benefits of sprouts matki-मोड आलेली मटकी खाण्याचे फायदे.

benefits of sprouts matki: नमस्कार मित्रांनो, मटकी हे आपल्या आहारामध्ये आवर्जून वापरण्यात येणारे कडधान्य आहे. आपण कधी कधी मटकी ही भिजवून कच्ची खातो, किंवा काही वेळेस अर्धवट उकडून देखील मटकी खाल्ली जाते. पण आपल्याकडे मोड आलेली मटकी जास्त प्रमाणात खाल्ली जाते. कारण मटकीला मोड आल्यामुळे तिच्या गुणधर्मामध्ये वाढ होते. मटकी हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आणि महत्त्वाचं कडधान्य आहे.

आपल्या मनात बऱ्याचदा असा विचार येतो की आपण तर शाकाहारी आहोत. आपल्याला प्रोटीनची कमी होईल. असं नाही काही शाकाहारी पदार्थ मध्ये मांसाहारी पदार्थांपेक्षा जास्त प्रोटीन पाहायला मिळतं. शाकाहारी पदार्थांमध्ये प्रोटीनचा सोर्स म्हणून मटकीला ओळखले जाते.

मटकी मधून आपल्याला फायबर्स, पोटॅशियम, झिंक, आयर्न चांगल्या प्रमाणामध्ये मिळते. एक मोठी वाटी उकडलेली मोड आलेली मटकी मध्ये 200 ते 230  ग्राम पर्यंत कॅलरीज असतात. परंतु त्यामध्ये कोलेस्ट्रॉल झिरो, फॅट झिरो आणि प्रोटीनचे प्रमाण चांगल्या प्रमाणामध्ये असते. जवळपास 16 ते 20 ग्राम प्रोटीन एक वाटी मोड आलेल्या मटकी मधून मिळते. यामुळेच मटकीला प्रोटीनचा चांगला सोर्स सांगितले जाते. मटकीला मोड आल्यामुळे त्यातील प्रोटीनचा कंटेंट आहे तो 30% वाढतो.

आपण मोड आलेली मटकी खातो. मटकी खाल्ल्याने आपल्या शरीराला काय काय फायदे होतात हे आपल्याला माहित नसतं. या लेखांमध्ये आपण मटकी खाण्याची फायदे बघणार आहोत.

मोड आलेली मटकी खाण्याचे फायदे. benefits of sprouts matki

  1. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर.
  2. रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
  3. आयर्नचे कमतरता पूर्ण होते.
  4. फायबर्स ची कमतरता भरून निघते.
  5. झिंक ची कमतरता भरून निघते.

 

1. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर.

वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही बेस्ट प्रोटीन सोर्स बघत असाल. तुम्ही नॉनव्हेज जरी खात असाल तरी रोज नॉनव्हेज खाऊ शकत नाही. मग याला अल्टरनेटिव्ह काय, व्हेजिटेरियन लोकांमध्ये तर आहेच आहे पण नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये सुद्धा एक कोलेस्ट्रॉल फ्री आणि फॅट फ्री पदार्थ म्हणून तुम्ही मटकी कडे बघू शकता.

फॅट कमी करण्यासाठी आणि मसलमास वाढवण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि त्यासाठी मटकी अतिशय उत्तम आहे. जे लोक रेगुलर जिम करतात आणि ज्यांना फॅट पर्सेंट कमी करायचाय आणि  मसल पर्सेंट वाढवायचे आहे. त्यांच्यासाठी मटकी अतिशय उत्तम पर्याय आहे.

फायबर भरपूर असल्यामुळे पोट खूप वेळ भरलेल राहत. बाकीचं काही खायची इच्छा होत नाही. आणि सारखी भूक लागत नाही. मटकीला नॅचरल अपेटाइट सप्रेसर म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर पोट साफ राहतं आणि पोटावरील असलेली अनावश्यक चरबी कमी होते.

2. रक्ताभिसरण व्यवस्थित होते.

मटकी मध्ये पोटॅशियम असतं. त्यामुळे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होतं. आणि ब्लड प्रेशर हे नॉर्मल राहायला मदत होते. कोलेस्ट्रॉल कमी होतं, शुगर कंट्रोल मध्ये राहते, त्यामुळे डायबिटीसच्या लोकांनी रोजच्या रोज तुमच्या आहारामध्ये निदान दोन चमचे तरी मोड आलेल्या मटकीचा समावेश करावा.

3. आयर्नचे कमतरता पूर्ण होते.

ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे, त्याचबरोबर यांना अनिमिया चा त्रास आहे. अशा लोकांनी मटकीचा सेवन केल्याने त्यांची आयर्नची काम करतात भरून निघते.

4. फायबर्स ची कमतरता भरून निघते.

फायबर भरपूर असल्यामुळे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे. ज्यांना पोट रेग्युलर साफ होत नाही अशा लोकांनी त्यांच्या आहारामध्ये घेणं त्यांना खूप मदत करेल.

5. झिंक ची कमतरता भरून निघते.

मटकी मध्ये झिंक असतं. त्यामुळे इम्युनिटी वाढते आणि आत्ताच्या काळात आपल्याला इम्युनिटी वाढवण्याची खूपच जास्त गरज आहे. त्यामुळे लहान मुलांना पासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मटकी ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये नक्की ठेवा. तुमच्या डायट मध्ये देखील ठेवू शकता.

 

मटकी कशी खावी.

वेट लॉस डाएट मध्ये आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा उसळ असलीच पाहिजे.  याची तुम्ही उसळ करू शकता. पण हे उसळ करत असताना आपण जे रेगुलर सुरू करतो तीच फायदेशीर ठरते. बऱ्याच जणांच्या घरी उसळ करत असताना त्यामध्ये खोबऱ्याचा कीस किंवा सुख खोबरं टाकलं जातं असं करू नका. सुख खोबरं किंवा शेंगदाणे हे टाकू नका.

यामध्ये तुम्ही कांदा, लसूण, टोमॅटो असं घालून तुम्ही त्यात थोडासा गरम मसाला टाकून परतवून घेतली तरी चालतं. बऱ्याच ठिकाणी मोड आलेल्या मटकीची आमटी ही केली जाते. त्याचबरोबर मटकीची सॅलड देखील आपल्या आरोग्याला चांगली आहे.

मोड आलेली मटके कुकरमध्ये टाकून त्याला एक शिट्टी शिजवून आणि त्यामध्ये टोमॅटो, गाजर, काकडी तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. त्याच बरोबर त्यात कच्चे सलाड देखील घालू शकता. त्याचबरोबर तुमच्या आवडीच्या बाहेरच्या टाकून त्याची कोशिंबीर बनवून खाऊ शकता. त्याचा तुम्हाला चांगला उपयोग होईल थोडासा कळले तरी पोट भरल्यासारखे वाटेल. त्यामुळे भूक लागत नाही.

तुम्ही मटकीचा सूप  बनवून देखील पिऊ शकता. मटकी शिजवताना जे आपण पाणी घालतो ते थोडस जास्त पाणी घालायचं. आणि जे वरचं पाणी असतं मटकी शिजवलेली तर ते पाणी काढून घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं त्यानंतर हिंग,  जिरेपूड आणि थोडसं तिखट किंवा मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर असं टाकून तुम्ही छान मटकीचे सूप घेऊ शकता.

काही नाष्ट्यामध्ये उकडलेली मटकी ही बेस्ट आहे ज्यांना उकळून घ्यायचं नसेल शिजवून घ्यायचं नसेल तर त्यांनी नुसती मोड आलेली मटकी सुद्धा दोन तुमचे खाऊ शकता. फक्त थोडीशी पचायला जड असते.त्यामुळे मटकीमुळे बऱ्याच जणांना गॅस होतो किंवा वात वाढतो तर असं असलेल्यांनी रात्रीच्या वेळेस मटकी खाऊ नका. रात्री शक्यतो कडधान्य खाऊ नये त्यामुळे गॅसेस जास्त होतात.

मटकी नाश्त्याला खावी. त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढेल. तुम्हाला याचा त्रासही होणार नाही. आणि याचा बेनिफिट सुद्धा तुम्हाला मिळेल. नाश्त्याला जसं तुम्ही मोड आलेले हिरवे मूग घेतात. तसेच मोड आलेली मटकी सुद्धा घ्या. जर न शिजवता येत असाल दोनच चमचे खावे. आणि  शिजवून घेत असाल एक शिट्टी आणून घेतली पाहिजे.

मटकीचा सूप बनवू शकता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांना पचायला हलकं. थंडीमध्ये बऱ्याच ठिकाणी मटकीच्या कडण असं सुद्धा म्हणलं जातं ते अतिशय पौष्टिक असते. लहान मुलांना सुद्धा देऊ शकता.

मित्रांनो हे होते मोड आलेले मटकी खाण्याचे फायदे (benefits of sprouts matki). आणि मटकी कशी खावी याची माहिती. तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील पाठवा.

धन्यवाद.

Leave a Comment