहिती बघणार आहोत.

कॅल्शियम युक्त पदार्थ. (calcium rich food)

  1. दूध
  2. पनीर
  3. हिरव्या पालेभाज्या
  4. दही
  5. अंडी
  6. बदाम
  7. नाचणीची भाकरी
  8. चीज

1.दूध

सर्वात स्वस्त, सगळीकडे सहज उपलब्ध आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असणारा पदार्थ म्हणजे दूध. 100 मिलिलीटर दुधामध्ये 100 mg कॅल्शियम असते. दूध फुल फॅट आहे की लो फॅट यावर कॅल्शियम चे प्रमाण अवलंबून असते. दुधामधील कॅल्शियम शरीर चांगल्या प्रकारे शोषून घेते.

दुधामध्ये प्रोटीन विटामिन ए आणि डी देखील चांगल्या प्रमाणात असते. शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी रोज एक ग्लास दूध प्या. शरीराला आवश्यक असलेले कॅल्शियम यातून मिळेल त्याचबरोबर ऑस्टिओपोरीसिस या आजाराची संभावना कमी होण्यास मदत होते.

2.पनीर

कॅल्शियम युक्त पदार्थ म्हणजे दुसरा  पदार्थ आहे पनीर. पनीर जितके खायला स्वादिष्ट आहे तेवढेच आरोग्यासाठी ही फायदेशीर आहे. पनीर मध्ये कॅल्शियम जीवनसत्वे प्रोटीन आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असते. जे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे.

पनीर खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता दूर केली जाऊ शकते. 100 ग्राम पनीर मध्ये 480 मिलीग्राम पर्यंत कॅल्शियम असते पनीर बऱ्याच पोषक तत्त्वांचा भंडार असल्याने गर्भवती महिलांसाठी ही खूप महत्त्वाचे आहे. पनीर मध्ये आढळणारे कॅल्शियम गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. पण त्याचबरोबर बाळाच्या वाढीसाठी ही मदत करते .

3.हिरव्या पालेभाज्या

आपला तिसरा पदार्थ म्हणजेच हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात जरूर समावेश करा. कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. पालक कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत आहे यासाठी दररोज भरपूर पालेभाज्या खायला पाहिजेत.

4.दही

दही सुद्धा कॅल्शियमचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. आहारात नियमित दही घेतले तर कॅल्शियमची कमतरता दूर होण्यास मदत होते. 100 ग्राम दह्यामध्ये 138 मिलीग्राम पर्यंत कॅल्शियम असते.

5.अंडी

मित्रांनो अंडी आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात अंडी प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. त्याचबरोबर अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम व विटामिन डी असते. जे तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरते.एका अंड्यामध्ये साधारणपणे 25 मिलीग्राम कॅल्शियम असते.

6.बदाम

सर्व प्रकारच्या ड्रायफ्रूट्स मध्ये कॅल्शियम असते, मात्र बदामामध्ये ते भरपूर प्रमाणात आढळते. 100 ग्राम बदामा मध्ये 264 मिलीग्राम पर्यंत कॅल्शियम असते. त्याचबरोबर फायबर, हेल्दी फॅक्ट्स, प्रोटीन असतात.

निरोगी हाडांना आधार देण्यासाठी आवश्यक असणारी सर्व खनिजे बदामामध्ये मुबलक प्रमाणात असतात.

7.नाचणी ची भाकर.

साधारणपणे प्रत्येक घरामध्ये ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची भाकरी करण्यात येते. मात्र नाचणीची भाकरी फार कमी म्हणजे नाही च्या बरोबर केली जाते. खरं तर नाचणी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असून, शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. तसं बघायला गेले तर नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे नाचणीच्या भाकरीचा आपल्या आहारात जरूर समावेश करायला पाहिजे.

8. चीज

मित्रांनो चीज पण कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत आहे. चीज मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. 20 ग्राम चीज मध्ये साधारणपणे 60 ते 70 मिलीग्राम कॅल्शियम असते.

कॅल्शियमची कमतरता भासणारे लक्षण.

  1. स्नायू अखडणे, लचकने, कंबर दुखणे, गुडघे दुखणे, दात दुखणे, नख कमजोर होणे, त्या लक्ष्मण मधून शरीरामध्ये कॅल्शियमची कमी असल्याचे लक्षात येते.
  2. शरीरातील कॅल्शियमची कमतरता एकदम कमी झाली तर हाड ठिसूळ होतात. त्याचबरोबर हाडांची झीज देखील होते.
  3. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हृदयविकार, हाय कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि रक्ताचे विकार होण्याची शक्यता असते.
  4. डिप्रेशन, चिडचिडपणा, विसराळूपणा यासारख्या समस्या होऊ शकतात.
  5. लहान मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता झाली तर त्यांचे दात किडतात आणि त्यांची उंची देखील खुटते.

मित्रांनो हे होते कॅल्शियम वाढणारे पदार्थ (calcium rich food) आणि आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या. होईल सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांना देखील पाठवा.

धन्यवाद.

Leave a Comment